दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
पायाला दुखापत असून ‘हे’ गाणे चित्रित झाले…
अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांचा सत्तरच्या दशकातील उत्तरार्ध मोठा झंजावाताचा होता. या काळात त्यांचा प्रत्येक सिनेमा सुपरहिट होत होता. ॲक्शन, इमोशन, ट्रॅजेडी, कॉमेडी या प्रत्येक प्रांतात अमिताभ प्रचंड यशस्वी होत होता. १९७८ साली अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्रिशूल, डॉन, गंगा की सौगंध, मुकद्दर का सिकंदर, कस्मे वादे, बेशरम … यातील महत्त्वाचा सिनेमा होता ‘डॉन’.
हा खरंतर चार वर्षे निर्मिती प्रक्रियेत होता. या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान अनेक घडामोडी घडल्या. चित्रपटाचे छायाचित्रकार आणि निर्माते होते नरिमन इराणी. त्यांचे शूटिंगच्या दरम्यानच निधन झाले. हा चित्रपट बंद पडतो की काय असं वाटत असताना; चित्रपटातील सर्व कलावंतांनी आपल्या मानधनांमध्ये मोठी कपात करून हा सिनेमा जिद्दीने पूर्ण केला. सर्व पैसे संपल्याने कोणतेही प्रमोशन न करता १२ मे १९७८ रोजी प्रदर्शित झाला. आणि बम्पर हिट झाला.(amitabh bachchan)
चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांनी अलीकडेच एका इंग्रजी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाच्या बऱ्याच आठवणी शेअर केल्या आहेत. या चित्रपटात ‘खाई के पान बनारस वाला….’ हे गाणं चित्रपट संपूर्ण शूट झाल्यानंतर इन्सर्ट केले होते, हा किस्सा तुम्हाला माहिती आहे. पण या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या उजव्या पायाला मोठी इजा झाली होती आणि त्या अवस्थेत देखील त्यांनी या गाण्याचे शूट केले होते. कारण कुठल्याही परिस्थितीत हा चित्रपट लवकरात लवकर पूर्ण करून प्रदर्शित करायचा होता. म्हणून अमिताभ बच्चनने प्रोफेशनलीझम दाखवत आपल्या दुःखाचे भांडवल न करत आणि प्रचंड वेदना सहन करत हे गाणं चित्रीत केले होते. काय होत हा किस्सा?
‘डॉन’ हा चित्रपट संपूर्ण शूट झाल्यानंतर तो अभिनेता मनोज कुमार यांना दाखवण्यात आला.कारण चंद्रा बारोट त्यांचा एकेकाळी असिस्टंट होता व त्यांच्या मुळेच ‘डॉन’ त्याला दिग्दर्शनासाठी मिळाला होता. मनोज कुमार यांनी चित्रपटाचे कौतुक तर केलेच. परंतु त्यांनी सांगितले की चित्रपटाच्या सेकंड हाफमध्ये सिनेमा खूपच वेगवान आणि ॲक्शन पॅकड झाला आहे. प्रेक्षकांना अजिबात उसंत मिळत नाही. त्यामुळे एखादं गाणं यात तुम्ही टाका. सलीम जावेद यांना खरंतर हा बदल आवडला नाही परंतु सर्वांनीच आग्रह धरल्यामुळे त्यांनी एक गाणे त्यात इन्सर्ट करायचे ठरवले. आणि ‘खाई के पान बनारस वाला….’ हे गाणे सिनेमात आले.
या गाण्याच्या चित्रीकरणाच्या दिवशी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) दोन चित्रपटाचे शूटिंग करत होता. डॉनच्या या गाण्याचे शूट मेहबूब स्टुडिओमध्ये आणि त्याचा काही भाग हा एक्चुअल धोबीघाटवर शूट करायचा होता. महबूब स्टुडिओतील शूटिंग शेड्युल दुपारी दोन ते रात्री दहा असे होते. त्याच दिवशी सकाळी सात ते दोन यावेळी प्रकाश मेहरा यांच्या एका चित्रपटाचे शूट करणार होता. हे चित्रीकरण ठाण्याच्या घोडबंदर रोड जवळच्या चायना क्रीक येथे होणार होते. हा एक ॲक्शन सिक्वेन्स होता. या शूटच्या वेळी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या उजव्या पायाला इजा झाली. तसेच त्यांच्या घोट्याला दुखापत देखील झाली. तशाही अवस्थेत लंगडत लंगडत अमिताभ बच्चन मेहबूब स्टुडिओमध्ये पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की गाण्याचे शूट पायात काहीही चप्पल बूट न घालता करायचे आहे. पायाला प्रचंड वेदना होत होत्या. घोट्यामध्ये मुकामार लागल्यामुळे तिथे देखील वेदना होत्या. अमिताभने सरळ डॉक्टरला बोलावून पेन किलर इंजेक्शन घेतले आणि गाण्याची शूटिंग सुरू केले.
=======
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ अंडररेटेड पण ग्रेट सिनेमा
=======
या गाण्याला जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल यात बरेचसे शॉटस हे लॉन्ग शॉट्स आहेत. अमिताभने (amitabh bachchan) या गाण्याच्या वेळेला पेन किलर इंजेक्शन्स घेतल्याने तो शूट करू शकला. या गाण्याच्या शूटच्या वेळी त्याने भरपूर बनारसी पान देखील खाल्ले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अमिताभच्या जिभेला फोड आले होते आणि तो बोलू शकत नव्हता! गाण्याची चित्रिकरण झाल्यानंतर अमिताभला काळजी होती की पायाच्या वेदना त्याच्या चेहऱ्यावर दिसत की काय पण रशेस बघितल्यानंतर त्याला समाधान वाटले. अशाप्रकारे पुढचे दोन-तीन दिवसांमध्ये गाण्याचे चित्रीकरण पूर्ण करून टाकले.