‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
Bipasha Basuने पती Karan Groverला लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त व्हीडीओ आणि सुंदर नोट शेअर करत दिल्या खास शुभेच्छा
बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे आज त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करत आहेत. या प्रसंगाला खास बनवण्यासाठी बिपाशाने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, तसेच पती करणसाठी लिहिलेली एक क्यूट नोटही शेअर केली आहे. बिपाशा आणि करण बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. बिपाशा आणि करण दोघेही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. बिपाशा बासूने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास रोमँटिक व्हिडिओ शेअर करत पती करण सिंग ग्रोव्हरला त्याच्या 8 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच अभिनेत्रीने पती करणसाठी एक क्यूट नोटही लिहिली आहे.(Bipasha Karan Wedding Anniversary)
बिपाशा बासूने काही तासांपूर्वी पती करण सिंग ग्रोव्हरसाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच बिपाशाने करणसाठी एक गोड नोटही लिहिली आहे. बिपाशा आणि करण 30 एप्रिल 2016 रोजी विवाहबंधनात अडकले होते. बिपाशाने या व्हिडिओमध्ये लग्नापासून ते आतापर्यंतचा तिचा 8 वर्षांचा प्रवास दाखवला आहे. यासोबत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “Happy 8th Monkeyversary My Love🩷🧿♾️
Tuvu 🩷🧿♾️
Let’s never stop celebrating every day of our life together … now and forever 🩷🧿♾️
बिपाशाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहते ही दोन्ही स्टार्सना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘लव्ह लव्ह लव्ह’, तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, ‘तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, देव तुम्हा दोघांना आशीर्वाद देईल.’ आणखी एका चाहत्याने लिहिले की, “तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुम्ही दोघं माझ्या सर्व आवडत्या जोडप्यांमध्ये सर्वात खास आहात.”आणखी एका चाहत्याने लिहिले की, “तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुम्ही दोघं खूप क्यूट आणि सुंदर दिसता.” एका चाहत्याने लिहिलं, “खूप क्यूट.”
=============================
=============================
बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर 30 एप्रिल 2016 रोजी विवाहबंधनात अडकले होते. ‘अलोन‘ चित्रपटाच्या सेटवर या दोन्ही स्टार्सची पहिली भेट झाली होती. या चित्रपटात त्याची रील लाईफ केमिस्ट्री रिअल लाईफमध्ये रुपांतरित झाली. लग्नाच्या 6 वर्षानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये बिपाशा बासू ने मुलगी देवीला जन्म दिला. दोघंही आपलं पर्सनल लाईफ खूप एन्जॉय करत आहेत. आणि दोघेही एकत्र खूप आनंदी आहेत.