दो बेचारे बिना सहारे, देखो पूछ पूछ कर हारे…
सत्तरच्या दशकात अशोककुमार आणि प्राण या जोडीने अनपेक्षितपणे एकत्र येऊन लोकप्रियतेचा नवा उच्चांक गाठला. १९७३ साली दिग्दर्शक ब्रिज सदाना यांनी या दोघांना ’व्हिक्टोरीया नं. २०३’ या सिनेमात राजा आणि राणा या भूमिकेत घेतले आणि संपूर्ण सिनेमात (Cinema) या जोडीने धुमाकूळ घातला. सिनेमाचे (Cinema) कथानक अतिशय वेगवान होते.(जेम्स हॅडले चेसच्या ’देअर इस हिप्पी ऑन द हाय वे’ शी जवळीक साधणारे होते) ’लपवलेल्या हिर्याचा शोध’ अशी सिंगल लाईन असलेल्या कथेची पटकथा के ए नारायण (जॉनी मेरा नाम फेम) यांची होती. सिनेमाचे दिग्दर्शन ब्रिज सदाना यांचे होते. सिनेमात नवीन निश्चल आणि सायरा बानू ही जोडी होती. सोबतीला रणजित,अनवर हुसेन आणि मोहन चोटी हे कलाकार होते. अतिशय लो बजेट असलेल्या या सिनेमाने फार मोठे यश मिळविले.
अशोककुमार आणि प्राण या दोघांवर चित्रीत ’दो बेचारे बिना सहारे देखो पूछ पूछ कर हारे’ या गाण्याने कहर लोकप्रियता मिळवली. या सिनेमातील हे गाणे वर्मा मलिक यांनी लिहिले होते, बाकी सर्व गाणी इंदीवर यांनी लिहिली होती. या सिनेमाने यशस्वीतेचा एक नवा पायंडा जन्माला घेतला. चरीत्र नायकांच्या जोडीने सिनेमाला यश मिळू शकते हे सिध्द झालं. हे दोघे यापूर्वी अनेक सिनेमात एकत्र आले होते. या दोघांचा पहिला सिनेमा (Cinema) होता १९५१ सालचा ’अफसाना’. पण त्यावेळी प्राण खलनायक होता.
पुढे अनेक सिनेमात (Cinema) ते एकत्र आले पण या सिनेमाची मजा काही औरच होती. कल्याणजी आनंदजींच्या संगीतातील ’तू ना मिली तो हम जोगी बन जायेंगे, देखा मैने देखा ही दोन किशोरची आणि ’थोडासा ठहरो करती हूं तुमसे वादा’ हे लताचे गाणेही पब्लिकला आवडले. विशेषत: ’थॊडासा ठहरो’ हे कॅबरे सदृष्य गीतातील सायराची मादक ’सिडक्टीव्ह’ अदा तरूणाईला गुदगुल्या करणारे होते. नवीन निश्चल करीता या सिनेमाचे यश फार महत्वपूर्ण होते. या सिनेमासाठी (Cinema) प्राणला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचे फिल्मफेअर नामांकन मिळाले होते.
सिनेमाचे (Cinema) यश पाहून या दोघांना केंद्रस्थानी ठेवून सिनेमे बनविण्याची लाटच आली. चोरी मेरा काम.अपना खून, राहू केतू ,चोर के घर चोर , राजा और राणा .. पण एकाही सिनेमाला इतके व्यापक यश नाही मिळू शकले. या सिनेमाची मोहीनी राजकपूरवर देखील पडली होती. कारण १९७६ साली शम्मीकपूर सोबत आलेला ’दो जासूस’ वर या सिनेमाचा (Cinema) प्रभाव होता. या सिनेमाचा १९७४ मध्ये तेलगूमध्ये ’अन्दारू डोंगले’ या नावाने तर तमीळमध्ये १९७५ साली ’वाईराम’ या नावाने आला होता. २००७ साली ब्रिजच्या मुलाने २००७ साली हिंदीत याच नावाने रीमेक बनविला.
==========
हे देखील वाचा : शर्टच्या अदलाबदलीने दोन कलाकार बनले जिगरी दोस्त…
==========
अनुपम खेर आणि ओम पुरी यांना घेतले. ’दो बेचारे’ हे गाणे पुन्हा वापरले पण यश नाही मिळालं. आता एक हळवी आठवण या सिनेमाच्या (Cinema) दिग्दर्शका विषयी. साठ आणि सत्तरच्या दशकातील एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून ब्रिज यांनी ख्याती मिळविली होती.उस्तादोंके उस्ताद, यकीन, प्रोफेसर प्यारेलाल हे त्यांचे सिनेमे चांगले हिट होते. एकेकाळची गाजलेली अभिनेत्री सईदा खान त्यांची बायको. २१ ऑक्टोबर १९९० रोजी मात्र रागाच्या भरात ब्रिजने आपली बायको, मुलगी यांना गोळ्या घालून मारून टाकले. व स्वत: आत्महत्या केली.कमल सदाना या त्यांच्या मुलाचा त्या दिवशी वाढदिवस असल्याने तो बचावला पण स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला आपल्या कुटुंबीयांचा असा दुर्दैवी अंत पाहावा लागला.