Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

अभिनेता प्राणने का नाकारला मनोज कुमारचा चित्रपट!
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्राण(Pran) या अभिनेत्याबद्दल रसिकांच्या मनात कायमच आदरभाव राहील आहे. पडद्यावर भले त्यांनी निगेटिव्ह शेडच्या खलनायकी भूमिका केल्या असल्या तरी प्रत्यक्ष जीवनात त्यांच्या इतका दिलदार आणि नीतिमान व्यक्ती फार कमी सापडतात. याचे अनेक पुरावे आणि किस्से आपल्याला ऐकायला मिळतात.
मनोज कुमार यांनी १९६७ साली आलेल्या ‘उपकार’ या चित्रपटात प्राण या अभिनेत्याचा कम्प्लीट मेक ओव्हर केला. या सिनेमात त्यांनी रंगवलेल्या मलंग चाचाने जबरदस्त लोकप्रियता असेल की हासिल केली. प्राण(Pran) यांनी रंगवलेला खलनायक जितका टेरर असायचा तितकाच मलंग चाचा हा प्रेमळ वाटला. खरंतर कलावंत जेव्हा आपली चाकोरीतील इमेज बदलतो तेव्हा ती प्रेक्षक स्वीकारतीलच याची खात्री नसते. ही रिस्क घेऊन प्राण याने ‘उपकार’ या चित्रपटातील भूमिका स्वीकारली आणि त्याच्या या आत्मविश्वासाला जबरदस्त यश मिळाले.

या भूमिकेसाठी प्राणला(Pran) फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले. हा सिनेमा आणि ही भूमिका अजरामर झाली. या चित्रपटानंतर मनोज कुमार यांनी पूरब और पश्चिम (१९७०) हा चित्रपट निर्माण आणि दिग्दर्शित केला. या चित्रपटात देखील प्राण यांची भूमिका ही वेगळी होती. मनोज कुमार आणि प्राण यांच्यामध्ये एक चांगले ट्युनिंग या काळामध्ये निर्माण झाले होते.
‘उपकार’ (१९६७) आणि ‘पूरब और पश्चिम’ (१९७०) या चित्रपटाच्या नंतर मनोज कुमार यांनी ‘शोर’ (१९७२) या चित्रपटाची निर्मिती सुरू केली या चित्रपटात एक पठाणचे कॅरेक्टर होते. ही भूमिका प्राण यांना द्यायची असे त्यांनी ठरवले होते. त्या पद्धतीने त्यांनी काम देखील सुरू केले होते. प्राण आपल्या चित्रपटात नक्कीच काम करतील याची खात्री मनोज कुमार यांना होती. तरी मनोज कुमार यांनी प्राणला(Pran) आपल्याकडे बोलावले आणि ‘शोर’ या चित्रपटाचे कथानक त्यांना ऐकवले आणि त्यांच्या पठाणच्या भूमिकेबद्दल देखील सांगितले. त्यानंतर प्राण म्हणाले, ”कथानक खूप चांगले आहे. पण मला माफ करा मी या चित्रपटातील पठाणची भूमिका करू शकत नाही!”

आता मात्र मनोज कुमार यांना खूप आश्चर्य वाटले ते म्हणाले, ”ही भूमिका मी तुमच्यासाठीच लिहिली आहे आणि तुम्ही या भूमिकेला आता नकार का देत आहात? ही भूमिका तुम्हाला अवघड वाटते का? आणि तुमच्या व्हर्सेटाइल अॅक्टरला तर कुठलीच भूमिका अवघड वाटण्याची शक्यता नाही. मग नकार का देता?” त्यावर प्राण(Pran) म्हणाले, ”मी तुमच्या चित्रपटात काम करेल पण पठाण ची भूमिका करणार नाही.” आता मनोज कुमार यांना जास्त आश्चर्य वाटले. ते म्हणाले,” पठाणच्या भूमिकेमध्ये काय वाईट आहे?”
=======
हे देखील वाचा : देव आनंदच्या सिनेमाला सेंसर बोर्डाने सुचवले ७२ कट्स…
=======
त्यावर प्राण(Pran) यांचे उत्तर अतिशय समर्पक आणि योग्य असे होते ते म्हणाले, ”मी एक नीतिमत्ता जाणणारा आणि नीतीमत्तेला जागणारा एक व्यावसायिक कलाकार आहे. आपल्या चित्रपटातील पठाणची भूमिका मी यासाठी करत नाही की नुकतीच मी प्रकाश मेहरा यांच्या आगामी ‘जंजीर’ या चित्रपटात एका पठाणचीच भूमिका करत आहे. हे दोन्ही चित्रपट साधारणत: एकाच वर्षे प्रदर्शित होतील आणि मला दोन सारख्या भूमिका करायच्या नाहीत ते माझ्या नीतिमत्तेला पटत नाही. माझे काही प्रोफेशनल इथिक्स आहेत ते मला पाळावेच लागतात. हा चित्रपट जर तुम्ही दहा वर्षांनी बनवला किंवा दहा वर्षांपूर्वी बनवला असता तर कदाचित मी ही भूमिका स्वीकारली असती. पण मी आता ऑलरेडी मी ‘जंजीर’ या चित्रपटातील शेरखान या पठाणची भूमिका करत आहे. त्यामुळे मला आता माफ करा. आपल्या ‘शोर’ या चित्रपटातील पठाणची भूमिका मी करू शकत नाही. मुझे माफ करना मेरे दोस्त. मेरे उसुल मुझे इजाजत नही देते.” मनोज कुमारला प्राणचे लॉजिकल उत्तर मनोमन पटले. त्यांनी प्राणला मिठी मारून सांगितले, ”तुम्ही खरोखरच ग्रेट ऍक्टर तर आहातच पण त्यापेक्षा तुम्ही ग्रेट व्यक्तिमत्व आहात पर्सनॅलिटी आहात.”
यानंतर मनोज कुमार यांनी ‘शोर’ या चित्रपटातील ही पठाणची भूमिका प्रेमनाथ यांना ऑफर केली! मनोज कुमारच्या बेईमान , दस नंबरी आणि संन्यासी या चित्रपटात नंतर प्राणने(Pran) भूमिका केल्या.