‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
संगीतकार उषा खन्ना यांच्याकडील रफीचे शेवटचे गाणे!
हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात संगीतकरांच्या दुनियेत पुरुषांनी हे क्षेत्र व्यापलेले दिसते. पण महिला संगीतकार उषा खन्ना यांनी या पुरुषप्रधान विश्वात आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. १९५९ साली आलेल्या शशीधर मुखर्जीच्या फिल्मिस्ता संस्थेच्या ‘दिल देके देखो’ या
चित्रपटापासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. साठ आणि सत्तर च्या दशकात अनेक सुमधुर गाणी चित्रपटाच्या माध्यमातून दिली. रफी(Rafi) हे त्यांचे अतिशय आवडते गायक. जेव्हा आपण रफी (Rafi) आणि उषा खन्ना यांच्या एकत्रित सांगितिक कारकीर्दीचा विचार करू लागतो तेव्हा अनेक गाणी आपल्या मनात गुंजारव करू लागतात.
‘तेरी गलियों में ना रखेंगे कदम आज के बाद’ हे ‘ हवस’ या चित्रपटातील गाणं लगेच आठवते. त्याचप्रमाणे मैने रखा है मुहोब्बत अपने अफसाने के नाम (शबनम), दोस्त बनके आये हो (बिन फेरे हम तेरे) हम तुमसे जुदा होके मर जायेंगे (एक सपेरा एक लुटेरा), हम और तुम और ये समा (दिल देके देखो) कैसे जीत लेते है लोग दिल किसीका (साजन बिना सुहागन) हि गाणे देखील हमखास आठवतात. मध्यंतरी विविध भारतीवर एका कार्यक्रमात उषा खन्ना यांनी रफीच्या (Rafi) भरपूर आठवणी श्रोत्यांसोबत शेअर केल्या होत्या. त्यात त्यांनी रफी (Rafi) ने त्यांच्या संगीतात गायलेल्या शेवटच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या आठवणी देखील सांगितल्या होत्या.
हा चित्रपट होता अंबरीश सहगल यांनी दिग्दर्शित केलेला ‘आप तो ऐसे ना थे’ या चित्रपटात निदा फाजली यांनी लिहिलेलं ‘तू इस तरहा से मेरी जिंदगी मे शामिल है…’ हे गाणं रफीच्या (Rafi) आवाजात त्यांनी रेकॉर्ड केले. उषा खन्ना सांगतात,” खरं तर त्या काळात रफीची तब्येत फारशी बरी नव्हती. तरी देखील उषा खन्ना च्या निमंत्रणावरून रफी रेकॉर्डिंग उपस्थित राहिले. रिहर्सलच्या काळातच हे गाणे खूप लोकप्रिय होईल असे सर्वांना वाटत होते. रफी (Rafi) देखील या गाण्याची चाल ऐकून खूप खूष झाले होते. रेकॉर्डिंग च्या दिवशी मोठ्या जोशात त्यांनी हे गाणं रेकॉर्ड केले. संगीतकार उषा खन्ना यांना कल्पना नव्हती की हे आपलं रफी (Rafi) साहेबां सोबतचे शेवटचे गाणे आहे. त्या दिवशी रफीच्या अंगामध्ये ताप होता. त्या अवस्थेतही त्यांनी ते गाणे अतिशय सुरेल पणे राहिले.
गाणे झाल्यानंतर जाताना रफीने (Rafi) उषा खन्ना च्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितले,” खुदा आपको हमेशा खुशहाल रखे!” हा प्रसंग सांगताना उषा खन्ना सद्गतीत झाल्या होत्या. ३१ जुलै १९८० या दिवशी रफीचे निधन झाले. त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे ५ डिसेंबर १९८० ला ‘आप तो ऐसे न थे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता . या सिनेमात हे रफी चे हे गीत होते. हे गाणे त्या काळात बिनाका गीत माला मध्ये खूप गाजले. रेडीओ सिलोनवर रोज सकाळी आठ वाजता ‘आप ही के गीत’ या कार्यक्रमात अनेक दिवस हे गीत वाजत होते.
रफी (Rafi) ने गायलेल्या तू इस तरह से मेरी ज़िंदगी में शामिल है…या गाण्यातील भावना रसिकांना आणखी हळवं करीत होत्या. काय परफेक्ट आवाज लागलाय या गाण्यात रफीचा! या गाण्याच्या लोकप्रियतेचा फायदा सिनेमाला थोडा फार झाला. सिनेमा सुरुवातीचे काही आठवडे चालला. पण या फॅमिली ड्रामा मध्ये फार काही वेगळं नसल्याने सिनेमा फार काळ तिकीट बारीवर तग धरू शकला नाही. सिनेमा सोबतच हळू हळू हे गाणे देखील रसिकांच्या विस्मृतीत गेलं!
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन -अमजद खान यांच्या मैत्रीची ‘अधुरी
त्या काळात राज बब्बर आणि दीपक पराशर हि जोडी फेमस होती. दोघेही तरुण, तडफदार आणि हँडसम! इन्साफ का तराजू, निकाह हे त्याचे गाजलेले सिनेमे. दीपक पराशर तर मोठा मॉडेल होता. सिनेमात सोबतीला रंजिता होती. पण एवढं सगळं असून ही या सिनेमाची भट्टी काही जमली नाही. प्रेमाच्या प्रणयी त्रिकोणाभोवती फिरणारे कथानक प्रेक्षकांना फारसे आवडले नाही. या गाण्याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे या गाण्यामुळे भारतीय चित्रपट सृष्टीला ‘निदा’ फाजली सारखा गुणी गीतकार
मिळाला. पुढे नाखुदा, हरजाई, रजिया सुलतान, सूर या सिनेमातील त्यांची गाणी गाजली . त्यांच्या लेखणीतून उतरलेलं हे पाहिलं गाजलेलं गाणं ठरलं. या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हेच गाणे हेमलता आणि मनहर यांनी चित्रपटात देखील स्वतंत्र रित्या गायले आहे! म्हणजे एकच गाणे तीन वेगवेगळ्या गायकांनी स्वतंत्र रित्या गायलेलं कदाचित एकमेव गाणे असावे. रफीचे (Rafi) गाणे थोडे द्रुत गतीत आहे तर इतर दोन्ही संथ गतीत आहेत. उषा खन्ना या भारतातील सर्वाधिक यशस्वी महिला संगीतकार आहेत. या गाण्याचे ऑर्केस्ट्रेशन जबरदस्त होते. पार्टी सॉंग असल्याने पाश्चिमात्य वाद्यांचा मुबलक वापर दिसतो.