‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आशिकी: महेश भट यांचा मेलडीयस म्युझिकल हिट सिनेमा !
ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस हिंदी चित्रपट पुन्हा एकदा सुरील्या संगीतामध्ये न्हावू लागला. पुन्हा एकदा मेलडीयस म्युझिकचा गोल्डन पीरेड सुरु झाला. या बदलाचा प्रमुख साक्षीदार होता महेश भट दिग्दर्शित ‘आशिकी’.(aashiqui) हा १९९० साली प्रदर्शित झालेला चित्रपट. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास तीस-पस्तीस वर्षे झाली तरी यातील प्रत्येक गाणं आज देखील लोकप्रिय आहे. मुळात या चित्रपटाची गंमत अशी की यातली गाणी आधी रेकॉर्ड झाली होती. गुलशन कुमार यांच्या टी सिरीज कंपनीतर्फे त्या काळात म्युझिक अल्बम्स येत होते. त्यातीलच हा एक अल्बम होता. हा लवकरच मार्केटमध्ये येणारच होता.
नेमकं त्याचवेळी महेश भट यांची गुलशन कुमार यांच्याशी भेट झाली. जेव्हा गुलशन कुमार यांनी ही गाणी त्यांना ऐकवली तेव्हा महेश भट खूपच प्रभावित झाले आणि ते म्हणाले, ” थांबा. हा म्युझिक अल्बम प्रदर्शित करण्याची घाई करू नका. या संपूर्ण गाण्यांना एकत्रित गुंफणारी एक कथा आपण तयार करू आणि त्यावर एक चांगला म्युझिकल चित्रपट तयार करतो.” गुलशन कुमार राजी झाले आणि अशा पद्धतीने आधी संपूर्ण गाणी तयार असताना आणि चित्रपटाची कथा तयार नसताना या सिनेमाचा मुहूर्त झाला! रॉबिन भट आणि आकाश खुराणा यांनी स्टोरी आणि स्क्रीन प्लेची जवाबदारी घेतली. महेश भट यांनी या चित्रपटावर काम सुरू केले.(aashiqui)
यातील नायकाची भूमिका राहुल रॉय यांना कशी मिळाली? राहुल रॉय यांची आई इंद्राणी रॉय या ख्यातनाम लेखिका होत्या आणि अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध होते. तसेच त्या काळात त्या युनिसेफचे देखील चॅरीटी वर्क करत होत्या. एकदा महेश भट त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला असताना त्यांना राहुल रॉय यांचा फोटो दिवाणखान्यात दिसला. राहुल त्या काळात मॉडेलिंग करत होता. पाहताक्षणी महेश भट यांना राहुल आवडला आणि त्यांनी इंद्राणी रॉय यांना विचारले, ”राहुल माझ्या पुढच्या चित्रपटात नायकाची भूमिका करेल का?” इंद्राणी रॉय म्हणाल्या, ”माझी काही हरकत नाही.” राहुल रॉय यांना भट यांनी बोलावून घेतले.(aashiqui)
त्यांची स्क्रीन टेस्ट घेतली आणि चित्रपटात प्रमुख नायकाची भूमिका दिली. नायिकेची भूमिका अनु अग्रवाल यांना मिळाली. अनु अग्रवाल हिचे साधे, सिंपल दिसणे हेच महेश भट यांना खूप आवडलं. राहुल आणि अनु हे तसे प्रेक्षकांसाठी ‘अननोन फेस’ होते. त्यामुळे महेश भट यांनी या सिनेमाचे टीजर जेव्हा रिलीज केला; तेव्हा एका जॅकेटच्या आत दोघांची चेहरे लपवले होते! त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती.
