Rahul Gandhi यांच्या बरोबर लग्न करण्यास Sherlyn Chopra तयार; मात्र ठेवली ‘ही’ अट !
बोल्ड शूटसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शर्लिन चोप्रा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकतंच तिने एक वक्तव्य करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अचानक तिचे नाव काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याशी जोडले जाऊ लागले आहे. खरं तर शर्लिन चोप्रा काँग्रेस नेत्यासोबत सेटल होण्याचं स्वप्न पाहत आहे. तिने राहुल गांधींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका प्रश्नाच उत्तर देताना ती म्हणाल्या, ‘मला राहुल गांधींशी लग्न करायचे आहे. मात्र, याबरोबर तिने एक अटही घातली आहे.(Sherlyn Chopra on Rahul Gandhi)
शर्लिन चोप्रा टीव्ही शो बिग बॉस 3 ची स्पर्धक आहे. शर्लिन सोमवारी थाई हाय स्लिटसह सुंदर ऑफ शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली.याबरोबर तिने चाहत्यांसोबत सेल्फी ही काढले. यावेळी तिला एक प्रश्न विचारण्यात आला की, तुला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी लग्न करायचे आहे का? त्याला उत्तर देताना शर्लिनने होकार दिला. पण लग्नानंतर आपलं आडनाव बदलू नये, अशी अट तिने यावेळी घातली. तिचे हे विधान सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.आपल्या बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाणारी शर्लिन चोप्रा नुकतीच पुन्हा एकदा माध्यमांचे लक्ष वेधून घेत आहे. शर्लिनने राहूल गांधी यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य खुप व्हायरल होत असून माध्यमांशी केलेल्या मजेशीर संभाषणाचा व्हिडिओ ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनेकदा पॅपाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होणारी शर्लिन नुकतीच वांद्रे बँडस्टँडवर दिसली. तिने हलक्या गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस क्रॉप टॉप, काळ्या रंगाचा मिनी स्कर्ट आणि हँगिंग इयररिंग्स घातले होते. त्या पादचाऱ्यांसोबत सेल्फी काढण्यात व्यस्त असताना एका पत्रकाराने त्यांना राहुल गांधी यांच्याशी लग्न करण्याबद्दल विचारले. यावर शर्लिन म्हणाली, ‘हो, का नाही. पण लग्नानंतरही मला माझं आडनाव बदलायचे नाही . म्हणजेच शर्लिन चोप्रा आपल्या नावासोबत गांधीं हे लावणार नाही अशी अट तिने घातली.(Sherlyn Chopra on Rahul Gandhi)
=====================
=====================
शर्लिनच्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असले तरी राहुल गांधी यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आणि यावर ते काही बोलणार का याकडेच आता सगळ्यांच लक्ष लागून राहिले आहे.