ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
चतुर रामलिंगम उर्फ ओमी वैद्य: कहाँ गया उसे ढुंडो !
बॉलिवूडमधील सुपर डुपर हिट फिल्म म्हणजे ३ इडियट्स ! त्यात ३ इडियट्स जेवढे चमकले तेवढाच भाव खाऊन गेला चतुर रामलिंगम म्हणजे ओमी वैद्य ! त्याची बोलण्याची स्टाइल तर सगळ्यात हटके होती. अर्धी तोडकी मोडकी हिंदी त्याला अमेरिकन अक्सेंटचा तडका आणि वर्गातील सगळ्यात हुशार मुलांच्यात जो नर्डीपणा असतो ज्यात ते शिक्षकांची खुशामत करतात, दुसऱ्यांना मागे खेचून पुढे जायचा प्रयत्न करतात आणि बऱ्याच छटा ओमीने खूप सहजतेने पडद्यावर साकारल्या होत्या. ३ इडियट्स मधील हिरोंना डोक्यावर घेतले गेले त्याचे एकमेव कारण चतुर होता पण आजही त्या हिरोंबरोबर चतुरही आपल्या मनात आहे. (Omi Vaidya)
ओमी वंशाने (Omi Vaidya) भारतीय आहे आणि त्याचा जन्म अमेरिकेत कॅलिफोर्निया इथला आहे. त्याच्या कुटुंबात दोन डॉक्टर आहेत एक त्याचे वडील आणि एक त्याचा मोठा भाऊ. वडिलांना वाटले होते की, ओमी आपल्यासारखा डॉक्टर होईल पण ओमीच्या आईला त्याने ऍक्टर व्हावे असे मनोमन वाटत होते आणि तिने त्याला वयाच्या ४-५ वर्षापासूनच डान्स आणि ऍक्टिंगची ट्रेनींग द्यायला चालू केले होते. ओमीला हळूहळू लोकांना एंटरटेन करायला आवडू लागले. वयाच्या ९ वर्षी त्याने अमेरिकेतील मराठी नाट्यमंडळ जॉईन केले. तिथे अनेक नाटकांमध्ये तो बालकलाकारांच्या भूमिका साकारत असे. कॉलेजमध्ये असताना त्याने टीव्ही अँड फिल्म प्रोडक्शन विषय निवडून त्यात ग्रॅज्युएशन केले.
ओमीला प्रोडक्शन मध्ये काहीच रस नव्हता. त्याला एक्टिंग करायची होती. त्याने लॉस एंजेलिस मधील अनेक कास्टिंग एजन्सीचे दरवाजे ठोठावले. त्याला काही सिरीयल मध्ये काम मिळाले पण त्याला लक्षात आले की, जेव्हा यांना अशियन ऍक्टर वापरायची वेळ येते तेव्हाच त्याला काम मिळते. बाकी रोल्स साठी त्याला बोलावले जात नाही. पण तरीही कधीतरी नशीब पालटेल या आशेत तो हे रोल करत राहिला. पुढे नशिबाने कल्टी मारली आणि त्याच्या एका मित्राने त्याला एक महत्वाची खबर सांगितली.ओमीचा हा मित्र विधू विनोद चोप्रा यांच्यासाठी लेखक म्हणून काम करत होता आणि त्याने असे सांगितले की, विधू एक मोठी फिल्म बनवत आहेत आणि ते नवीन चेहरे शोधत आहेत. (Omi Vaidya)
तू तुझी व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठव. ओमीने (Omi Vaidya) त्याला असे सांगितले की, माझी हिंदी काही चांगली नाहीये. मला थोडी काम मिळणार आहे. पण मित्राच्या आग्रहाने त्याने व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि पाठवला. तो या व्हिडिओ बद्दल पूर्णपणे विसरून गेला होता. तब्बल ६ महिन्यांनी त्याला राजू हिरानी यांच्या ऑफिसमधून कोळ आला. त्यांनी त्याला सांगितले की, मुख्य पात्रांची निवड झाली आहे पण तू निराश होऊ नकोस तुझ्यासाठी आम्ही एक नवीन पात्र लिहीत आहोत. फक्त यासाठी काही अटी आहेत त्या तुला पाळाव्या लागतील. त्या अटी अशा होत्या की, ओमीने हिंदी शिकू नये त्यावेळी जसे अक्सेंट वाले हिंदी बोलत होता तसे हिंदी बोलावे, त्याला ६-७ किलो वजन वाढवावे लागेल आणि कमी करावे लागेल. हिंदी फिल्म्स अजिबात बघायच्या नाहीत.
=========
हे देखील वाचा : ‘या’ कपूरने आर के फिल्म्स मध्ये काम करायला दिला नकार
=========
ओमीचे (Omi Vaidya) काही महिन्यात लग्न होते तरीही त्याने या सर्व अटी मान्य केल्या. फिल्मचे शूट पूर्ण झाले आणि प्रीमियरच्या वेळी त्याला कोणीच ओळखत नव्हते. प्रीमियरनंतर सर्व लोक त्याच्यासोबत फोटो काढायला गर्दी केली. या फिल्मनंतर ओमीला बॉलिवूडमधील पुढचा कॉमेडी स्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याच्याकडे अनेक फिल्म्सच्या ऑफर्स येऊ लागले. प्रोड्युसर त्याला आपल्या फिल्ममध्ये घेण्यास उत्सुक झाले. या सर्वांमध्ये ओमीने एवढे भूतो न भविष्यती यश पाहिले नव्हते. त्याने अनेक फिल्म्स त्यांची स्क्रिप्ट ना वाचता स्वीकारल्या.
या सर्व फिल्म्समध्ये त्याच्या चतुर रामलिंगम या पात्राला अतिजास्त प्रमाणात वापरले गेले. या सर्व फिल्म्स फ्लॉप गेल्या. ओमीच्या (Omi Vaidya) बॉलिवूडमधील सर्व आशा संपल्या. त्याने आपले इथलं बस्तान कधी गुंडाळले आणि कधी भारतातून गायब झाला हे कोणालाच कळाले नाही.