‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
दिलीप कुमार आणि सायरा बानू यांची भन्नाट लव्ह स्टोरी!
अभिनयाच्या क्षेत्रातील शेवटचा शब्द म्हणून आज देखील ज्या अभिनेत्याचा आदराने उल्लेख होतो तो म्हणजे अभिनेते दिलीप कुमार.(Dilip Kumar) पन्नास च्या दशकातील तो सुपरस्टार, सुपर ऍक्टर होता. दिलीप कुमार (Dilip Kumar) बाबतची प्रत्येक गोष्ट, त्याची प्रत्येक कृती ही त्या काळात न्यूज बनवत होती. दिलीप कुमारने आपल्या वयाच्या ४४ व्या वर्षी लग्न केले. त्यावेळी सायराबानो चे वय २२ वर्षे होते. म्हणजेच आपल्या वयाच्या निम्म्या वयाच्या मुलीशी त्याने लग्न केले होते. त्यांच्यातील ही लव स्टोरी भन्नाट होती.
दिलीप कुमार (Dilip Kumar)यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये खूप तपशीलवार यावर लिहिलेले आहे. सायरा बानो खरंतर दिलीप कुमारच्या प्रेमात तिच्या वयाच्या बाराव्या वर्षापासून होती. टीनेज मधील ते प्रेम होतं. आपला प्रियकर कसा असावा, आपला पती असा कसा असावा याचं तिने जे चित्र रंगवलं होतं त्यात दिलीप कुमार (Dilip Kumar) फिट बसत होता. पण त्याची भेट काही झाली नव्हती. मुगल- ए – आजम या चित्रपटाचा प्रीमियर ५ ऑगस्ट १९६० या दिवशी मराठा मंदिर या थिएटरमध्ये होता. तेंव्हा सायरा अवघी सोळा वर्षाची होती. या प्रीमियरला ती आपल्या आई सोबत म्हणजेच नसीम बानू सोबत गेली होती. तिला खरं तर सिनेमात इंटरेस्ट नव्हता. तिला डोळे भरून प्रत्यक्ष दिलीप कुमार ला पहायचे होते; भेटायचे होते. पण दिलीप कुमार (Dilip Kumar) या प्रीमियरला अनुपस्थित राहिला. त्यामुळे सायरा बानू खूप निराश झाली. उशीत डोके खुपसून त्या रात्री ती खूप रडली.
सुबोध मुखर्जी यांच्या १९६१ सालच्या ‘ जंगली’ या चित्रपटापासून सायरा बानू हिंदी सिनेमाच्या दुनियेत आली. प्रत्येक अभिनेत्रीचे एक स्वप्न असायचे की आपण दिलीप कुमार(Dilip Kumar) सोबत एक भूमिका करावी. तसेच तिचे देखील होते. दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि तिची भेट याच काळात झाली. दिलीप कुमार ने पुढे येऊन तिच्या सौंदर्याची तारीफ केली आणि तिच्यासोबत हस्तांदोलन केलं. दिलीप कुमारचा ते मॅच्युअर्ड वागणं तिला खूप आवडले ते आंतरबाह्य मोहरली गेली. त्या काळात या दोघांना घेऊन चित्रपट करण्याचे प्रस्ताव देखील आले परंतु दिलीप कुमारला कायम असे वाटायचे की सायरा आपल्यापेक्षा खूप लहान दिसते आपली आणि तिची जोडी काही शोभून दिसणार नाही.
पण ११ डिसेंबर १९६५ या दिवशी जादू झाली. दिलीप कुमारला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सायराबानू त्याच्या घरी पोहोचली. या प्रसंगाचे वर्णन दिलीप कुमारने(Dilip Kumar) आपल्या आत्मचरित्रात फार सुंदर रीतीने केले आहे. दिलीप कुमार जेव्हा कार मधून आपल्या घरासमोर उत्तरले आणि घराच्या पोर्च मधून ते जायला लागले तेव्हा गार्डनमध्ये त्यांना ब्रोकेड साडी घातलेली एक तरुणी दिसली. जवळ जाऊन पाहिलं तर ते सायराबानू होती!
दिलीप कुमार (Dilip Kumar) ला प्रचंड आश्चर्य वाटले कारण जिला ते लहान मुलगी समजत होते ती आता साडी मध्ये पूर्ण स्त्री दिसत होती. कळीचे आता फुलात रुपांतर झाले होते. तिचं ते मोहक सौंदर्य दिलीप कुमारला (Dilip Kumar) प्रचंड आवडले. तिच्या एकेक अदेवर दिलीप कुमार त्या दिवशी फिदा होत होता. त्याने त्याच दिवशी तिला प्रपोज करायचे ठरवले. परंतु दिलीप कुमारला त्यादिवशी खूप फोन येत होते. त्यात साहजिकच त्याच्या महिला चाहत्यांचे देखील फोन येत होते. त्यामुळे सायराबानू थोडीशी डिस्टर्ब होती.
===========
हे देखील वाचा : राजकपूरने ‘या’ गानहिऱ्याला ओळखून त्याचे नशीबच घडवले!
===========
नंतर सायराला घेऊन तो समुद्रकिनाऱ्यावर एका ड्राइव्हला गेला आणि त्याने रोमँटिक होत तिचा हात हातात घेत विचारले,” तू माझी जीवनसाथी होशील का?” यावर दिलीप कुमारला सकारात्मक उत्तर अपेक्षित होते. परंतु दिवसभरातील दिलीप कुमारच्या मैत्रिणींचे येत असलेले फोन पाहून सायरा चिडून म्हणाली,” असं तू किती मुलींना आजवर विचारलं आहेस?” त्यावर दिलीप कुमार(Dilip Kumar) खरंतर त्याच्या प्रवृत्तीनुसार स्वभाव धर्मानुसार चिडायला पाहिजे परंतु स्पष्ट आणि प्रामाणिक प्रश्न विचारणारी सायरा बानू त्याला आवडली होती.
त्याने सांगितले,” माझ्या हृदयात तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही. मी तुला माझी जीवनसाथी बनवण्याचा विचार करतो आहे.” त्यावर सायराने लाजून होकार दिला. दिलीप कुमार(Dilip Kumar) ताबडतोब तिला घेऊन नेपियन सी रोडवरील तिच्या आईच्या फ्लॅटवर घेऊन गेला. तिथे त्याने त्याच्या मोठ्या काकाला आणि काकूला देखील बोलावले आणि आपला निर्णय त्यांना सांगितल. अशा पद्धतीने दिलीप कुमारने (Dilip Kumar) सायरा बानू प्रपोज केले आणि तिचा होकार मिळवला. नंतर ११ ऑक्टोबर १९६६ या दिवशी दोघांचा निकाह झाला. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही वादळे निश्चित आली. पण सायराने सर्व वादळांना खंबीरपणे तोंड देत ५५ वर्ष आपला वैवाहिक जीवन सुखी ठेवले!