Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

महेश भट जेव्हा स्वतःचे आयुष्य पडद्यावर मांडतात…

 महेश भट जेव्हा स्वतःचे आयुष्य पडद्यावर मांडतात…
बात पुरानी बडी सुहानी

महेश भट जेव्हा स्वतःचे आयुष्य पडद्यावर मांडतात…

by धनंजय कुलकर्णी 16/01/2024

निर्माता दिग्दर्शक महेश भट (Mahesh Bhatt) यांचे त्यांच्या वडिलांसोबत संबंध कायमच विचित्र राहिले. त्यांचे वडील नानाभाई भट स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर चे एक ख्यातनाम निर्माता दिग्दर्शक होते. त्यांनी त्या काळात अनेक सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले. नानाभाई भट यांनी दोन विवाह केले होते. पैकी एक विवाह त्यांचा शिरीन या मुस्लिम अभिनेत्री सोबत झाला होता. तिच्यापासून त्यांना तीन मुले झाली त्यापैकी एक म्हणजे महेश भट.

परंतु या त्यांच्या लग्नाला समाज मान्यता नव्हती. या कारणाने महेश भट याच्या मनात लहानपणी पासून एक न्यून गंडाची भावना होती. ते स्वतःला कायम अनौरस संतती म्हणून संतती समाजात होते. कारण नाना भयभट यांनी नंतर एका हिंदू स्त्री सोबत लग्न केले त्यांच्यापासून त्यांना सहा मुले झाली. महेश भट हे कायम स्वतःला एक वेगळे समजत होते. हा त्यांच्या मनात पहिल्यापासून एक गंड होता, कॉम्प्लेक्स होता कारण जो मान सन्मान महेश भट यांच्या दुसऱ्या पत्नीला मिळत होता तो महेश भट (Mahesh Bhatt) यांच्या आईला कधीच मिळत नव्हता असे त्यांचे मत होते.

यातूनच त्यांनी आपल्या आयुष्यावर अनेक चित्रपट काढले, ज्यामध्ये ते आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग बेमालूमपणे टाकत होते. नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी आपल्या आईवर एक चित्रपट काढायचे ठरवले. चित्रपटाचे नावच त्यांनी शिरीन असे ठेवले. या चित्रपटात त्यांना आपल्या आईची व्यथा रुपेरी पडद्यावर मांडायची होती. तिचा नवरा एक ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक असतो पण केवळ ती स्वतः धर्माने मुस्लिम असल्यामुळे तिला समाजात आणि त्यांच्या कुटुंबात स्थान मिळत नाही. तिची आणि तिच्या मुलांची एका अर्थाने वाताहात होते हे महेश भटला यातून दाखवायचे होते. महेश भटने जेव्हा ट्रेड मॅगझीनमध्ये या सिनेमाची जाहिरात करायला सुरुवात केली.

त्यावेळी नानाभाई भट जिवंत होते. त्यांनी महेश भट यांना कायदेशीर नोटीस बजावली आणि सर्व ट्रेड मॅगझिन्सला देखील त्याची कॉपी पाठवली आणि यापुढे महेश भटच्या सिनेमाची जाहिरात आणि इतर पब्लिसिटी आपल्या माध्यमातून करू नये असे सांगितले. याचे कारण देताना त्यांनी सांगितले की,” महेश भटची (Mahesh Bhatt) आई शिरीन ही माझी पत्नी होत आहे आणि महेश भट हा माझा औरसच मुलगा आहे. भारतामध्ये हिंदू कोड बिल १९५५ साली आले.

माझा आणि शिरीनचा विवाह त्यापूर्वीचा आहे. त्यामुळे द्विभार्या कायदा मला लागू होत नाही. महेश भट हा माझा औरसच मुलगा आहे. त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून महेश भट स्वतःची जी अनौरस असल्याची जाहिरात करतो आहे ती योग्य नाही !” अर्थात पुढे काही दिवसातच नानाभाई भट यांचे निधन झाले. महेश भट यांनी ‘शिरीन’ या चित्रपटाचे नाव बदलून ‘जखम’ असे ठेवले आणि हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात महेश भटच्या आईची भूमिका त्यांच्या स्वतःच्या मुलीने म्हणजे पूजा भट ने केली होती. तर महेश भट ची (Mahesh Bhatt) भूमिका अजय देवगन यांनी केली होती. नानाभाई भटच्या भूमिकेमध्ये दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन हे होते.

याच कथानकावर स्टार प्लस या टीव्ही चॅनलवर ‘नामकरण’ नावाची एक मालिका २०१६ साली  प्रदर्शित झाली. दोन वर्ष चाललेल्या या मालिकेने तब्बल ५३६  एपिसोड केले होते. या मालिकेचे कथानक बऱ्यापैकी याच प्लॉटवर बेतले होते. या मालिकेने त्या काळात चांगली लोकप्रिय मिळवली  होती. ‘नामकरण’ या मालिकेचे शीर्षक गीत श्रेया घोषाल हिने गायले होते आणि ते त्या काळात बऱ्यापैकी लोकप्रिय देखील झाले होते.

===========

हे देखील वाचा : अमिताभ बच्चन पेक्षा जास्त मानधन सलीम जावेद यांनी घेतले !

===========

महेश भट (Mahesh Bhatt) यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यावर बरेच चित्रपट बनवले. १९८५ साली त्यांनी ‘जनम’ ही भारतातील पहिली टेली फिल्म बनवली. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी स्वतः केले होते. या आत्मकथनात्मक चित्रपटात त्यांची भूमिका कुमार गौरव या अभिनेत्याने केली होती यात त्यांच्या वडिलांची भूमिका अनुपम खेर यांनी केली होती. यात अनिता कंवर,शेरनाज पटेल , मदन जैन यांच्या देखील भूमिका होत्या. ८ डिसेंबर १९८५ रोजी दूरदर्शन च्या राष्ट्रीय वाहिनीवर या फिल्म चे प्रसारण झाले.  या चित्रपटाला फिल्मफेअरचे अनेक नामांकन मिळाली होती. या चित्रपटापासून महेश भट एक सक्षम चित्रपट दिग्दर्शक सोबतच दूरदर्शनवरील टेली फिल्म चे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.