दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
बर्थडेच्या आधल्या दिवशी अमिताभ राजेश खन्नाच्या घरी गेले !
अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉग मधून जुन्या आठवणी खूप चांगल्या पद्धतीने मांडत असतात. राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि अमिताभ यांनी दोन चित्रपटात एकत्र काम केले. हे दोन्ही चित्रपट ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केले होते ‘आनंद’ आणि ‘नमकहराम’. या दोन्ही चित्रपटांनी अमिताभ बच्चन यांचे आयुष्य बदलून गेले. ‘आनंद’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान चा एक किस्सा त्यांनी मध्यंतरी आपला ब्लॉगवर शेअर केला होता. राजेश खन्ना सारख्या सुपरस्टार सोबत आपल्याला काम करायला मिळते आहे ही भावना अमिताभ बच्चन यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती.
अमिताभ आणि राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांची पहिल्यांदा भेट दिल्लीच्या कॅनॉट प्लेस वरील एका थिएटर मध्ये झाली होती. या थिएटरमध्ये अमिताभ बच्चन आपल्या आईसोबत राजेश खन्नाचा ‘आराधना’ हा चित्रपट पाहायला आले होते. अमिताभ बच्चन त्यावेळी सिनेमाच्या दुनियेत स्ट्रगल करत होते. तेव्हा राजेश खन्नाचा ऑरा जबरदस्त होता. या कलाकारासोबत आपल्याला काम करायला मिळेल का ? असे त्यावेळी अमिताभ बच्चन यांना वाटले. राजेश खन्ना ज्या टॅलेंट हंट मधून विजयी होऊन चित्रपटात आले होते त्याच टॅलेंट हंटने १९६७ साली अमिताभ बच्चन यांना चक्क रिजेक्ट केले होते ! तरी देखील अमिताभ चित्रपटात येण्याचा प्रयत्न करत होते.
मुंबईमध्ये अमिताभ बच्चन मेहमूद यांच्या घरात अन्वर अली (महमूदचा भाऊ) सोबत राहत होते. अन्वर अली आणि अमिताभ यांनी सात हिंदुस्तानी या चित्रपटात एकत्र भूमिका केली होती. राजेश खन्ना (Rajesh Khanna) सोबत काम करण्याचे अमिताभचे स्वप्न लवकरच साकार झाले. ऋषिकेश मुखर्जी यांनी ‘आनंद’ या चित्रपटात राजेश खन्नाच्या सोबत अमिताभ बच्चन यांना कास्ट केले. ‘आनंद’ चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना २९ डिसेंबर १९७० या राजेश खन्नाच्या वाढदिवसाच्या वेळचा हा किस्सा आहे.
अमिताभ बच्चन चुकून एक दिवस आधीच म्हणजे २८ डिसेंबरला राजेश खन्नाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या ‘आशीर्वाद’ या बंगल्यावर जाऊन पोहोचले. ते पहिल्यांदा च राजेश खन्नाच्या (Rajesh Khanna) घरी जात होते. तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की वाढदिवस आज नाहीतर उद्या आहे. परंतु राजेश खन्ना यांनी त्याचे मनापासून स्वागत केले ! अमिताभच्या आपल्या विषयीच्या भावना पाहून राजेश आनंदित झाला. त्या रात्री अमिताभला राजेश खन्ना निर्माते दिग्दर्शक शक्ती सामंत यांच्याकडे डिनरसाठी घेऊन गेले !
अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगमध्ये सांगतात ‘राजेश खन्ना’ची (Rajesh Khanna) ती वागणूक माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती’. राजेश खन्ना यांनी दुसऱ्या दिवशी वाढदिवसाला पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांना निमंत्रित केले. राजेशचा हा वाढदिवस अमिताभ बच्चन यांच्यासाठी खूप संस्मरणीय ठरला कारण याच बर्थडे पार्टीमध्ये राजेश खन्नाने अनेक चित्रपट निर्मात्यांची अमिताभ बच्चन यांची ओळख करून दिली होती. ‘आनंद’ या चित्रपटातील शेवटच्या प्रसंगाबद्दल अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगमध्ये लिहितात,” राजेश खन्नाच्या मृत्यूनंतर मी ज्या पद्धतीने बोलतो तो प्रसंग मी आदल्या दिवशी मेहमूद यांना सांगितला होता. मेहमूद यांनी तो प्रसंग कसा करायचा याची माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली होती.” या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितले की,”राजेश खन्नाचा मृत्यूनंतर जेव्हा मी त्याच्या घरी गेलो तेव्हा राजेश खन्नाचे अचेतन शरीर पाहून आनंदचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला !”
===========
हे देखील वाचा : मनमोहन देसाई आणि अभिनेत्री नंदा यांची अधुरी प्रेमकहाणी
===========
जाता जाता थोडंस ‘आनंद’ या सिनेमाबद्दल. त्या काळात राजेश खन्ना (Rajesh Khanna) एकच चित्रपटाचे वीस लाख रुपये मानधन घेत असेल परंतु ऋषिकेश मुखर्जी यांचा आनंद हा लो बजेट चित्रपट असल्यामुळे त्याने अवघ्या सात लाखांमध्ये हा चित्रपट साइन केला होता. ऋषिकेश मुखर्जी यांनी हा चित्रपट अवघ्या २८ दिवसांमध्ये संपूर्णपणे चित्रित केला होता. ऋषिकेश मुखर्जी यांनी ‘आनंद’ हा चित्रपट मुंबई या शहराला डेडिकेट (अर्पित) केला होता. तसे त्यांनी टायटलमध्ये दाखवले होते. त्यांच्या मते मुंबई शहरांमध्ये असलेला जिवंतपणा त्यांना ‘आनंद’ या व्यक्तिरेखित देखील दिसला होता म्हणून त्यांनी हा चित्रपट मुंबई शहराला अर्पित केला !