‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – Talent Hunt’ या स्पर्धेत भाग घ्या आणि कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळवा
संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘. घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा ‘सहकुटुंब हसू या’ म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करत आली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’! या वर्षीही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते आहे. या कार्यक्रमातून नेहमी नवनवीन गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.(Maharashtrachi Hasya Jatra)
नवे पर्व, नवे विषय, नवनवीन स्कीट्स यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होते आहेच. पण आता जर प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात चक्क सहभागी होता येणार, असे म्हटले तर. हो हो तुम्ही बरोबर वाचता आहात. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या कार्यक्रमात प्रेक्षकांना सहभागी होता येणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – Talent Hunt’ असे या स्पर्धेचे नाव असून या स्पर्धेतील विजेत्यांना चक्क महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत सहभागी होता येणार आहे.
सोनी मराठी वाहिनी ही नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीचा मान ठेवत आलेली आहे. नवनवीन उपक्रम राबवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची कला त्यांना अल्पावधीतच अवगत झाली आहे. आता सुरू झालेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – Talent Hunt‘ या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रेक्षकांना एक ते दीड मिनिटांचा व्हिडिओ सोनी लिव्ह ॲपवर अपलोड करायचा आहे. या व्हिडिओमध्ये स्पर्धकांनी आपले सगळ्यांत उत्तम सादरीकरण पाठवावे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट स्पर्धकांना महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमध्ये सहभागी होता येईल.(Maharashtrachi Hasya Jatra)
========================================
हे देखील वाचा: Aboli Marathi Serial: ‘अबोली’ मालिकेत होणार ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांची एण्ट्री…
========================================
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – Talent Hunt‘ या स्पर्धेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी पुढील लिंकवर जा. https://sonyliv.onelink.me/Imq1/c30ug3g8 . अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी सोनी लिव्ह ॲपला भेट द्या. विजेत्यांची नावे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या कार्यक्रमाच्या पुढील भागात झळकतील. तर पाहायला विसरू नका, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, सहकुटुंब हसू या! शनि. आणि रवि. रात्री 9 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर.