Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Bigg Boss 19: प्रणित मोरेवर सलमान खानचा संताप, पहिल्याच विकेंड वारमध्ये दबंग भाईने सुनावलं

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न;

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

प्राण ने स्वत:ला मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार नाकारला…

 प्राण ने स्वत:ला मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार नाकारला…
बात पुरानी बडी सुहानी

प्राण ने स्वत:ला मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार नाकारला…

by धनंजय कुलकर्णी 22/12/2023

भारतीय सिनेमाचे ऑस्कर म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार! आजही या पुरस्काराचा दर्जा व रसिकांवरील प्रभाव अबाधित आहे. हा पुरस्कार मिळणं हा प्रत्येक कलावंताचं स्वप्न असतं. पण असं असतानाही हा पुरस्कार अभिनेता प्राण यांनी चक्क नाकारला होता आणि त्याचं कारण देखील तितकच ’स्ट्रॉंग’ होतं व प्राणचे मोठेपण अधोरेखित करणारं होतं. कारण हा पुरस्कार त्याने वैयक्तिक कारणासाठी नाकारला नव्हताच. ही गोष्ट आहे १९७२ च्या फिल्मफेअर अ‍ॅवार्ड सेरेमनीची! या वेळी प्राण यांना सोहनलाल कंवर यांच्या ’बेईमान’ या सिनेमातील रामसिंग हवालदाराच्या भूमिकेकरीता सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. (Filmfare)

हा पुरस्कार त्यांनी नाकारला. का ? कारण याच फिल्मफेअर सोहळ्यात याच ’बेईमान’ सिनेमाचे संगीतकार  शंकर जयकिशन यांना  सर्वोत्कृष्ट संगीताचा फिल्मफेअर मिळाला होता ! कुणाशी टक्कर देवून? तर कमाल अमरोहीच्या ’पाकीजा’ (सं गुलाम महंमद) ला! आज बेईमानचं एकही गाणं आठवायचं म्हटल तरी आठवत नाही आणि पाकीजाचं एकूण एक गाणं लख्खं आठवतं ! प्रश्न फक्त एवढाच नव्हता.पाकीजाचे संगीतकार गुलाम महंमद यांच निधन १९६६ ला झालं होतं.(Filmfare)

(पाकीजाचा निर्मितीचा कालावधी १०-१२ वर्षाचा होता.) पाकीजाची नायिका मीनाकुमारीचं निधन सिनेमा रीलीज नंतर काही दिवसातच झाले होते. एकूणच पाकीजाच्या बाबत गुणवत्तेसोबतच एक सांत्वनाची भावना होती. असे असताना त्यावर्षी एक नाही दोन नाही चक्क पाच पाच पारितोषिके ’बेईमान’ ला मिळतात ही भावना कुणाही रसिकाला चीड आणणारी होती.

प्राणची अवस्था देखील वेगळी नव्हती. त्याने काय करावे ? त्याने स्वत:ला मिळालेला पुरस्कार नाकारून निषेध व्यक्त केला. आज पुरस्कारासाठी लॉबिंग करणारे बघितल्यावर प्राणचे हे वेगळेपण आणखी उठून दिसते.प्राण एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी चक्क फिल्मफेअर मासिकाचे संपादक करंजिया यांना एक पत्र लिहिले. या पत्रातील भाषा पहा. हे पत्र पुढीलप्रमाणे होते.(Filmfare)

Dear sir, I would be failing in my duty towards the film industry which has made me where ever I am today,  by not accepting one of the awards which are not fair this time.  I will strongly feel the Filmfare committee has been unfair in not giving the award for the best music director to late Shri Ghulam Mohammad for tremendous music for his film Pakeeza. Since the days these awards were announced my concise has been telling me and I cannot bear it any more. I would appreciate if you please relive me from the Burdon for receiving best supporting actor award trophy. By not accepting this award I do not mean any personal disrespect to you or to my numerous fans who had voted for me. On the contrary I am thankful to them. I regreate to inconvenience caused to you. But I could not reconcile with the idea of filmfare award trophy of ‘Beimaan’ is staring at me when I am alone at home and reminding me I am part of to something unfair. Please forgive me.

-Pran 

=========

हे देखील वाचा : जेव्हा अभिनेत्री मधुबालाने संपूर्ण युनिटसाठी चक्क जेवण बनवले !

=========

अर्थात याचा  इम्पॅक्ट काय झाला ? पुढे प्राणला नामांकन मिळाली पण एकही पुरस्कार मिळाला नाही ! १९९७ साली ’जीवन गौरव’पुरस्कार तेवढा मिळाला.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured Filmfare Pran
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.