Bollywood Movies : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचं झालंय

इलियाना डिक्रूझ ने अखेर दाखवला आपल्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांचा चेहरा,पहा कोण आहे ‘तो’!
बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आई होण्याचा प्रवास उत्साहात एन्जॉय करत आहे. अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या गरोदरपणाचे फोटो शेअर करत असते. सुरुवातीला तिने आपल्या भावी मुलाच्या वडिलांची ओळख गुप्त ठेवली होती . मात्र जेव्हापासून इलियाना तिच्या गरोदरपणाची बातमी सांगितली आहे, तेव्हापासून प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की अभिनेत्रीच्या मुलाचा बाप कोण आहे. आता तिने हे गुपितही उलगडले आहे, बऱ्याच प्रतीक्षेनंतर इलियाना डिक्रूझने आपल्या मुलाच्या वडिलांचा फोटो शेअर केला आहे.अभिनेत्रीच्या मुलाचा बाप हा मिस्ट्री मॅन असल्याचं तिच्या फोटोंवरून दिसून येतं. या फोटोंमध्ये अभिनेत्री लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे, तर तिचा बॉयफ्रेंड ब्लॅक शर्टमध्ये दिसत आहे. ही तीच व्यक्ती आहे ज्याच्यासोबत इलियानाने गेल्या महिन्यात एक ब्लर फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर तिने फोटोसह तिच्या गरोदरपणाच्या प्रवासावर एक लांबलचक चिठ्ठी लिहिली.(ileana d’cruz boyfriend)

इलियाना डिक्रूझ विवाहित आहे की नाही? हे स्पष्टपणे सांगता येणार नाही, कारण त्यांनी अद्याप त्यांच्या लग्नाबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. ती गरोदरपणाबद्दल पोस्ट केली होती . आणि तेव्हा तिने आपल्या जोडीदाराच्या पाठिंब्याबद्दल लिहिले होते की, “जेव्हा मी स्वत:ला चांगले वागवत नाही, तेव्हा ही सुंदर व्यक्ती माझ्यासाठी खडकासारखी उभी राहते. जेव्हा त्याला वाटतं की मी ब्रेकअप करणार आहे, तेव्हा तो मला जवळ घेतो आणि माझे अश्रू पुसतो.”इलियाना पुढे लिहीते, ‘तो मला हसवण्यासाठी विनोद करतो. जेव्हा मला याची सर्वात जास्त गरज वाटते तेव्हा तो मला मिठी मारतो आणि मग काहीही अवघड वाटत नाही,”

इलियाना आणि तिच्या बॉयफ्रेंडचा ब्लर फोटो पाहून चाहते बॉयफ्रेंडची तुलना विजय देवरकोंडा, यश आणि क्रिकेटर मोईन अली शी करत होते.18 एप्रिल रोजी इलियाना डिक्रूझने ब्लॅक अँड व्हाईट फोटोच्या माध्यमातून आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला होता. चित्रात एक खास पेंडंट होतं ज्यावर ‘आई’ लिहिलं होतं, ज्यात तिच्या लहान मुलाचा संकेत होता.(ileana d’cruz boyfriend)
==========================
==========================
यापूर्वी इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबेस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याची माहिती समोर आली होती. हे सर्व जण 2022 मध्ये कतरिना, विकी कौशल, सेबॅस्टियन आणि इतरांसोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसले होते तेव्हा डेटिंगच्या अफवांना सुरुवात झाली होती.