Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Project K: ‘प्रोजेक्ट के’मधील दीपिका पदुकोणचा लूक आला समोर;अभिनेत्रीच्या इंटेन्स लूकने उडवले चाहत्यांचे होश
दीपिका पदुकोण बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रतिभावान आणि व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका पदुकोणकडे आजकाल अनेक प्रोजेक्ट्स आहेत, ज्याची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. दीपिका पदुकोणचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ हा त्यापैकीच एक प्रोजेक्ट आहे. नुकताच निर्मात्यांनी ‘प्रोजेक्ट के’मधील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. दीपिका पदुकोणचा इंटेन्स लूक पाहिल्यानंतर चाहतेही आता तिच जोरदार कौतुक करत आहेत.‘प्रोजेक्ट के’ २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या मोस्ट अवेटेड सायन्स फिक्शन चित्रपटातील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक निर्मात्यांनी रिलीज करताच सोशल मीडियावर त्याची चर्चा हपु लागली आहे. विशेष म्हणजे रात्री उशिरा निर्मात्यांनी दीपिकाचे हे पोस्टर रिलीज केले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, कमल हसन आणि दिशा पटानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सोमवारी संध्याकाळी ५ वाजता हे पोस्टर प्रदर्शित करण्यात येईल, अशी घोषणा निर्मात्यांनी केली होती, मात्र तसे न करता रात्री हे पोस्टर रिलीज करण्यात आले.(Project K First look)

वैजयंती मुव्हीजच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलने ‘प्रोजेक्ट के’ मधील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केला आहे. पोस्टरमध्ये दीपिका पदुकोणचा इंटेन्स लूक दिसत असून ती काहीतरी बघताना दिसत आहे. पोस्टरमध्ये दीपिकाचा पोशाख काहीसा हटके दिसत आहे. निर्मात्यांनी मोठी घोषणा केली होती की चित्रपटाचा टीझर २१ जुलै रोजी भारतात प्रदर्शित केला जाईल. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त दीपिका पदुकोणकडे शाहरुख खानचा ‘जवान’ आणि हृतिक रोशनचा ‘फायटर’ देखील आहे. तसेच दीपिका पदुकोण पहिल्यांदाच अजय देवगणसोबत ‘सिंघम 3’ मध्ये सुद्धा दिसणार आहे.

प्रोजेक्ट के मध्ये यापूर्वी टाइम स्क्वेअरवर एक होर्डिंग होते. तर या चित्रपटाची पहिली झलक सॅन डिएगो कॉमिक कॉनमध्ये दाखवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या कार्यक्रमाला कमल हसन, दीपिका पदुकोण, प्रभास आणि नाग अश्विन देखील उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांनी या चित्रपटाविषयी बंदी घातली होती, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.(Project K First look)
========================
========================
‘प्रोजेक्ट के’ पुढील वर्षी १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट केवळ हिंदीच नाही तर तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र, अनेक नावांची चर्चा नक्कीच होत आहे.