
आमीर खानची पहिली टीव्ही ॲड आठवते का?
जेव्हा भारतामध्ये सिंगल स्क्रीन थिएटर होते आणि टीव्हीवर एकच चॅनल होते त्या काळातली ही घटना आहे. १९९३ साली आमिर खानची एक जाहिरात दूरदर्शनवर झळकली होती. या जाहिरातीने तुफान हंगामा केला होता. या जाहिरातीत आमिर सोबत ऐश्वर्या रॉय आणि महिमा चौधरी या देखील होत्या. अवघ्या ५५ सेकंदाच्या या जाहिरातीत आमिर खानने कमाल केली होती. तुम्हाला आठवते का ही जाहिरात ? ही जाहिरात होती पेप्सी या शीत पेयाची. (Aamir Khan)
प्रल्हाद कक्कड या अॅड गुरूंनी ही जाहिरात बनवली होती. पण तुम्हाला माहिती आहे का ? ही जाहिरात तयार झाल्यानंतर आमिर खान खूप नर्व्हस होता. त्याने तब्बल २५ वेळा ही जाहिरात पुन्हा पुन्हा पाहिली आणि नंतर आपल्या पसंतीचा होकार दिला. आमिर खान नेमका का नाराज होता ? नेमकं त्याला काय कमी वाटत होते ? खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. (Aamir Khan)

एकूणच या जाहिरातीचे मेकिंग जबरदस्त होते. भारतामध्ये कोल्ड ड्रिंक्स कंपन्यांमध्ये हॉट वॉर त्यावेळेला जोरात चालू होते. पेप्सीला आपल्या ब्रँडला लोकांपर्यंत पोहोचवायचे होते. म्हणून त्या साठी त्यांना एक पॉप्युलर चेहरा हवा होता. त्यामुळे ते पहिल्यांदा आमिर खान यांच्याकडे अप्रोच झाले. सुरुवातीला आमिर खानने सरळ जाहिरात करायला नकार दिला. कारण त्याच्या मते यातून प्रेक्षकांमध्ये असा चुकीचा मेसेज जाऊ शकतो की ‘आमिर खानला आता चित्रपट मिळत नाहीत म्हणून तो ॲड करत आहे.’ कारण त्यावेळी तसेच समजले जात होते.
ज्यांना चित्रपटात किंमत नव्हती तेच लोक टीव्हीवर काम करत असायचे ! त्यामुळे आमिर खानने सुरुवातीला या जाहिरातीला नकार दिला. परंतु अॅड गुरू प्रल्हाद कक्कड यांनी खूपच आग्रह केला त्यामुळे आमिर खानने जाहिरातीत काम करायला कबुली तर दिलीच पण या जाहिरातीत काम करण्या साठी आपण २५ लाख रुपये घेऊ असे सांगितले. ही किंमत त्या काळात खूप जास्त होती. त्यामुळे ॲड कंपनी शाहरुख खान कडे अप्रोच झाली. शाहरुख चे दिल आशना है, दिवाना हे चित्रपट रिलीज झाले होते पण आमिर खान इतकी त्याला लोकप्रियता मिळालेली नव्हती. शाहरुख खानने या ॲड मध्ये काम करण्याचे फक्त सहा लाख रुपये घेईन असे सांगितले. (Aamir Khan)
त्यावेळी शाहरुख खान मुंबईमध्ये फ्लॅट खरेदी करत होतो त्याला सहा लाख रुपये कमी पडत होते. त्याच वेळेला ही जाहिरात त्याच्याकडे आली. तेव्हा त्याने सांगितले ,” जाहिराती साठी मला किती पैसे देणार आहे हे मला माहिती नाही पण मला सध्या सहा लाख रुपये ची गरज आहे !” खरं तर ही जाहिरात शाहरुख खान कडे यायला हवी होती कमी पैसे डिमांड केले म्हणून. पण प्रल्हाद कक्कड यांना या जाहिरातीमध्ये आमिर खानच पाहिजे होता. म्हणून त्यांनी शेवटी आमिर खानलाच या जाहिरातीसाठी कन्फर्म केले.
