
Badshah Viral Video: परफॉर्म करताना बादशाह स्टेजवरून पडला खाली? रॅपरने सांगितली व्हिडिओ मागची खरी गोष्ट
रॅपर बादशाह सोशल मीडियावर खुप चर्चेत आला आहे. आणि त्याच कारण ही तसेच आहे. आतापर्यंत आपण पाहिल आहे की, बादशाह त्याच्या गाण्यांमुळे आणि अभिनयाने नेहमीच चर्चेत असतो, पण यावेळी चर्चेचा विषय काही वेगळाच आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दिसणारी व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या स्नीकर्समध्ये काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि मॅचिंग शॉर्ट सह दिसत आहे. गर्दीसमोर स्टेजवर परफॉर्म करताना तो अगदी रॅपर बादशाहसारखा दिसतो. तेवढ्यात तो अचानक प्रचंड गर्दीसमोर पडतो. ज्यानंतर स्टेजवर उपस्थित असलेली टीम लगेच त्यांना सावरण्यासाठी पुढे सरसावते, ही क्लिप पाहिल्यानंतर आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आहे की स्वतःहा बादशाह ने या क्लिपचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने व्हिडिओची सत्यता सांगितली आहे.(Badshah Viral Video)