‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
Rakhi Sawant ला सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का, आदिल दुर्राणी व्हिडिओ लीक प्रकरणी तुरुंगात जावे लागणार!
बॉलिवूड अभिनेत्री आणि ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंतला सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. राखी सावंत आणि आदिल दुर्रानी प्रकरणात अटक टाळण्यासाठी अभिनेत्रीने सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, जो कोर्टाने फेटाळून लावला होता. आता राखी सावंतला चार आठवड्यांत कनिष्ठ न्यायालयात शरणागती पत्करावी लागणार आहे. राखीचा एक्स पती आदिल दुर्रानी याने अभिनेत्रीवर त्याचा अश्लील व्हिडिओ लीक केल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता, ज्यात मुंबई उच्च न्यायालयाने राखीला दोषी ठरवत तिला अटक करण्याचे आदेश दिले होते. यानंतर राखी सावंतने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला, पण तिथूनही तिची निराशा झाली.(Rakhi Sawant Video Leaked Controversy)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने राखी सावंतची याचिका दोनवेळा फेटाळून लावत तिला शरण येण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सोमवारी राखीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने तिचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्याचबरोबर न्यायाधीशांनी राखी सावंतला चार आठवड्यांत लोअर कोर्टात शरण येण्यास सांगितले आहे, तसे न केल्यास तिला अटक करण्यात येईल.राखी आणि आदिल विभक्त झाल्यापासून दोघांनीही एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
आदिलच्या तक्रारीनंतर राखीवर आयपीसी कलम 500, 34 आणि 67 ए (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील लैंगिक सामग्री प्रकाशित करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिलने राखी सावंतवर आरोप केला होता की, तिने एका टीव्ही शोमध्ये सार्वजनिक व्यासपीठावर त्याचा व्हिडिओ दाखवला आणि तो व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही शेअर केला.
===========================
हे देखील वाचा: घरावर झालेल्या गोळीबारानंतर Salman Khan पहिल्यांदाच दुबईला रवाना…
===========================
तक्रार दाखल झाल्यानंतर राखीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, व्हिडिओचा दर्जा चांगला नाही, त्यात काहीही स्पष्ट दिसत नाही. तसेच आदिल दुर्राणीच्या बाजूने निकाल देताना न्यायालयाने राखी सावंतला शरण येण्याचे आदेश दिले असले तरी तिने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि तिथूनही तिला धक्का बसला असून तिच्या हाती निराशाच आली आहे.