या सिनेमाला संगीत नदीम श्रवण यांनी दिले होते. यातील सर्व गाणी कुमार सानू यांनी गायलेली होती फक्त एक गीत उदित नारायण यांनी गायलेले होते. गायिका मात्र सगळीकडे अनुराधा पौडवाल याच होत्या. या चित्रपटात नायकाची भूमिका मिळवण्यासाठी दीपक तिजोरी देखील उत्सुक होता परंतु महेश भट यांनी या चित्रपटात दीपक तिजोरीला नायकाच्या मित्राची भूमिका दिली. २७ जुलै १९९० या दिवशी आशिकी (aashiqui) चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासून सुपरहिट झाला. या सिनेमाच्या संगीताने आधीचे सर्व विक्रम मोडीत काढले. तब्बल दोन कोटी कॅसेट्स या सिनेमाच्या विकल्या गेल्या!
या (aashiqui) चित्रपटातील उदित नारायण च्या स्वरातील ‘मेरा दिल तेरे लिये धडकता है’ या गाण्यातील जो आलाप आहे तो खरंतर कॉपीड आहे. जॉन फरना यांच्या ‘यु आर द व्हॉइस’ या गाजलेल्या गाण्यावर. ‘धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना’ हे गाणे देखील ‘कम इन टू माय लाईफ’ या गाण्यावरून घेतले आहे. जॉय सिम्स यांनी गायलेलं हे गाणं होतं. यातील ‘जाने जिगर जानेमन मुझको है तेरी कसम’ हे गाणे महेश भट यांनी १९८९ साली आलेल्या ‘आंधीया’ या चित्रपटातील एका गाण्यावरून घेतले होते. खरंतर ‘आंधीया’ या चित्रपटातील गाणे १९८४ साली आलेल्या पाकिस्तानी चित्रपट ‘दूरियां’ या चित्रपटातील एका गाण्यावर प्रेरित होते आणि या ‘दूरियां’ मधील गाण्याचे मूळ देखील आपल्या बॉलिवूडमधील प्रोफेसर (१९६२) या चित्रपटातील ‘मै चली मै चली पीछे पीछे जहा….’ या गाण्यात सापडते. ‘आशिकी’ तील ‘तू मेरी जिंदगी है…’ हे गाणे देखील एका पाकिस्तानी गाण्याच्या चालीवर भेटले होते!
========
हे देखील वाचा : एकाच सिनेमाचे दोन रिमेक: एक सुपरहिट तर दुसरा सुपर फ्लॉप!
========
या (aashiqui) चित्रपटातील राहुल रॉय यांचे हेअर स्टाईल त्या काळात खूप लोकप्रिय झाली होती. या सिनेमातील राहुल रॉय यांच्यासाठी डबिंग आदित्य पंचोली यांनी केले होते. खरंतर सचिन पिळगावकर यांना हे काम द्यायचे महेश भट यांच्या डोक्यात होते पण नंतर विचार बदलला. अनु अग्रवाल तेव्हा नॅशनल क्रश झाली होती. तिच्या साध्या रूपावर प्रेक्षक खूप भाळले होते. ‘द गर्ल अँट नेक्स्ट डोअर’ अशी तिची जाहिरात झाली होती. पण १९९४ साली आलेल्या मणी कौल दिग्दर्शित ‘द क्लाऊड डोअर’ या चित्रपटात तिने चक्क एक न्यूड सीन दिला होता! तेव्हा तिच्या चाहत्यांना हा मोठा ‘कल्चरल शॉक’ होता. २ ऑक्टोबर १९९९ या दिवशी अनु अग्रवाल हिचा मोठा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर ती एक महिना कोमा मध्ये होती. तिच्या २९ हाडांना मोठी इजा झाली तर तिचा चेहरा आणि डावा हात पूर्णपणे पॅरॅलाईज झाला. तिला बरे होण्यासाठी खूप काळ जावा लागला पण यामुळे तिचा सिनेमातील कमबॅक करण्याचा चान्स पूर्णपणे गेला.
महेश भट यांच्यासाठी हा ‘आशिकी’ (aashiqui) चित्रपट प्रचंड लकी ठरला. याच सिनेमाचा रिमेक त्यांनी २०१५ साली बनवला पण त्याला पहिल्या आशिकी एवढे यश मिळाले नाही.