Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

गावातल्या कुटुंबाची हलकी-फुलकी गोष्ट दाखवणाऱ्या ‘आणीबाणी’चा धमाकेदार ट्रेलर लॉन्च 

 गावातल्या कुटुंबाची हलकी-फुलकी गोष्ट दाखवणाऱ्या ‘आणीबाणी’चा धमाकेदार ट्रेलर लॉन्च 
kalakruti-a-light-hearted-story-of-a-village-family-aanibaani-movie-trailer-launched-marathi-info/
मिक्स मसाला

गावातल्या कुटुंबाची हलकी-फुलकी गोष्ट दाखवणाऱ्या ‘आणीबाणी’चा धमाकेदार ट्रेलर लॉन्च 

by शुभांगी साळवे 14/07/2023

‘आणीबाणी’ हा चार अक्षरी शब्द ऐकला की, तो काळ प्रत्यक्ष अनुभवलेल्यांच्या काळया आठवणी जागृत होतात. त्यामुळे  पुन्हा ‘आणीबाणी’ नको अशी भावना असलेल्या जनतेला आता मात्र मनोरंजनाच्या आणीबाणीला सामोरं जावं लागणार आहे. येत्या २८जुलैला  मनोरंजनाची ही ‘आणीबाणी’ लागू होणार आहे.  तत्पूर्वी  मनोरंजनाची  ही ‘आणीबाणी’  नेमकी  काय असणार आहे? याची झलक नुकतीच एका शानदार कार्यक्रमात दाखविण्यात आली.  ‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर आता मराठी रुपेरी पडदद्यावर ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखक अरविंद जगताप यांच्या सोबतीने  दाखवलं  आहे.  या  चित्रपटाच्या दिमाखदार ट्रेलरचे अनावरण कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले.(Aanibaani Movie Trailer)

Aanibaani Movie Trailer
Aanibaani Movie Trailer

याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक दिनेश जगताप म्हणाले की, पदार्पणात दिग्ग्ज कलाकारांसह एका वेगळ्या विषयाचा  चित्रपट करता आला याचा खूप आनंद आहे. निखळ हास्याची मेजवानी देणारा हा  चित्रपट  प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘संहिता ही नेहमीच मराठी चित्रपटाचं बलस्थान राहिली आहे. ‘आणीबाणी’चं कथानक ही चित्रपटाची जमेची बाजू असल्याचं सांगत, अभिनेताउपेंद्र लिमये यांनी चांगल्या चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद व्यक्त केला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, ‘आणीबाणी’च्या बाबतीत मला हे जाणवलं असं सांगत. ही कलाकृती प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे आभार अभिनेत्री वीणा जामकर हिने मानले. अभिनेता संजय खापरे यांनी मातब्बर कलाकार मंडळीसोबत  काम करता आल्याचं समाधान व्यक्त करताना, चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा  दमदार असल्याचं सांगितलं.  

Aanibaani Movie Trailer
Aanibaani Movie Trailer

आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली ही एका गावातल्या कुटुंबाची हलकी-फुलकी गोष्ट आहे. राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करत लेखक अरविद जगताप यांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर  ही रंजक कथा लिहिली आहे. ‘आणीबाणी’ कोणासाठी अडचण ठरणार? आणि अडचणीत सापडलेले या ‘आणीबाणी’ तून कसे बाहेर पडणार ? याची मनोरंजक कथा चित्रपटात  मांडण्यात आली आहे.(Aanibaani Movie Trailer)

उपेंद्र लिमये,प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी,रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशी  मराठीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी  या  चित्रपटात आहे. कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 

============================

हे देखील वाचा: तेजस्विनी लोणारी दिसणार बेधडक आणि डॅशिंग अंदाजात !

============================

‘आणीबाणी’ चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक, कलादिग्दर्शन सुधीर सुतार तर साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. डी.आय, किरण कोट्टा आणि मिक्सिंग नागेश राव चौधरी यांनी केले आहे. छायांकन मंगेश गाडेकर यांनी  केले असून  संकलन प्रमोद कहार यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत. ‘आणीबाणी’ २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aanibaani Movie Trailer actor sanjay khapare actor upendra limaye director dinesh jagtap movie Entertainment marathi movie 2023 marathi movie aanibaani writer arvind jagtap movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.