‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
Biggest Movie In The World: ‘हा’ आहे आतापर्यंतचा सर्वात मोठा सिनेमा, बघायला लागेल तब्बल 3 दिवस
बॉलीवूडचे सिनेमे आजकाल २ तासात संपत असतील, पण प्रत्येक चित्रपट हा 1-2 तास असतो असे नाही. असे अनेक सिनेमे आहेत जे जवळपास 3 तास चालले. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाचा रन टाइम पाच तासांहून अधिक होता, त्यामुळे तो दोन भागांत प्रदर्शित करण्यात आला.पण तुम्हाला माहित आहे का की एक चित्रपट असा होता ज्याचा रन टायन तीन दिवसांपेक्षा जास्त आहे. आजचे सिनेमे दोन ते अडीच तासात संपतात ,मात्र १९८७ साली आलेला ‘द क्युअर फॉर इन्सोम्निया’ हा चित्रपट ८५ तासांच्या रनिंग टाईममुळे जगातील सर्वात लांब चित्रपट मानला जातो. चला तर मग जाणून घेऊया हा चित्रपट इतका मोठा का होता आणि त्याच्यात काय खास होतं.(Biggest Movie In The World)
सिनेमा हा समाजाचा आरसा समजला असतो. आणि चित्रपट हे साधारणपणे ३ तासांचे असतात. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील सर्वात लांब चित्रपट 3 दिवस 15 तासांचा आहे. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाविषयी सांगणार आहोत. ‘द क्युअर फॉर इन्सोम्निया’ असं या चित्रपटाचं नाव आहे. जर तुम्ही ते बघायला सुरुवात केली तर 3 दिवस 15 तासांनंतर हा चित्रपट संपेल. नावावरुनच स्पष्ट कळेल की हा हॉलिवूडचा चित्रपट असून हा चित्रपट ८७ तासांचा आहे. आणि हा चित्रपट १९८७ साली प्रदर्शित झाला होता.
३१ जानेवारी १९८७ रोजी प्रकाशित झालेला ‘द क्युअर फॉर इन्सोम्निया’ हा चित्रपट शिकागोच्या शाळेत दाखवण्यात आला. या चित्रपटात कुठल्याही प्रकारचे कथाकथानक नाही, ८५ तासांच्या या सिनेमात कवी एल. डी. ग्रोबन सुमारे पाच हजार पानांच्या आपल्या कवितांचे वाचन करतात, तर उर्वरित चित्रपटात हेवी मेटल म्युझिक आणि पोर्नोग्राफी दाखविण्यात आली आहे. विशेषत: झोपेच्या समस्येशी झगडणाऱ्या लोकांसाठी हा चित्रपट बनवण्यात आल्याचे म्हटले जाते.(Biggest Movie In The World)
==============================
हे देखील वाचा:
==============================
हा चित्रपट ३१ जानेवारी १९८७ रोजी प्रदर्शित झाला, जो ३ फेब्रुवारी १९८७ रोजी संपला. हा चित्रपट ३ दिवस १५ तास विनाखंड चालला. ज्यांना झोप येत नाही त्यांच्यासाठी हा चित्रपट बनवण्यात आला होता, त्यामुळे या आजाराच्या नावावरून या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले, या चित्रपटाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही नोंदले गेले आहे. या चित्रपटाला जगातील सर्वात मोठा चित्रपटाचा दर्जा दिला आहे.