‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
महेश भट यांच्यासोबत भांडून अनुपम यांनी मिळवली भूमिका
अनुपम खेर आज हिंदी सिनेमातील एक ग्रेट ऍक्टर म्हणून लोकप्रिय असले तरी सुरुवातीला त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यांचा पहिला गाजलेला चित्रपट महेश भट यांनी दिग्दर्शित केला होता. राजश्री प्रोडक्शन या संस्थेचा हा चित्रपट होता ‘सारांश’ या चित्रपटातील भूमिका त्यांना कशी मिळाली याचा एक खूप मनोरंजक किस्सा आहे. (Anupam kher)
जो स्वतः अनुपम खेर यांनी ‘आप की अदालत’ या रजत शर्माच्या शो मध्ये सांगितला होता. अनुपम खेर हे सिमल्याचे रहिवासी. एन एस डी चे पास आउट. तिथून चित्रपटात काम करण्यासाठी ते मुंबईला आले होते. परंतु काही केल्या त्यांना चित्रपट मिळत नव्हता. महेश भट यांनी त्यांना ‘सारांश’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी निवडले. त्यावेळी अनुपम खेर यांचे वय अठ्ठावीस होते आणि या चित्रपटात त्यांना सत्तर वर्षाच्या एका वृद्ध व्यक्तीची भूमिका करायची होती. या भूमिकेसाठी अनुपम खेर यांनी प्रचंड अभ्यास सुरु केला.
वृद्ध लोक चालतात कसे ? बोलतात कसे ? पेहराव कसा करतात ? हातात काठी कशी पकडतात ? याचा सर्व अभ्यास करून ते सहा महिने ती भूमिका जगत राहिले. परंतु चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याचा दहा दिवस आधी त्यांच्यावर एक बॉम्ब गोळाच पडला. जेव्हा अनुपम खेर यांना कळाले की, या चित्रपटात त्यांची भूमिका संजीव कुमार यांना देण्यात आलेली आहे.(Anupam kher)
संजीव कुमारने नि:संशय एक महान कलाकार होते. परंतु अनुपम खेर यांना वाटले की, “ही भूमिका माझ्यासाठी आहे. गेले सहा महिने मी याचा अभ्यास करतो आहे अशी कशी माझ्या हातातून भूमिका जाऊ शकते?” परंतु ते न्यू कमर होते. खूप चिडचिड झाली. खूप नैराश्य आले. पण काय करायचे? शेवटी त्यांनी सिमलाला परत जाण्याचा निर्णय घेतला.
आपले सर्व सामान पॅक करून ते टॅक्सी जाऊन बसले आणि रेल्वे स्टेशन कडे जायला निघाले. परंतु जाता जाता त्यांनी विचार केला की, आपण असे कसे जायचे ? आपण एकदा महेश भटला समक्ष भेटून त्यांना त्यांच्या या हीन कृत्याचा जाब विचारून मगच जाऊ. हा निर्धार करून त्यांनी महेश भट यांच्या घराकडे टॅक्सी न्यायला सांगितली. ते प्रचंड चिडले होते. मनात खूप राग साचला होता. महेश भट सहाव्या मजल्यावर राहत होते. त्या दिवशी नेमकी लिफ्ट बंद होती. अनुपम खेर सहा मजले चालून महेश भट यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना जाब विचारला.(Anupam kher)
त्यावर भट म्हणाले ,”राजश्री प्रोडक्शन या भूमिकेसाठी कुणाही न्यू कमरला घेऊ इच्छित नाहीत. तर ते एका प्रस्थापित कलाकाराला घेऊ इच्छितात. त्यामुळे त्यांनी तुम्हाला ऑफर केलेली भूमिका संजीव कुमार यांना दिली आहे!” त्यावर अनुपम खेर चवताळून म्हणाले,” तुम्ही मोठे फ्रॉड आहात. तुम्ही मोठे चीटर आहात. तुम्ही सहा महिने माझ्या भावनांशी खेळ खेळतात. तुम्हाला कोणी अधिकार दिला असे करण्याचा? गेली सहा महिने मी या भूमिका करण्याचे स्वप्न पाहत होतो. त्याची तयारी देखील माझी झाली होती आणि आज तुम्ही सांगताय ही भूमिका तुम्हाला देऊ शकत नाही. हा माझ्यावर पूर्ण अन्याय आहे आणि हा अन्याय तुम्ही करत आहात.
========
हे देखील वाचा : प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या प्रेम अदिब यांचा जीवनप्रवास
========
मी एक ब्राह्मण आहे मी तुम्हाला श्राप देतो की तुमच्याकडून चांगली कृती यापुढे कधीच घडणार नाही!!” रागाने त्यांचे संपूर्ण अंग थरथरत होते. डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली होती. तावातावात ते खाली निघून टॅक्सी जाऊन बसले. त्यांच्या पाठोपाठ महेश भट देखील पळत पळत आले त्यांनी त्यांना थांबवले. आणि सांगितले ‘थांबा थांबा जाऊ नका. मी राजश्री प्रोडक्शन शी आत्ता तुमच्या समोर बोलतो.” ते खेर यांना वर घेवून आले. त्यांनी लगेच राजश्री प्रोडक्शन ला फोन लावला आणि सांगितले ,”आत्ताचा जो अनुपम खेर (Anupam kher) यांचा अवतार मी पाहिला आहे ते पाहून मी हे नक्की केले आहे की ‘सारांश’ मधील भूमिका तेच चांगल्या पद्धतीने करू शकतील. तुम्हाला हा चित्रपट जर प्रोड्युस करायचा असेल तर ओके अन्यथा मी दुसरा प्रोडूसर पाहतो परंतु या चित्रपटातील प्रमुख भूमिका अनुपम खेरच करेल!” अशा पद्धतीने भांडून अनुपम खेर यांनी ती भूमिका मिळवली आणि त्या भूमिकेचे अक्षरशः सोने केले.