दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
नेपोटिझमवर ‘स्वानंदी लक्ष्मीकांत बेर्डे’चं स्पष्ट मत
सध्या मराठी इंडस्ट्रीत एकामागोमाग नवनवीन विषयांवरील चित्रपटांची रांग लागली आहे. या रांगेत आता १ मार्च रोजी एक नवा सिनेमा दाखल झाला आहे ज्याचं नाव आहे ‘मन येड्यागत झालं’ ! या चित्रपटाच्या निमित्ताने दिवंगत अभिनेते ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांची मुलगी ‘स्वानंदी बेर्डे’ (Swanandi Berde) मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने स्वानंदीशी गप्पा मारताना तिने अनेक गोष्टींचा उलगडा केला.
‘मनं येड्यागत झालं’ हा नव्याकोरा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून दिवंगत अभिनेते ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांची लेक ‘स्वानंदी बेर्डे’ (Swanandi Berde) मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. यात तिच्याबरोबर लोकप्रिय अभिनेता ‘सुमेध मुदगलकर’ मुख्य भूमिकेत आहे.
यादरम्यान झालेल्या मुलाखतीत स्वानंदीने (Swanandi Berde) इंडस्ट्रीतील नेपोटिझमवर उघडपणे भाष्य केले. “आज मोठ्या पडद्यावर हे पहिलं पाऊल टाकताना मनाशी काय ठरवून आलीयेस ?” असा प्रश्न स्वानंदीला विचारल्यावर ती म्हणाली, “खरं सांगायचं तर, मी इंडस्ट्रीत यायच्या आधी काहीच ठरवलं नव्हतं, कारण मला कधी कधी या सगळ्या गोष्टींचं खूप दडपण येतं. आता काळाप्रमाणे ते कमी झालं आहे.
पण, मी आधी असं ठरवलं होतं, की मला या क्षेत्रात, अभिनयात यायचंच नाहीये कारण खूप प्रेशर असतं, ब-याचदा स्टारकिड्स, नेपोटिझमवर भाष्य केलं जातं. स्टारकिड्सना स्वतःला एक ‘कलाकार’ म्हणून दुय्यम सिद्ध करायचं असतं. मला हे सगळं प्रेशर नको होतं. पण, आता मला कुठेतरी वाटतंय की, माझ्यात काहीतरी आहे, मी हे करू शकते. मला माझ्या आईवडिलांना अभिमान वाटेल असं काम करायचं आहे. त्यामुळे आता मी नवनवीन प्रोजेक्ट्स करण्यासाठी खूप उत्सुक आहे.”
==========
हे देखील वाचा : महेश मांजरेकरांसाठी ‘हा’ अभिनेता ठेवणार डिटेक्टिव्ह
==========
या चित्रपटाबद्दल अधिक सांगायचं तर, तो ६ वर्षांपूर्वीच तयार झाला होता पण, काही कारणांमुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. नुकताच हा चित्रपट भेटीला आला असून तो प्रेक्षकांच्या मनात घर करून राहणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे. (Swanandi Berde)
अश्याच नवनवीन बातम्या व अपडेट्स करीता ‘कलाकृती मिडिया’ या चॅनलला नक्की भेट द्या.