महेश भट यांनी आईच्या वेदना रुपेरी पडद्यावर मांडल्या !
नाना भाई भट हे महेश भट यांचे वडील पण दोघांमध्ये कधीच सौहार्दाचे संबंध नव्हते याचे कारण महेश भट हे नानाभाई भट यांच्या अनधिकृत पत्नीचे चिरंजीव होते. नाना भाई भट यांनी शिरीन मोहम्मद अली या मुस्लिम अभिनेत्री सोबत स्वातंत्र्यपूर्व काळात लग्न केले होते. महेश भट यांच्या जन्मानंतर नाना भाई भट यांनी नंतर एका हिंदू स्त्री सोबत लग्न केले होते आणि तिच्या सोबतच राहत होते. (Mahesh Bhatt)
महेश भट आपल्या आई सोबत शिवाजी पार्कला राहत होते. तो हिंदू बहुल एरिया असल्यामुळे महेशचे आई हिंदू संस्कृती प्रमाणे बिंदी लावत असे. तिला कायम या गोष्टीचा त्रास व्हायचा की, नाना भाई भट यांनी समाजात कधीही तिचा अधिकृत पत्नी म्हणून स्वीकार केला नाही. जो सन्मान दुसऱ्या पत्नीला मिळाला तो तिला कधीच मिळाला नाही याची खंत तिला काय वाटत असे.
आपल्या आईचे हे दुःख, तिची वेदना, तिची घुसमट महेश भट लहानपणापासून पाहत होते त्यामुळे त्यांच्या मनात वडिलांविषयी एक चीड निर्माण झाली होती. १९९८ साली जेव्हा महेश भट यांची आई शिरीन यांचे निधन झाले तेव्हा महेश भट यांचे वडील नानाबाई भट आपल्या पत्नी सोबत घरी आले होते. तेव्हा मृत पत्नीची मांग त्यांनी सिंदूरने भरली कारण हिंदू संस्कृती प्रमाणे शिरीन सौभाग्यवती असताना निधन पावली होती. तेव्हा महेश भट यांनी ‘too little too late’ अशी प्रतिक्रिया दिली होती.(Mahesh Bhatt)
त्यानंतर शिरीन यांचा अंत्यविधी कसा करायचा यावर थोडा वाद झाला. शिरीन यांनी त्यांचा अंत्यविधी शिया मुस्लिम पद्धतीने दफन करून व्हावा असे महेश भट यांना सांगितले होते. महेश भट यांचा तोच आग्रह होता. महेश भट यांनी आपला वडिलांना दफनभूमीपर्यंत येण्याची विनंती केली. परंतु तेव्हा नानाभाई भट यांनी महेश भट यांना सांगितले,” मला माफ कर.” त्यावर महेश भट यांचे असे म्हणणे होते की,” मी त्यांचा मुलगा आहे. त्यामुळे मला मात्र तिकडे दफन भूमी कडे जावेच लागेल आणि एका आईचे अंत्यसंस्कार करण्यापासून देव सुद्धा मला अडवू शकत नाही!” अशा पद्धतीने महेश भट यांनी आपल्या आईचा अंत्यसंस्कार मुस्लिम पद्धतीने केला. त्यानंतर वर्ष भरातच नानाबाई भट यांचे देखील निधन झाले. महेश भट यांचा ‘जख्म’ (१९९८) हा चित्रपट बऱ्यापैकी याच सिच्युएशनवर आधारलेला होता.
भट यांनी एका व्हिडिओ मॅगझीमला दिलेल्या मुलाखतीत हा संपूर्ण किस्सा सांगितला होता. या चित्रपटात महेश भट यांच्या आईची म्हणजेच शिरीनची भूमिका महेश भट यांच्या मुलीने पूजा भटने केली होती. म्हणजेच नातीने आपल्या आजीची भूमिका रुपेरी पडदावर वाटली होती. पूजा भट साठी ही भूमिका साकारणं तसं खूप कठीण होतं; कारण आजीचा तिला लहानपणी खूप सहवास लाभला होता. खूप आठवणी होत्या. या चित्रपटात ‘जाने कितने दिनो के बाद गली मे आज चांद निकला..’ या गाण्यात तिने जी साडी घातली आहे ती तिच्या आजीची साडी होती तसेच या चित्रपटात तिने जे मंगळसूत्र घातले आहे ते देखील तिच्या आजीचे होते. रुपेरी पडद्यावरील रील लाईफ सादर करताना तिने रियल लाईफ मधील आपल्या आजीचे साडी आणि मंगळसूत्र या चित्रपटात वापरले होते.(Mahesh Bhatt)
===========
हे देखील वाचा : अमिताभचा राजकारणात गेल्यानंतरचा ‘हा’ पहिला सिनेमा
============
त्यामुळे ती या सिनेमाबाबत खूप इमोशनल होती. सुरुवातीला या चित्रपटात काम करण्याबाबत साशंक होती कारण तिला ही भूमिका आपल्याला पेलवणार नाही असे वाटत होते. पण महेश भट (Mahesh Bhatt) यांना पूर्ण आत्मविश्वास होता त्यामुळे त्यांनी तिला ही भूमिका करायला लावली. ‘जख्म’ हा चित्रपट बुद्धिजीवी वर्गाला खूप आवडला. भलेही त्याला व्यावसायिक यश मिळाले नसले तरी समीक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले विशेषतः अजय देवगन यांचा अभिनय अतिशय सुंदर झाला होता त्यांना यावर्षीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला. अजय देवगन चांगला अभिनेता आहे यावर या चित्रपटापासून शिक्कामोर्तब झाले. कुणाल खेमू याचा बालकलाकार म्हणून हा महेश भट यांच्याकडील अखेरचा चित्रपट होता. यानंतर २००५ साली ‘कलयुग’ या चित्रपटापासून त्याने नायकाच्या भूमिका करायला सुरुवात केली !