त्याच्यासोबत ऐश्वर्या रॉय आणि महिमा चौधरी या दोन मुलींना घेतले. ऐश्वर्या तोवर विश्व सुंदरी झाली नव्हती. या ॲड ची टॅग लाईन होती ‘ यही है राईट चॉइस बेबी…’ या जाहिरातीत आमीर खानकडे आधी महिमा चौधरी येते आणि पेप्सी ची मागणी करते परंतु घरात पेप्सी नसल्यामुळे तो तिला पटवण्यासाठी स्टंट करून पेप्सी मिळवतो. तितक्यात त्याच्या दाराची बेल पुन्हा वाजते आणि महिमा म्हणते ‘दॅट मस्ट बी संजू !’ आमीर प्रश्नार्थक नजरेने पाहतो आणि ऐश्वर्या दारात उभी राहते आणि म्हणते ‘आय ॲम संजना गॉट अनादर पेप्सी..’ दोन दोन सुंदर मुली त्यामुळे आमिर खान त्यांच्याकडे पाहतच राहतो. असा या जाहिरातीचा एकूण गोषवारा होता.(Aamir Khan)
जाहिरात एकदम परफेक्ट बनली होती. प्रल्हाद कक्कड आमिर खानला म्हणाले,” जाहिरात तर चांगली झाली आहे पण यातील एक शॉट मला थोडासा परत रि शूट करावा लागेल असं वाटतं आहे.” आमिर खान खूप नाराज झाला आणि तो त्याच पद्धतीने विचार करू लागला. पण नंतर प्रल्हाद कक्कड यांना ती जाहिरात ओके वाटली आणि त्यांनी हि जाहिरात पेप्सी कंपनी कडे पाठवली. तिथे तेंव्हा विभा पॉल ऋषी मार्केटिंग हेड होती. तिला जाहिरात खूपच आवडली. तिने आमिर खान ला सरळ फोन करून सांगितले “आमीर जाहिरात जबरदस्त झाली आहे आपण पुढच्या आठवड्यापासून जाहिरात फ्लो करतो आहोत.” त्यावर आमिर खान म्हणाला,” पण प्रल्हादजी म्हणत होते की त्यात काहीतरी कमतरता आहे उणीव आहे आपला पुन्हा रिशूट करावे लागेल.” त्यावर ती म्हणाली,” ते मला काय माहिती नाही पण माझ्या दृष्टीने जाहिरात परफेक्ट झाली आहे.” त्यानंतर आमिर खानने प्रल्हाद कक्कड यांना फोन करून विचारलं. त्यावर ते म्हणाले,” तसे काही नाही. ती जाहिरात ओके आहे.
============
हे देखील वाचा : आर डी बर्मन यांच्या पहिल्या लग्नाची भन्नाट लव्हस्टोरी !
============
मला असं वाटलं होतं पण तसं काही नाही.” त्यावर आमिर खान म्हणाला,” असं नाही; तुम्ही मला म्हणाला होता आपल्याला हि जाहिरात पुन्हा शूट करावे लागेल!” प्रल्हाद जी म्हणाले,” काही नाही. तसं असेल तर मी जाहिरात तुझ्याकडे पाठवतो. तू स्वतः बघ. मगच आपण निर्णय घेवू.” त्यांनी आमिर खान कडे जाहिरात पाठवली. त्यानंतर त्याने ती जाहिरात २५ वेळा पुन्हा पुन्हा पाहिली आणि नंतर त्याच्या समाधान झाले. त्याने ओके रीमार्क दिल्यानंतर ही जाहिरात दूरदर्शनवर झळकली आणि पेप्सीच्या खरेदीचा ग्राफ कुठच्या कुठे गेला ! (Aamir Khan)
या जाहिरातीमध्ये आमीर खान, ऐश्वर्या राय आणि महिमा चौधरी या तिघांनी मस्त काम केले होते. त्या दोघींना या जाहिरातीचा खूप फायदा झाला. आमिर खानला मिस्टर परफेक्टनिष्ट म्हणतात ते उगाच नाही. त्या जाहिरातीची लिंक मी खाली देतो आहे.पुन्हा एकदा ती जादू अनुभवा.