मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
‘या’ अभिनेत्यासाठी विमानाचे उड्डाण काही मिनिटांसाठी थांबवले..
१९६२ च्या भारत चीन युद्धामध्ये भारताचा पराभव जरी झाला असला तरी भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढावे म्हणून चित्रपट कलावंतांनी सैनिकांना भेटून त्यांच्यासोबत काही सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले. ‘आपण शूर वीर आहात. आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत’ हा संदेश यातून त्यांना द्यायचा होता. असाच एक ग्रुप अभिनेता सुनील दत्त आणि नर्गिस यांनी तयार केला होता. या ग्रुपचे नाव होते अजंता कल्चरल ग्रुप.
(अजंता हि सुनील दत्त यांची स्वत:ची चित्र निर्मिती संस्था होती) यात अनेक चित्रपट तारे तारका होत्या. हे सर्व कलावंत बॉर्डर वर जाऊन सैनिकांसोबत भेटीगाठी घेत. त्यांची विचारपूस करत. पराजयाने मनात आलेलं नैराश्याचे मळभ दूर करत. त्यांच्यासोबत काही सांस्कृतिक कार्यक्रम करत, गाणे म्हणत, डान्स करत. पराभवाचे दुःख त्यांना विसरायला लावत आणि नव्या जोमाने त्यांना पुन्हा एकदा काम करण्याची स्फूर्ती या कार्यक्रमातून मिळत असे. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जेव्हा या कार्यक्रमाची माहिती कळाली तेव्हा त्यांनी अभिनेता सुनील दत्त यांना दिल्लीत आल्यानंतर भेटण्याचे निमंत्रण दिले. त्यावेळी अजंता कल्चरल ग्रुप हा काश्मीरमधील लड्डाख येथे होता. (Sunil Datt)
सुनील दत्त यांनी पंतप्रधानांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्यांना भेटण्याचे मान्य केले. परंतु ज्या दिवशी त्यांना नेहरूंना भेटायचे होते त्याच दिवशी लडाखमध्ये खूप बर्फवृष्टी झाली. जम्मू-काश्मीरमधील सर्व रस्ते बंद झाले. पुढचे तीन दिवस त्यांना तिथेच थांबावे लागले. त्यानंतर हा गृप जेव्हा दिल्लीला पोहोचला त्यावेळी सुनील दत्त यांना असे वाटले की, आता पंतप्रधानांची काही भेट होणार नाही. कारण त्यांनी आपल्याला जी तारीख दिली होती ती उलटून आता तीन दिवस झाले आहेत. तरी एक चान्स घ्यावा म्हणून त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला आपण आपला ग्रुप दिल्लीत आल्या नेहरू यांनी सर्व ग्रुपचे खूप कौतुक केले आणि ते करत असल्या कामाची प्रशंसा केली. ‘आपण करीत असलेलं कार्य ही एक प्रकारची देशसेवाच आहे’ असे सांगितले. (Sunil Datt)
लडाख येथील त्यांच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती त्यांनी घेतली काय कार्यक्रम केला वगैरे याबद्दल विचारणा केली. सर्व ग्रुप खूप भरभरून पंतप्रधानांना ही माहिती देत होता. परंतु त्याचवेळी सुनील दत्त मात्र थोडे चलबिचल होत होते. त्यावर पंतप्रधानांनी त्यांना विचारलं “काय तब्येत ठीक आहे ना तुमची ?” तेव्हा सुनील दत्त म्हणाले “प्रश्न तब्येतीचा नाही. परंतु आपल्याशी बोलताना आम्ही घड्याळाकडे पाहायचे विसरलो आणि आता आमची फ्लाईट आहे मुंबईला जाण्यासाठी आणि कदाचित ती मिस होऊ शकते. कारण आम्ही अजून इथेच आहोत!” पंतप्रधानांनी सांगितले ,”काही काळजी करू नका. मी व्यवस्था करतो.” पंतप्रधान ऑफिस कडून लगेच दिल्ली एअरपोर्टला फोन करून काही मिनिटांसाठी फ्लाईट थांबवण्यात आली. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सर्व अजंता कल्चरल क्लबच्या सभासदांना एक भेटवस्तू दिली. त्यांच्या कामाचे पुन्हा एकदा कौतुक केले आणि त्यांची विमानतळावर रवानगी केली. विमानतळावर फ्लाईट त्यांचीच वाट पाहत होते. पंतप्रधानांच्या कार्य शैलीचा एक वेगळा पैलू सुनील दत्त पाहायला मिळाला. (Sunil Datt)
==========
हे देखील वाचा : हेमाला एकमेव फिल्म फेअर पुरस्कार मिळवून देणारा सिनेमा
==========
सुनील दत्त यांनी आपली अभिनयाचा प्रवास थांबवल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. १९८४ साली ते पहिल्यांदा मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले. १९८७ साली त्यांनी पंजाब मधील अतिरेक्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ‘मुंबई ते अमृतसर’ ही सद्भावना पदयात्रा काढली. या यात्रेतून त्यांनी जवळपास ५०० ठिकाणी सार्वजनिक सभा घेतल्या. लोकांमध्ये बंधूभाव सौहार्द जागवण्याचा प्रयत्न केला. १९९८ साली पाकिस्तान सरकारच्या निमंत्रणावरणावरून ते त्यांच्या जन्म गावी पंजाब पाकिस्तानात गेले होते. कॉंग्रेस च्या सरकार मध्ये ते काही काळ मंत्री देखील होते. विविध भारती वरील एका मुलाखतीत त्यांनी ही आठवण सांगितली होती.