Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mahavatar Narsimha : भगवान विष्णूंची बॉक्स ऑफिसवर किमया; बिग बजेट

‘सौतन’ मधील Kishore Kumar यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा मजेदार किस्सा!

Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार

इराण, इटली, पाकिस्तान; परदेशातही वाजला होता Sholay चा डंका!

Jeetendra : ‘आखरी दाव’, खेळ जो रंगलाच नाही…

उपहार : Jaya Bachchan यांच्या मुग्ध अभिनयाने नटलेला अप्रतिम चित्रपट!

Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Bin Lagnachi Gosht Teaser: नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या सिनेमात पहायला मिळणार  प्रिया- उमेशची

‘Ghadhvach Lagn 2: सावळा कुंभार आणि गंगी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

Amjad Khan यांच्या मध्यवर्ती भूमिकेतील ‘हा’ सिनेमा सुपर डुपर हिट

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जेव्हा अभिनेत्री मधुबालाने संपूर्ण युनिटसाठी चक्क जेवण बनवले !

 जेव्हा अभिनेत्री मधुबालाने संपूर्ण युनिटसाठी चक्क जेवण बनवले !
बात पुरानी बडी सुहानी

जेव्हा अभिनेत्री मधुबालाने संपूर्ण युनिटसाठी चक्क जेवण बनवले !

by धनंजय कुलकर्णी 29/11/2023

बी आर चोप्रा यांच्या नया दौर या चित्रपटातील मधुबालाच्या एक्झिटवर मी आधीच एक लेख लिहिला आहे. मधुबालाने बी आर चोप्रा सोबत कॉन्ट्रॅक्ट साइन केल्यानंतर देखील केवळ आउट डोअर लोकेशनला जावे लागेल म्हणून तिने हा चित्रपट सोडला. अर्थात या पाठीमागे मधुबालाचे वडील अताऊल्ला खान होते. दिलीप कुमार आणि मधुबालाच्या प्रेम कहाणीचा इथेच ब्रेकअप झाला. मधुबाला बद्दल त्या काळच्या फिल्मी मॅगझिन मधून उलट बातम्या येत होत्या. (Madhubala)

तिच्या अन प्रोफेशनल बद्दल देखील लोक बोलत होते. कोर्टामध्ये मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेम कहाणीची चर्चा झाली होती. एकूणच मधुबाला (Madhubala) करीता तो कठीण काल होता. पण याच काळात तिने शक्ती सामंत यांच्या ‘इंसान जाग उठा’ (१९५९) या चित्रपटात भूमिका केली होती. या सिनेमाचे  सर्व चित्रीकरण आंध्र प्रदेश मधील नागार्जुन सागर डॅम येथे झाले होते आणि इथे चित्रीकरणासाठी मात्र मधुबाला आउटडोअर शूटला तयार झाली होती ! म्हणजे बघा काही वर्षांपूर्वी ‘नया दौर’  या चित्रपटाचे शूटिंग मध्यप्रदेश इटारसी जवळ होणार होते त्याला तिने नकार दिला होता पण आता आंध्र प्रदेश मधील आउटडोअर शूटिंगला तिने होकार दिला होता. याचे कारण स्पष्ट होते. ‘नया दौर’  चा हिरो दिलीप कुमार होता तर ‘इंसान जाग उठा’ चा हिरो सुनील दत्त होता. अर्थात मधुबालाच्या होकाराचे श्रेय  दिग्दर्शक शक्ती सामंत यांच्या कडे जाते . कारण त्यांनीच तिच्या वडिलांना आता पटवले होते. आणि मधुबाला बाह्य चित्रीकरणासाठी मुंबईपासून लांब आंध्र प्रदेशात पोहोचली होती.

तो काळ भारतातील स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकाचा होता. पंडीत नेहरूंच्या स्वप्नातील भारत घडत होता. मोठमोठे पूल, धरण बांधले जात होते.कारखाने उभारले जात होते.  याच प्लॉटला घेऊन ‘इंसान जाग उठा’ या चित्रपटाचे कथानक होते.  एका मोठ्या धरणाच्या बांधकामाचे ठिकाण व तिथे काम करणाऱ्या रोजंदारीवरील कामगारांची कहाणी होती. देशातील विकास कामाचे मोठे स्वप्न साकार होताना या छोट्या कामगारांच्या कष्टाचे दर्शन येथे घडत होते. मधुबालाला हा चित्रपट करताना खूप आनंद मिळाला.

कारण मागच्या दीड दोन वर्षात तिच्या आयुष्यात आलेल्या वादळामुळे ती बऱ्यापैकी डिस्टर्ब झाली होती. तिला हा आउटडोर शूटिंगचा ब्रेक हवाच होता. तिने या सिनेमाचे शूटिंग खूप एन्जॉय केले. खरंतर या चित्रपटाच्या आधी शक्ती सामंत यांच्या ‘हावडा ब्रिज’ या सिनेमात मधुबाला झळकली होती. त्या सिनेमात मधुबालाचा एक मॉडर्न लुक होता. परंतु शक्तीसामंत यांना या ‘इन्सान जाग उठा’ चित्रपटात  मधुबालाला (Madhubala) ‘गाव की  गोरी’ म्हणून दाखवायचे होते आणि तो त्यांचा हेतू सफल झाला होता. मधुबाला ने त्या चित्रपटाच्या शूट नंतर एका इंग्रजी मासिकाला मुलाखत देताना सांगितले होते की,” या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी आहे सर्वजण कृ मेंबर्स अगदी एका कुटुंबासारखे राहत होतो. मी स्वतः बऱ्याचदा सर्वांसाठी स्वयंपाक करत असे. या चित्रपटात मधुबालाचा (Madhubala) नायक सुनील दत्त सर्व कलाकार आपले ग्लॅमर, आपला  ताक झाक मुंबईला ठेवून येथे अतिशय साधेपणाने जगत होते आणि हा साधेपणाच मधुबाला खूप आवडत होता.

============

हे देखील वाचा : अमिताभचा राजकारणात गेल्यानंतरचा ‘हा’ पहिला सिनेमा

============

हा चित्रपट भलेही बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नसला तरी मधुबाला साठी तो एक आनंदाचा ठेवा होता. It was a tiring yet refreshing experience to get so close to nature and witness the lives of hundreds of people who are helping to build the new India या शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. फिल्मफेअर या मासिकाने मधुबालाचा (Madhubala) चित्रपट कार्यकर्त्यातील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स या सिनेमात होता असे नमूद केले होते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood bollywood update Celebrity Entertainment Featured Unit
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.