मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
‘मी अनेकदा स्वतला…’ अजिंक्य राऊतचा खुलासा
मैत्री म्हटली की, त्यात भांडणं, मतभेद, वादविवाद या गोष्टी ओघाने येतातच. मग याला कलाकारांची मैत्री देखील अपवाद नाहीत. नुकतंच अभिनेता ‘अजिंक्य राऊत'(Ajinkya Raut) याच्याशी गप्पा मारताना त्याला “होळीच्या निमित्ताने कोणत्या वाईट गोष्टींचं दहन करशील ?” असा प्रश्न विचारला असता त्यावर अजिंक्यने मोकळेपणाने अत्यंत खाजगी उत्तर दिलं.
तो म्हणाला, “मी कधी-कधी स्वतःला खूप वाहून घेतो. इतकं की, स्वतःची किंमत करणंच बंद करेन की काय असं वाटायला लागतं. आपण समोरच्यासाठी जेवढं करतो, त्याच्या १% तरी आपल्याला मिळावं असं मला वाटतं. अनेकदा आपण समोरच्याला फक्त चांगलंच समजतो, पण त्या व्यक्तीत किंवा त्यांच्या आजुबाजुला असणा-यांत खूप Insecurity असते. लोक आपल्याला इतकं ग्राह्य कसं धरू शकतात हे आजवर मला कळलेलं नाही. नुकतंच काही लोकांकडुन मला इतकं Insecure फिल करण्यात आलं, एकटं पाडण्यात आलं की, मला कळेना माझी चूक तरी काय? माझा प्रॉब्लेम काय? पण, आता मात्रं मला जे स्वतःला खूप वाहून घेतो ते थांबवून ‘आपण बरं नी आपलं काम बरं’ हे आत्मसात करायला आवडेल.”
हे सर्व बोलताना अजिंक्यने (Ajinkya Raut) उघडपणे नाव जरी घेतलं नसलं, तरी या वक्तव्यामुळे तो इंडस्ट्रीतील अतिशय जवळच्या व्यक्तीकडून दुखावला गेला आहे एवढं मात्रं स्पष्ट झालं आहे. ही व्यक्ती नेमकी कोण असावी यावर चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, अजिंक्यने (Ajinkya Raut) त्याची जुनी सहकलाकार व अभिनेत्री ‘ह्रता दुर्गुळे’ हिला इन्स्टाग्रामवर अचानक ‘Unfollow’ केलं असल्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.अजिंक्यच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचं तर, ‘विठू माऊली’ या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्याची ‘मनं उडू उडू झालं’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली. सध्या तो ‘सोनी मराठी’वरील ‘अबोल प्रितीची अजब कहाणी’ मालिकेत काम करत आहे. दरम्यान, त्याचे ‘सरी’ व ‘कन्नी’ हे चित्रपटही येऊन गेले आहेत.
मधुरा शिधये