Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

Filmfare Marathi: ‘हे’ ठरले उत्कृष्ट सिनेमे व ‘यांनी’ पटकावले महत्वाचे अवॉर्ड
सिनेविश्वातील ‘फिल्मफेअर’ (Filmfare Marathi 2024) या पुरस्काराला नेमकं किती महत्त्व आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची आवश्यकता नाही. चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येकाला एकदा तरी ती ब्लॅक डॉलची ट्रॉफी घरी न्यावीशी वाटते. गेल्या काही वर्षांपासून ‘फिल्मफेअर मराठी’ पुरस्कारही द्यायला सुरुवात झाली. यामुळेच हिंदीसह मराठी कलाकारांमध्येही एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळाली. नुकताच फिल्मफेअर मराठी २०२४ चा सोहळा पार पडला.
यंदाच्या या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ या दोघांनी केलं. याबरोबरच मराठी सिनेविश्वातील बऱ्याच कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. प्राजक्ता माळी, वैभव तत्ववादीसारख्या कलाकारांनी दमदार परफॉर्मन्स देत प्रेक्षकांचं मनोरंजनही केलं. यंदाच्या फिल्मफेअरच्या (Filmfare Marathi 2024) शर्यतीत ‘वाळवी’, ‘ब्यापलोक’, ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’सारख्या चित्रपटांनी बाजी मारली.
===
हेदेखील वाचा : सलमानच्या घराबाहेरील गोळीबारानंतर आता शाहरुख खानच्या सुरक्षेतही वाढ
===
याबरोबरच ‘घर बंदूक बिर्याणी’, ‘झिम्मा २’ आणि ‘उनाड’सारख्या चित्रपटांनाही काही पुरस्कार मिळाले. यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन १८ एप्रिलच्या संध्याकाळी करण्यात आले होते. यावर्षी नेमके कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार (Filmfare Marathi 2024) मिळाले आणि महत्त्वाचे पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावळे याबद्दल आपण जाणून घेऊया.

फिल्मफेअर (Filmfare Marathi 2024) मराठी २०२४ – विजेत्यांची यादी:
सर्वोत्कृष्ट चित्रपट : आत्मपॅम्फ्लेट, बाईपण भारी देवा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आशिष बेंडे ( आत्मपॅम्फ्लेट )
सर्वोत्कृष्ट चित्रपट (Critics) : बापल्योक, नाळ २
सर्वोत्कृष्ट अभिनेता : शशांक शेंडे (बापल्योक)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (Critics) : अंकुश चौधरी (महाराष्ट्र शाहीर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : गौरी देशपांडे (श्यामची आई)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री): प्रियदर्शनी इंदलकर (फुलराणी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Critics): रोहिणी हट्टंगडी (बाईपण भारी देवा)
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम : महाराष्ट्र शाहीर – अजय-अतुल
सर्वोत्कृष्ट पटकथा : मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी ( वाळवी )
सर्वोत्कृष्ट संवाद : परेश मोकाशी (आत्मपॅम्फ्लेट)
जीवनगौरव पुरस्कार : सुहास जोशी
याबरोबरच तंत्रज्ञ विभागातही काही चित्रपटांनी पुरस्कार पटकावले.
सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन: अनमोल भावे (घर बंदुक बिर्याणी)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण: Lawrence Dcunha (उनाड)
सर्वोत्कृष्ट संकलन: फैसल महाडिक, इम्रान महाडिक (आत्मपॅम्फ्लेट).
सर्व विजेत्यांचे सोशल मीडियावर प्रेक्षकांनी अभिनंदन केले आहे. याबरोबरच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिला प्रथमच पदार्पणात फिल्मफेअर (Filmfare Marathi 2024) मिळाला, त्यामुळे तिच्यासाठी हा सोहळा खास होता.