दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सरोज खानसोबत रिहर्सल करण्यासाठी तयार नव्हती रेखा…
बॉलीवूडसारख्या मायानगरीमध्ये एखादा कलाकार तेव्हाच बराच काळ टिकून राहतो, जेव्हा तो आपल्या कलेसोबत स्वतःला शिस्त लावून आपल्या कामावर एककेंद्रित असतो, प्रवाहाला किंवा स्टार डमला भुरळून न जाता व्यावसायिकता जपतो, अभिनेत्री रेखा हे याच गोष्टीसाठी इंडस्ट्रीमध्ये मानलं जाणारं नाव ! आपल्या तत्वांना जपत कामाशी काम ठेवणाऱ्या रेखाने आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये आपलं महत्वाच स्थान निर्माण केलं, पण यासोबत तिने केलेल्या किंवा तिच्यासोबत झालेल्या काही कॉंट्रोवर्सीमुळे ती प्रेक्षकांसाठी गॉसिपचा विषय बनली. (Saroj Khan)
अशीच एक गॉसिपच कारण झालेली कॉंट्रोवर्सी घडली रेखा आणि बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध व ज्येष्ठ कोरियोग्राफर सरोज खान (Saroj Khan) यांच्यामध्ये ! आज सरोज खान आपल्यात नाही पण त्या सदैव आपल्याला त्यांच्या गाण्यांमधून, कोरियोग्राफी आणि किस्स्यांमधून आठवत राहतील; असाच त्यांचा फिल्म इंडस्ट्रीसाठी यादगार झालेला किस्सा होता रेखा आणि सरोज खान यांच्यामधल्या कॉंट्रोवर्सीचा. जेव्हा सरोजजींनी रेखासाठी (Saroj Khan) शेषनाग या फिल्मसाठी कोरियोग्राफी केली होती, त्यांच्या मते ते त्यांच्यासाठी आयुष्यातलं खूप कठीण काम होतं. १९८९ मध्ये सरोज खान हे फिल्म इंडस्ट्री मधलं खूप मोठं नाव होतं, त्यांच्या कोरियोग्राफी मधून त्यांनी माधुरीला मोहिनी म्हणून प्रेक्षकांच्या समोर आणलं आणि मोहिनीच्या रूपाने माधुरी बॉलीवूडमध्ये गाजलीसुद्धा !
‘शेषनाग’च्या आधी आलेल्या ‘नगिना’ फिल्ममधून श्रीदेवीच्या ‘मै नागीन तू सफेरा’ या गाण्याने प्रेक्षकांना थक्क करून सोडलेलं, या गाण्याची कोरियोग्राफी सरोज खान यांनीच केलेली. ‘शेषनाग’ ही फिल्म ‘नगिना’ या फिल्मचा रेकॉर्ड तोडून वरचढ ठरावी असा उद्देश त्या फिल्मच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा होता त्यामुळे या फिल्ममध्येही प्रेक्षकांना आवडेल आणि ट्रेंड होईल असं गाणं त्यांनी बनवलं आणि कोरियोग्राफीची जबाबदारी दिली ‘मै नागीन तू सफेरा’ या गाण्याला आपल्या कोरियोग्राफीने हिट बनवणाऱ्या सरोजजींकडे ! (Saroj Khan)
पण तालमीसाठी कमी वेळ दिल्यामुळे रेखा शूटच्या काही दिवसापूर्वी तालमीसाठी यावी, असं सरोजजींच म्हणणं होतं ! पण कोणत्यातरी शूटवर असल्यामुळे ती तालमीसाठी येऊ शकणार नाही अशी खबर सरोजजींना मिळाली. शेवटी शूटिंगचा दिवस उजडला सरोजजी सेटवर रेखाची वाट बघत होत्या, पण रेखा तिच्या गाडीतून उतरायला तयार नव्हती, तेव्हा सरोजजी स्वतः गाडी जवळ जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागल्या.
सरोजजींनी रेखाला या सगळ्याच कारण विचारताच रेखा (Saroj Khan) आपण आजारी आहोत आणि शूट नाही करायचं असं सांगू लागली, पण सरोजजींना तिच्या बोलण्यातून काहीतरी वेगळं कारण आहे असं जाणवलं तेव्हा ‘तुम्हाला जर मी कोरियोग्राफर म्हणून नको आहे तर तुम्ही मला बदलू शकता’ असं म्हणाल्या; त्यावर रेखा ‘मी शूटिंग करणार असं’ म्हणून तयार झाल्या आणि त्यांनी सरोजजींनी शिकवल्याप्रमाणे तंतोतंत त्यांच्या पद्धतीने डान्स केला. थोड्या वादविवादानंतर तयार झालेलं गाणं यशस्वी झालं खरं, पण इंडस्ट्रीमध्ये एका कानाची खबर दुसऱ्या कानी जायला वेळ लागत नाही. या वादाला तेव्हाच्या मीडियाने खतपाणी घालून बऱ्याच अफवा पसरवल्या.
========
हे देखील वाचा : Chotya Bayochi Motthi Swapn: अभिनेत्री विजया बाबर दिसणार बयोच्या भूमिकेत!
========
पुढे एका मुलाखतीत या वादाचा खुलासा करताना सरोजजींनी सांगितलं की, बॉलीवूड मधल्या दिग्गज कलाकारांचे स्वतःचे आवडते कोरियोग्राफर असतात आणि त्यांना त्यांच्यासोबत काम करण्याची सवय असल्यामुळे वेगळ्या कोरियोग्राफर सोबत काम करताना त्यांना थोडं अवघड जाऊ शकतं काही कारणांमुळे यावेळी रेखाजींचे कोरियोग्राफर या प्रोजेक्टसाठी काम करू शकले नाही. पण ही गोष्ट कलाकार म्हणून समजून घेण्यासारखी आहे, त्यामुळे झाल्या वादानंतर हा विषय आम्ही एकमेकांशी बोलून मिटवला देखील आणि एकत्र कामही केलं.