दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
Priyanka Chopra Birthday: प्रियंकाला करावा लागला होता वर्णभेदाचा सामना; आज हॉलीवुड मध्ये काम करुन कमावते करोडो रुपये
बॉलीवुड सह हॉलीवुडमध्येही आपल्या कामने नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे पिकी चोप्स अर्थात प्रियंका चोपड़ा. आज प्रियंका तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रियांका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असते जेवढी बोल्ड अंदाजात प्रियांका प्रेक्षकांना स्क्रीन वर दिसते तितक्याच मोकळेपणाने ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलबोलताना सुद्धा पहायला मिलते. २००० साली मिस वर्ल्ड स्पर्धेची विजेती ठरलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राला आज कुठल्याही परिचयाची गरज नाही. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही तिने नाव कमावले आहे. प्रियांकाने आपल्या सौंदर्याने आणि तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्रियांका चोप्राचा जन्म 18 जुलै 1982 रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथे झाला. तिचे वडील पंजाबमधील अंबाला येथील होते तर आई झारखंडची आहे. प्रियांकाने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी २००० मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता.(Priyanka Chopra Birthday)
प्रियंकाला आज आपण ज्या स्थानावर पाहत आहोत तिथे पोहोचणे तिच्यासाठी सोपे काम नव्हते. या साथी टीला अनेक कठीण परीस्थितीचा सामना करावा लागला होता. प्रियांका चोप्राला लहानपणापासूनच अनेकदा रंगभेदाला सामोरे जावे लागले.अनेकदा तिच्या सावळ्या रंगाबद्दल घाणेरड्या कमेंट्स तिच्यावर केल्या जात होत्या.जेव्हा ती फक्त १३ वर्षांची होती, तेव्हा तिच्या आई-वडिलांनी तिला शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवले होते, जिथे अमेरिकन लोक तिच्या सावळ्या रंगामुळे तिला खूप चिडवायचे. याच कारणामुळे प्रियांका चोप्रा गुपचूप बाथरूममध्ये लंच करायची. शाळेत तिला अनेकदा त्रास दिला गेला त्यामुळे तिला तिच्या त्वचेच्या रंगाबद्दल अनेकदा कमी आत्मविश्वास वाटायचा. प्रियांका जेव्हा भारतात परतली तेव्हा तिच्या लाईफस्टाईल आणि ड्रेसमध्ये बराच बदल झाला होता. ती काळापेक्षा अधिक मॉर्डन झाली होती आणि तिचे वडील अशोक चोप्रा यांना तिचा तो बदललेला दृष्टिकोन अजिबात आवडला नव्हता. त्याच दरम्यान, वयाच्या 17 व्या वर्षी तिने एका स्थानिक सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला, त्यानंतर प्रियांकाची शहरात चर्चा होऊ लागली. प्रियांका चोप्राला तिच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला मात्र तरीही ती हरली नाही आणि तिने आपला स्वतःचा वेगळ स्थान निर्माण केल.
अमेरिकेहुन परत आल्यानंतर प्रियंकाला तिचे जीन्स, टी-शर्ट टॉप अशा सर्व वेस्टर्न कपडे घालून दिले जात नव्हते आणि ते सर्व कपडे एक बॅग मध्ये भरून ठेवले जायचे.आणि जेव्हा जेव्हा ती बाहेर जायची तेव्हा तिला भारतीय पारंपारिक ड्रेस घालण्याची सक्ती केली जायची, मात्र मधल्या काळात तिच्या आईने प्रियांकाच्या स्वप्नांना मॉडेलिंगबद्दल एक नवीन प्रेरणा दिली.तामिझान (२००२) या तामिळ चित्रपटातून प्रियांकाने आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि ‘द हिरो’ (२००३) या चित्रपटापासून तिचा बॉलिवूडमधील प्रवास सुरू झाला. प्रियांका चोप्राने ‘हिरो’ चित्रपट केल्यानंतर ‘अंदाज’ या चित्रपटातून उंची गाठली. मात्र त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘प्लॅन’, ‘किस्मत’ आणि ‘इम्पॉसिबल’ या सलग तीन चित्रपटांचा बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर फारसा परिणाम झाला नाही. (Priyanka Chopra Birthday)
=========================
हे देखील वाचा : शहनाज गिलला नवरीसारख पाहून; नेटकऱ्यांना आली सिद्धार्थ शुल्का ची आठवण
=========================
प्रियांकाच्या वारंवार फ्लॉप चित्रपटांमुळे तिची कारकीर्द संपल्याचे बोलले जात असतानाच ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटाने प्रियांकाच्या कारकिर्दीला पुन्हा एकदा उंचीवर नेले ज्यात तिने बरीच वाहवा मिळवली. ‘ऐतराज’ हा चित्रपट प्रियांकाच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारूनही करिना कपूरपेक्षा प्रियांका चोप्राचे जास्त कौतुक झाले होते.