Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘सावली होईन सुखाची’ मधील ‘बिट्टी’ उर्फ आरंभी उबाळे आहे ‘वन टेक आर्टिस्ट

 ‘सावली होईन सुखाची’ मधील ‘बिट्टी’ उर्फ आरंभी उबाळे आहे ‘वन टेक आर्टिस्ट
kalakruti-bitti-aka 'aarambhi-ubale-from-savali-hoin-sukhachi-is -one-take-artists-marathi-info/
टीव्ही वाले

‘सावली होईन सुखाची’ मधील ‘बिट्टी’ उर्फ आरंभी उबाळे आहे ‘वन टेक आर्टिस्ट

by शुभांगी साळवे 27/08/2023

‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सावली होईन सुखाची‘ या नव्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केलेली आहे. हल्ली प्रमुख कलाकारांपेक्षा बाल कलाकार हे जास्त चर्चेचा विषय बनले आहेत. मनोरंजन सृष्टीत मोठ्या कलाकारांइतकाच जास्त भाव बालकलाकारांना मिळतोय. अर्थात, त्यांच्यामध्ये असणा-या कलेची दाद दिलीच पाहिजे. वयाने लहान असूनही कॅमे-यासमोर बिनधास्तपणे वावरण्याची त्यांना अजिबात भीती वाटत नाही, त्यांच्या प्रत्येक कामात आत्मविश्वास जास्त दिसून येतो, दिग्गज कलाकारांच्या सोबतीने काम करणं असो किंवा सीन्सचे पाठांतर, सीन्सनुसार लागणारे हावभाव सगळं काही अगदी अचूक असतं. बालकलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे आणि त्यातील एक नाव म्हणजे आरंभी उबाळे. घारे डोळे, गोंडस चेहरा, निरागस हास्य आणि अभिनयाच्या बाबतीत तर कमाल मुलगी अशी आरंभीची ओळख होते. (Child Actress Aarambhi Ubale)


‘सन मराठी’वरील ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेत बालकलाकार आरंभी उबाळे ही ‘बिट्टी’ची भूमिका साकारत आहे. १४ ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या मालिकेतील आरंभीने साकारलेली ‘बिट्टी’ची भूमिका सर्वांनी पाहिलीच असेल. आरंभीचा गोडवा हा बिट्टीमध्ये उतरला आहे, म्हणजे बिट्टी हे पात्रं प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा तयार करणार यात शंका नाही.आरंभीला तिच्या वयाच्या अडीच वर्षापासून कॅमेरासमोर कसं वावरायचं या विषयी योग्य असे मार्गदर्शन तिच्या आईकडून मिळाले आणि त्याचा फायदा तिला पुढे झाला. आरंभीने जाहिरातीत काम केले आहे. ‘गुम है किसीं के प्यार में’ आणि ‘अनुपमा’ या दोन हिंदी मालिकेत आणि ‘क्षण’ या मराठी शॉर्ट फिल्ममध्ये अभिनय केला आहे. मराठीमध्ये काम करण्याची तिची इच्छा ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झाली. आरंभीचे कौतुक झालेच पाहिजे हे म्हणण्यामागे कारण की, आरंभी ही ‘वन टेक आर्टिस्ट’ आहे. ‘एकाच टेकमध्ये परफेक्ट शॉट देणारी बालकलाकार’ असे सेटवर अनेकांचे मत आहे. दिवसभर सेटवर असणारी आरंभी अभ्यास देखील मनापासून करते.

अभिनय आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींमधला समतोल आरंभी आणि तिच्या आई-वडीलांनी सांभाळला आहे. मुळात, घरातील शिस्तप्रिय वातावरण असल्यामुळे आरंभीमध्ये समजूतदारपणा, मेहनत करण्याची तयारी, मोठ्यांप्रती, कामांप्रती आदर करण्याचा स्वभाव हा आपसूक आला आहे.‘सावली होईन सुखाची’ या मालिकेत आरंभी, प्रमुख कलाकार रोनक शिंदे आणि सीमा कुलकर्णी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करत आहे. या मालिकेत आईची संघर्षमय गोष्ट दाखवण्यात आली आहे जी आपल्या मुलीला घेऊन एका मोठ्या श्रीमंत घरात राहतेय पण ती मालकीण नसून, घरातील मोलकरीण आहे.(Child Actress Aarambhi Ubale)

 ===================

हे देखील वाचा: ‘सावली होईन सुखाची’ नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

===================

आरंभी आणि सीमा कुलकर्णी यांनी माय-लेकीची भूमिका साकारली आहे.त्यांच्या आयुष्यात नेमकं काय काय घडतं आणि त्या दोघी प्रत्येक परिस्थितीला कशा सामो-या जातात हे लवकरच समजेल,

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Child Actress Aarambhi Ubale Sawali Hoin Sukhachi New Serial sun marathi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.