ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
Are La Kare Marathi Drama:’रोहन गुजर’ करतोय ‘अरे ला कारे’!
या रंगभूमीवर घडलेल्या प्रत्येक कलाकाराला कोणत्याही माध्यमात काम करत असताना आपल्या मनातली रंगभूमीची ओढ नेहमीच असते. रंगभूमी मग ती कोणतीही असो प्रायोगिक वा व्यावसायिक कलाकाराला ती मायेची उब आणि प्रेक्षकांचं प्रेम निस्वार्थ देते. याच प्रेमापोटी अनेक कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर दिसू लागले असताना एक कलाकार व्यावसायिक नाटकाच्या सोबतीने प्रायोगिक रंगभूमीवर आता दिसणार आहे.तो कलाकार म्हणजे ‘रोहन गुजर’. आमने सामने हे व्यावसायिक रंगभूमीवर सुरु असताना त्याच बरोबरीला ‘नवी जन्मेन मी’ या नवीन मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार रोहन आता ‘अरे ला कारे‘ या प्रायोगिक नाटकात महत्वाची भूमिका करत आहे. मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने या नवीन प्रायोगिक नाटकात तो काम करत असल्याचं जाहीर करत आहे.रंगभूमीवर येणार हे नवीन प्रायोगिक नाटकाच्या संहितेचा प्रवास एका चर्चेतून सुरु झाला त्यातून एकांकिका घडली आणि त्या एकांकिकेचे आता नाटक होत आहे. मालिकेच्या व्यस्त चित्रीकरणातून वेळ काढून दोन्ही नाटकाच्या प्रयोगांसाठी रोहन सध्या सज्ज होत. व्यावसायिक नाटकांचे प्रयोग आणि मालिका यांच्यासमवेत रोहन प्रायोगिक नाटकाला सुद्धा प्राधान्य देत आहे.(Are La Kare Marathi Drama)
या प्रायोगिक नाटकात रोहन सोबत तब्बल ५० नवीन चेहरे दिसणार आहेत. एका जंगलात घडणाऱ्या या गोष्टीचा मुख्य घटक रोहन साकारत आहे. लिव्ह इन रिलेशनशिप बदल एक महत्वाची गोष्ट सांगणाऱ्या आमने सामने या नाटकातील साहिल तर त्याच बरोबर मातृत्वाकडे एका स्वतंत्र दृष्टीकोनातून बघणारा ‘नवी जन्मेन मी’ या मालिकेतील सुजित आणि आता पुन्हा एक नवीन पात्र ‘अरे ला कारे’ या दीर्घांकात रोहन साकारत असून या पात्राच्या नजरेतून एक वेगळं दुर्लक्षित जग अनुभवायला मिळणार आहे. भय, गूढता, रोमांच असे सगळेच घटक या प्रायोगिक नाटकाच्या निमित्त प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या प्रायोगिक नाटकाचा लेखक दिग्दर्शक राजरत्न भोजने सांगतो ‘तात्विक विचार करता जगातल्या विविध घटनांनी आपल्यासमोर नवे प्रश्न निर्माण केले.
वातावरणाच्या उलथापालथीत अभिरुचीचे रंग बदलत असताना कला जाणिवा सुद्धा बदलतात अशात या प्रायोगिक नाटकांच्या निमित्ताने आताच्या एका महत्वाच्या घटकाचा विचार आम्ही मांडत आहोत. हा विचार मांडत असता तो विचार संवेदनशील कलाकाराने मांडावा आणि तो कलाकार मला रोहन गुजरच वाटला, त्यात मी संहिता दिल्यानंतर फक्त दीड तासात लगेच आपण करूयात अस सांगण्यासाठी त्याचा फोन, याच सकारत्मक विचाराची मला गरज आहे असं त्यावेळी मला वाटलं. आणि तिथून या नाटकांच्या घडण्याचा प्रवास सुरु झाला. तर या प्रायोगिक नाटकाच्या निमित्ताने रोहन सांगतो ‘लग्न आणि लिव्ह इन बद्दल बोलणार आमने सामने माझ पाहिल व्यावसायिक नाटक. अमेरिका ऑस्ट्रेलिया सिंगापूर कतार असा प्रवास करता करता३०० प्रयोगाचा टप्पा गाठतय तर आईपणाकडे स्वतंत्र आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या दोन तरुणांची गोष्ट हा नवी जन्मेन मी मालिकेचा विषय तर अरे ला कारे हया दीर्घांकात सध्याच्या परिस्थितीवर सध्या नैसर्गिक जाणिवेवर अतिशय मनोरंजकपणे राजरत्न भोजने मांडू पाहतो.(Are La Kare Marathi Drama)
======================
======================
बऱ्याचदा काही विषयांवर व्यक्त व्हायचं असतं पण फक्त माणूस म्हणून व्यक्त होण्यापेक्षा एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून व्यक्त होता आलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतं आणि माझ्या ह्या तिन्ही गोष्टींमध्ये मला तेच साध्य करण्याचा प्रयत्न करायचं. तीनही माध्यमांची लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद वेगवेगळी आहे. कलाकाराने अभिनयाच्या आणि माध्यमांच्या शक्यता पडताळत राहील पाहिजे आणि मी तेच करणायचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.