मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
इंटरव्हल नसलेला पहिला हिंदी सिनेमा
भारतीय सिनेमाच्या तुलनेत मेजॉरिटी हॉलीवुड मूव्हीज कमी वेळाच्या असतात. त्यात एक तर गाणी नसतात आणि महत्त्वाचे म्हणजे इंटरवल देखील नसते ! सिनेमात मध्यंतर झाले की प्रेक्षक थेटरच्या बाहेर जातात आणि कथानकाची लिंक तुटते. चित्रपटाचा एकसंघ अनुभव मिळावा म्हणून हॉलीवुड आणि इतर पाश्चात्य सिनेमांमध्ये इंटरव्हलचा अभाव असतो. आपल्या भारतीय सिनेमांमध्ये मात्र इंटरवल हा आवश्यक असा भाग आहे. कारण त्याच्यामध्ये व्यावसायिक कारणे आहेत. (थिएटरमधील आणि बाहेरील अर्थकारण हा वेगळा आणि संशोधनाचा विषय आहे.) मध्यंतरामध्ये थिएटरच्या बाहेर जी खाद्य संस्कृती असते आणि त्यातून जे अर्थकारण निर्माण होत त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
आज मल्टिप्लेक्सच्या युगामध्ये तर मध्यंतरामध्ये महागडी खाद्यसंस्कृती यावर एक वेगळा लेख होऊ शकतो. पण भारतीय सिनेमामध्ये मध्यंतर ही भारतीय सिनेमाची वेगळी ओळख आहे. पण तुम्हाला माहित आहे का ? भारतामध्ये मध्यंतर नसलेला पहिला हिंदी सिनेमा कोणता होता ? कोणत्या हिंदी सिनेमाने इंटरव्हलचा पायंडा मोडून काढला? तुम्ही सर्वांनी हा सिनेमा बघितलेला आहे. कोणता होता हा सिनेमा ? (Hindi Cinema)
यश चोप्रा दिग्दर्शित १० ऑक्टोबर १९६९ रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा होता ‘इत्तफाक’. राजेश खन्ना, नंदा, सुजित कुमार, बिंदू , इफ्तेकार यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. निर्मिती होती बी आर फिल्म्स ची. खरंतर ‘हमराज’(१९६७) या चित्रपटानंतर बी आर फिल्म्स च्या ‘आदमी और इन्सान’ या चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती. हा एक मल्टीस्टारर सिनेमा होता. धर्मेंद्र, फिरोज खान, मुमताज, सायरा बानो हे मोठे कलाकार या चित्रपटात होते. बी आर चोप्रा दिग्दर्शित हा सिनेमा तयार झाला पण त्याची ट्रायल पहिल्या नंतर काही शॉट्स पुन्हा एकदा शूट करावेत असे सर्वांना वाटले. त्याचे शेड्युल तयार झाले. आणखी चार पाच महिने या री शूट आणि एडीट करण्यासाठी लागणार होते. परंतु त्याच वेळी अभिनेत्री सायरा बानो प्रकृतीच्या इलाजासाठी अमेरिकेला गेली होती. तिचा मुक्काम तीन-चार महिने तिकडेच असणार होता. आता या रिकाम्या वेळात करायचे काय? या छोट्या कालावधीत एक छोटाच लो बजेट सिनेमा तयार करावा असे या दोन भावांना वाटले. सस्पेंस मर्डर सिनेमा काढायचे त्यांनी नक्की केले.
१९६५ मध्ये आलेल्या ‘साइनपोस्ट टू मर्डर’ या अमेरिकन चित्रपटावर याचे कथानक आधारीत होते. सिनेमाचे नाव ठरले ‘इत्तफाक’. या अमेरिकन सिनेमावर साठच्या दशकामध्ये गुजराती मध्ये ‘धुम्मस’ हे नाटक आले होते. ज्यामध्ये सरिता जोशीने प्रमुख भूमिका केली होती. अमेरिकन चित्रपट आणि गुजराती नाटकाचा आधार घेऊन ग रा कामत यांनी सिनेमाची पटकथा लिहिली. अख्तर उल इमाम यांनी या सिनेमाचे संवाद लिहिले. या चित्रपटामध्ये एकही गाणे नव्हते. (एकही गाणं नसलेला हा भारतातील चौथा हिंदी चित्रपट होता. यापूर्वी नौजवान , कानून आणि मुन्ना या चित्रपटात एकही गाणे नव्हते. पैकी कानून हा चित्रपट बी आर फिल्म्स चा च होता आणि त्या चित्रपटात देखील नंदा ने अभिनय केला होता.) या ‘इत्तफाक’ चित्रपटात गाणी जरी नसली तरी त्याचे पार्श्व संगीत जबरदस्त होते. सलील चौधरी यांनी चित्रपटाला पार्श्व संगीत दिले होते. (Hindi Cinema)
हा सिनेमा अवघ्या २८ दिवसात पूर्ण झाला. राजेश खन्ना त्या वेळी ‘सुपर स्टार बनला नव्हता. त्याचा ‘आराधना’ रिलीज व्हायचा होता. तुरुंगातून पळालेला मनोरुग्ण खुनी गुन्हेगारा ची भूमिका राजेश खन्ना अतिशय अप्रतिम रित्या केली होती. त्या काळात या सिनेमाची जाहिरात जबरदस्त केली गेली. ‘एक मनोरुग्ण खुनी तुरुंगातून पळाला आहे तो तुमच्या घरी देखील येऊ शकतो! सावधान!’ असे टीजर देत याची जाहिरात केली गेली. नंदा सारखा सोज्वळ चेहरा असलेली अभिनेत्री गुन्हा करूच शकत नाही याची प्रेक्षकांना खात्री वाटत होती आणि इथेच प्रेक्षक फासत होते. चोप्रांची हि गुगली चालून गेली. त्या वर्षीचा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांना पुरस्कार मिळाला. तसेच सर्वोत्कृष्ट साऊंड चा पुरस्कार या सिनेमासाठी एम पी शेख यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेता राजेश खन्ना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नंदा आणि सर्वोत्कृष्ट सहनायिका बिंदू यांना फिल्मफेअर चे नामांकन मिळाले होते.
=========
हे देखील वाचा : प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या प्रेम अदिब यांचा जीवनप्रवास
=========
या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी राजेश खन्नाचे राज खोसला यांच्या ‘दो रास्ते’ सिनेमाचे देखील शूटिंग चालू होते. ‘इत्तफाक’ सिनेमात त्याला संपूर्ण सिनेमात दाढी दाखवली होती. ती कंटीन्युटी कायम रहावी म्हणून ‘दो रास्ते’ या सिनेमातील एका गाण्यात तो चक्क ‘इत्तफाक’ च्या गेट अप मध्ये दिसला होता. ते गाणे होते ‘ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखे’. या गाण्याच्या शूट साठी तो ‘इत्तफाक’ च्या सेट वरून तिकडे गेला होता. त्यामुळे या गाण्यात त्याला दाढी दिसते ! (Hindi Cinema)
२०१७ साली बी आर चोप्रा यांचे नातू अभय चोप्रा यांनी हेच कथानक याच नावाने काही नवीन ट्विस्ट ॲड करून रुपेरी पडद्यावर आणले पण १९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘इत्तफाक’ ची बरोबरी करू शकला नाही.