‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
ऋषी आणि नीतू चा धमाल ‘रफू चक्कर’ आठवतो कां?
ऋषी कपूर (Rishi) आणि नीतू सिंग यांचा एक चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे नाव होतं ‘रफूचक्कर’. या सिनेमाचे दिग्दर्शन नरेंद्र बेदी यांनी केले होते. हा सिनेमा १९५९ साली आलेल्या अमेरिकन मूव्ही ‘सम लाईक इन हॉट’ चा हिंदी अवतार होता. हि एक कॉमेडी मूव्ही होती. या सिनेमात अर्ध्याहून अधिक काळ काळ ऋषी कपूर (Rishi) आणि पेंटल या दोघांना मुलींच्या पेहरावातच वावरायचे होते. त्यांच्या सिनेमातील भूमिकाच तशा होत्या. सुरुवातीला थोडं कठीण जावू लागलं पण हळू हळू दोघांना सवय झाली. ऋषी कपूर (Rishi) त्या अटायर मध्ये कमालीचा देखणा (कि देखणी?) दिसत होता. या सिनेमाचे बरचसे शूटिंग काश्मीरला देखील झाले होते. तिथे ओबेरॉय हॉटेलमध्ये सर्व कलाकारांचा मुक्काम होता.
हॉटेल च्या शेजारीच शूट होते. एकदा शूटिंग होऊन परत आल्यानंतर पेंटल आणि ऋषी कपूर (Rishi) लेडीज गेट अप मध्येच होते, त्याच पेहरावात होते आणि या मुलींच्या पेहरावातच ओबेरॉय हॉटेलच्या नकळत पणे जेन्टस वॉशरूम मध्ये गेले. आणि थोड्यावेळाने हसत हसत परत आले. जेन्ट्स वॉशरूम त्या दोघांनी त्या लेडीज पेहरावात मध्ये जाणे आणि परत येणे हॉटेलमधील काही उपस्थितांच्या लक्षात आले. त्यात दोन फॉरेनर्स देखील होते. त्यांना हा प्रकार खूपच वेगळा वाटला. त्या दोन फॉरेनर्स थोडे ड्रिंक केले होते. त्यामुळे त्यांना तो प्रकार विचित्र वाटला. आणि ते दोघे या दोन सुंदर स्त्रियांच्या मागे लागले. तोवर ऋषी कपूर (Rishi) आणि पेंटल हे दोघे हॉटेलच्या बाहेर पडले होते आणि आपल्या सेट कडे चालले होते. त्यांना जाताना त्या फॉरेनर्स ने बघितले होते ते देखील त्यांच्या मागे मागे जाऊ लागले. पण रस्ता चुकल्यामुळे त्याला काही हे दोघे सापडले नाही.
दुसऱ्या दिवशी जेव्हा ऋषी कपूर (Rishi) आणि पेंटल पुन्हा हॉटेलमध्ये आले. त्यावेळी त्यांच्या हॉटेलचा वेटर त्यांच्याकडे आला आणि म्हणाला,” कल तुम दोनो ने ऐसा क्या किया की वो फिरंगी हॉटेल मे हर किसी को पूछ रहे थे की जेन्ट्स वॉशरूम मे जाने वाली व दोन खूबसूरत हसीनाये कहां चली गई?” तेव्हा ऋषी कपूर (Rishi) आणि पेंटल यांच्या सर्व प्रकार लक्षात आला आणि त्यांनी कपाळाला हात लावला, आणि जोरजोरात हसू लागले. मात्र त्यांनी यानंतर लक्षात ठेवलं की भले स्त्रियांचे पोशाख आपण परिधान करत असलो तरी स्त्रियांची बेइज्जती होईल असे कुठलेही कृत्य आपल्या हातून घडता कामा नये आणि त्यानंतर ऋषी कपूरने (Rishi) आयुष्यात ज्या ज्या वेळेला स्त्री भूमिका साकारलं त्यावेळी या गोष्टीचे लक्ष ठेवले.
हे देखील वाचा : असा झाला ‘लो बजेट फॅमिली एन्टरटेन्मेंट’च्या यशाचा
जाता जाता थोडासा ‘रफू चक्कर’ या चित्रपटाबद्दल. भले या चित्रपटाला त्या काळात फारसे व्यवसायिक यश मिळाले नसले तरी त्या काळात या सिनेमातील गाणी खूप गाजली होती. गुलशन बावरा यांनी लिहिलेल्या गीतांना संगीत कल्याणजी आनंदजी यांनी दिले होते. या चित्रपटात
पहिल्यांदाच कांचन (संगीतकार बाबला ची पत्नी) या गायिकेचा स्वर वापरण्यात आला. तिच्या आवाजात या चित्रपटात दोन गाणी होती.
एक गीत शैलेंद्रसिंग यांच्यासोबत ड्युएट ‘तुमको मेरे दिल ने पुकारा है बडे नाज से अपनी आवाज मिला दो ‘ तर दुसरे गीत कांचनचे सोलो घेत होते जे खूप गाजले या गाण्याचे बोल होते ‘ऐ जमाने तू करले सितम पे सितम जिनको मिलना है वो मिलके रहेंगे’ या चित्रपटात कल्याणजी आनंदजी यांनी अजीज नाजा या त्या काळातील सुप्रसिद्ध कव्वाली गायकाकडून एक भजन गाऊन घेतले होते. त्याचे बोल होते ‘भजन बिना चैन ना आये राम’. शैलेंद्रसिंग आणि आशा भोसले यांच्या स्वरातील ‘किसी पे दिल अगर आ जाये तो क्या होता है वही होता है जो मंजुरे खुदा होता है’ तसेच आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील ‘धकधक धक धक बॉम्बे बरोडा तक…’ हे गाणे देखील त्या काळात खूप चालले होते.