‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सलीम जावेद यांनी ऋषी कपूर ला काय धमकी दिली होती?
सत्तर आणि ऐंशी च्या दशकातील चॉकलेट हिरो ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी २०१६ साली ‘खुल्लम खुल्ला’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले. या पुस्तकात अनेक मनोरंजक गोष्टींसोबत काही धक्कादायक गोष्टींचा देखील खुलासा केलेला आहे. सत्तरच्या दशकातील सिनेमाच्या दुनियेत कथा, पटकथा आणि संवाद लेखन सलीम जावेद यांचा प्रचंड मोठा बोलबाला होता ते अक्षरशः किंगमेकर बनले होते. त्यांचे चित्रपट सुपर डुपर हिट बनत होते. अमिताभ बच्चन यांची कला कारकीर्द घडवण्यामध्ये या जोडीचा मोठा वाटा होता. असे असतानाही त्या काळात एकदा अभिनेता ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी सलीम जावेद यांची एक ऑफर नाकारली होती आणि त्यावरून सलीम खान यांनी ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना त्यांचे फिल्मी करिअर खतम करून टाकण्याची धमकी दिली होती.
हा मोठा इंटरेस्टिंग किस्सा या पुस्तकात वाचायला मिळतो. काय होत हा नेमका किस्सा? काय धमकी दिली होती सलीम खान यांनी? साधारणत: १९७६ मध्ये सलीम जावेद यांनी ऋषी कपूरला (Rishi Kapoor) यश चोप्रा दिग्दर्शित ‘त्रिशूल’ या चित्रपटातील एक भूमिका ऑफर केली. ऋषी कपूर यांना ती भूमिका फारशी आवडली नाही. त्यामुळे त्यांनी ही ऑफर नाकारली. सलीम जावेद यांना तो स्वतःचा अपमान वाटला! आपण ऑफर केलेली भूमिका ऋषी कपूर (Rishi Kapoor) सारखा न्यू कमर नाकारतो म्हणजे काय? कारण त्याकाळी सलीम जावेद अक्षरश: परीस बनले होते. ते ज्या गोष्टीला हात लावत ते सोने होत होते. असे असताना एक नवीन तरुण नायक आपण ऑफर केलेली भूमिका नाकारतो याचा त्यांना प्रचंड संताप आला.
मुंबईच्या एका पब मध्ये जेव्हा ऋषी कपूर (Rishi Kapoor) आपल्या मित्रांसोबत तिथे बसला होता आणि स्नुकर खेळत होता तेव्हा सलीम जावेद तिथे आले. ऋषी कपूर ला पाहून त्यांचा पारा आणखी चढला. सलीम खान ऋषी कपूरच्या जवळ आले आणि म्हणाले,” तू आमची ऑफर नाकारण्याची हिंमत कशी काय दाखवू शकतो?” त्यावर ऋषी कपूर (Rishi Kapoor) म्हणाला,” मला ती भूमिका आवडली नाही. म्हणून मी तुमची ऑफर नाकारली. that’s it” त्यावर सलीम खान प्रचंड संतापून म्हणाले,” तुला माहिती आहे का तुझ्या नकारामुळे तू तुझे केवढे नुकसान करून घेत आहेस? तुझे फिल्म करिअर आम्ही एका झटक्यात खतम करू शकतो!” त्यावर ऋषी कपूरने बेफिकर पणे खांदे उडवल्यानंतर ते आणखी चिडले आणि म्हणाले ,” राजेश खन्ना ने देखील आमचा ‘जंजीर’ हा चित्रपट असाच नाकारला होता. तेव्हा आम्ही काय केले? आम्ही त्याला पर्याय म्हणून अमिताभ बच्चनला उभे केले आणि राजेश खन्नाची संपूर्ण सिने कारकीर्द एका क्षणात नष्ट झाली!” त्यावर ऋषी कपूर (Rishi Kapoor) म्हणाला,” तुम्ही काय माझे वाकडे करू शकता?” त्यावर सलीम म्हणाले,” आता बघतो तुझ्या सोबत कोण काम करतो आणि कोण तुला सिनेमात भूमिका देतो ते?” ऋषी कपूरने पुस्तकात लिहिले आहे “त्या दिवशी मी ड्रिंक्स घेतले होते त्यामुळे माझ्या मित्रांनी मला बाजूला केले. तरुण रक्त होतं. त्या मुले परिणामांची भीती वाटली नाही. पण सलीम जावेद च्या धमकीचा फारसा परिणाम झाला नाही. कारण पुढच्या वर्षी माझा मनमोहन देसाई यांचा ‘अमर अकबर अँथनी’ हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला आणि याच वर्षी सलीम जावेदचा ‘इमान धरम’ हा चित्रपट सुपरफ्लॉप झाला!
========
हे देखील वाचा : पंतप्रधान यांच्या एका सुचनेवरून बनला हा माइल
========
सलीम जावेद यांनी ऋषी कपूर यांना ‘त्रिशूल’ या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका ऑफर केली होती? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही भूमिका होती, जी भूमिका नंतर सचिन पिळगावकर यांनी केली! एकंदरीत ‘त्रिशूल’ चित्रपटाचा आवाका पाहता ही भूमिका तशी किरकोळ भूमिका म्हणावी लागेल. त्यामुळे ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी ती भूमिका नाकारली या त्यांचे काहीही चुकले नाही. ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि सलीम जावेद यांच्यात पुढे मतैक्य कधीच झाले नाही का? राजकारण आणि सिनेमाच्या दुनियेत तसा कायम कोणीच कोणाचा मित्र आणि दुश्मन रहात नाही.
त्याच न्यायाने १९८५ साली आलेल्या ‘जमाना’ या चित्रपटात ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी भूमिका केली होती आणि हा चित्रपट सलीम जावेद यांनी लिहिला होता. तसेच सलीम जावेद जोडी विभक्त झाल्यानंतर जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या ‘सागर’ या चित्रपटात ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांची प्रमुख भूमिका होती. पण एकूणच ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी त्या काळात जे धाडस दाखवलं त्याचं कौतुक करायला हवे!