मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
बबीता सोबत लग्न करण्यासाठी बांगलादेशमध्ये उपोषण?
कधी कधी वर्तमानपत्रात आलेले एखाद्या बातमीने खूप खळबळ उडून जाते आणि नंतर त्या बातमीतील तथ्य लक्षात आल्यानंतर फोलपणा देखील लक्षात येतो! असाच काहीसा प्रकार १९९१ साली झाला होता. १६ मार्च १९९१ या दिवशी भारतातील अनेक प्रमुख वर्तमानपत्रात एक बातमी
प्रसिध्द झाली होती. त्या बातमीचा गोषवारा साधारणत: असा होता की बांगला देशची राजधानी ढाका येथे एक व्यक्ती ज्याचे नाव मुशरैल हुसेन आहे. त्याने बांगला देश मधील ढाक्याच्या नॅशनल प्रेस कौन्सिलच्या समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. हे उपोषण करण्याचे कारण त्याच्या प्रेमाचा स्वीकार बबीता या अभिनेत्रीने करायला पाहिजे आणि त्याच्याशी लग्न करायला पाहिजे’ हे होते. देशातील प्रमुख वृत्तपत्रात जेव्हा अशी बातमी येते तेव्हा साहजिकच मोठा गोंधळ उडतो, खळबळ उडते. तशीच काहीशी परिस्थिती त्यावेळेला झाली होती.
अर्थात त्यावेळी आजच्यासारखा सोशल मीडिया नव्हता. मोबाईल नव्हते. तरी देखील बबीता च्या चाहत्यांमध्ये हा गोंधळ नक्कीच वाढला होता.
याचे कारण असे होते की बबिताचे (Babita) लग्न होऊन तब्बल वीस वर्षे झाले होते. अभिनेता रणधीर कपूर सोबत तिने लग्न केले.तो देखील आत इतिहास झाला होता. आता या जुन्या अभिनेत्री सोबत लग्न करण्यासाठी कोण आमरण उपाषण करेल? बांगलादेशातील एक व्यक्ती भारतातील एका विवाहित स्त्रीच्या प्रेमासाठी आणि लग्नासाठी उपोषणाला कसा काय बसू शकतो? दुसरी गोष्ट तिची मुलगी करीना कपूर हिचा पहिला चित्रपट ‘प्रेम कैदी ‘ २१ जून १९९१ ला प्रदर्शित होणार होता. बऱ्याच जणांना हा एक कपूर फॅमिली चा स्टंट आहे की काय असे देखील वाटू लागले? पण स्टंट करायचा तर ते करिश्मा कपूर बाबत करतील तिच्या आई चे नाव का घेतील? प्रश्न प्रश्न प्रश्न. संध्याकाळपर्यंत अशा चर्चांना उधाण होते. परंतु नंतर या बातमी तील तथ्य समोर आले. आणि ते तथ्य काही वेगळेच होते!
त्याचा अभिनेत्री बबीता (Babita) सोबत अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. काय होते तथ्य? हा बांगलादेशी व्यक्ती ज्या बबीतासाठी उपोषण करत होता ती बबीता (Babita) हिंदी सिनेमाची नायिका बबीता नव्हती तर ती एक बांगलादेशी अभिनेत्री बबिता (Babita) होती. १९७३ साली दिग्दर्शक सत्यजित रे यांनी एक बंगाली सिनेमा दिग्दर्शित केला होता ‘अशनी संकेत’. या चित्रपटाची नायिका बांगलादेशी अभिनेत्री बबीता होती. या बबीतावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या या बांगलादेशी व्यक्तीने १९९१ साली उपोषण सुरू केले होते. ही बातमी बांगलादेशच्या वर्तमानपत्रात आली होती. त्यानंतर आपल्या काही बंगाली वृत्तपत्रात देखील दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध झाली. परंतु आपल्याकडील मीडियाने घाईघाईने ही बातमी छापताना हिंदी बबीता समजून ही बातमी छापून टाकली आणि सर्व गोंधळ उडाला.
जाता जाता थोडंसं बबिता या अभिनेत्री बद्दल: बबीता (Babita) या अभिनेत्री ने फक्त १९ हिंदी चित्रपटातून भूमिका केल्या. १९६६ ते १९७२ हा तिचा चित्रपटातील कालखंड. २० एप्रिल १९४७ रोजी कराची येथे जन्मलेल्या बबीताच्या (Babita) कुटुंबियांनी फाळणीनंतर भारतात राहणे पसंत केले. अभिनेता हरी शिवदासांनी यांची ती कन्या. अभिनेत्री साधना ची ती कझिन. ‘दस लाख’ हा संजय खान सोबतचा तिचा पहिला चित्रपट. पण तिला खरी ओळख मिळाली राजेश खन्ना सोबतच्या ‘राज’ जितेंद्र सोबतच्या ‘फर्ज’ या चित्रपटापासून.
हे देखील पहा : बॉलीवूडमध्ये हॉरर मूव्हीजची सुरुवात करणारा ‘महल’
बबीता (Babita) चे लोकप्रिय चित्रपट म्हणजे हसीना मन जायेगी, एक श्रीमान एक श्रीमती(शशी कपूर) फर्ज,बनफूल, एक हसीना दो दिवाने,औलाद,अनमोल मोती,बिखरे मोती (जितेंद्र) राज,डोली (राजेश खन्ना) , अंजाना(राजेंद्र कुमार) तुमसे अच्छा कौन है (शम्मी कपूर) कब क्यू और कहा(धर्मेंद्र) पहचान (मनोज कुमार) किस्मत (विश्वजीत) कल आज और कल, जीत (रणधीर कपूर)सोने के हाथ, दस लाख(संजय खान) करिष्मा कपूर आणि करीना कपूर या तिच्या दोन मुली. मुलींच्या जन्मानंतर बबीता चा अभिनयाचा प्रवास थांबला.