यांचं ठरलंय! भर कार्यक्रमात Vijay Devarkonda नं दिली Rashmika Mandanna

Pushpa 2 The Rule सिनेमाचे पहिले गाणे ‘पुष्पा पुष्पा’ अखेर रिलीज
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल स्टारर पुष्पा 2: द रूल या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 1 मे रोजी चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे. ‘पुष्पा पुष्पा‘ असे या गाण्याचे नाव असून देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केले असून नकाश अजीज आणि दीपक यांनी गायले आहे. पुष्पा पुष्पा – पुष्पा २ : द रूल मधील पहिले गाणे जे ४ मिनिट-१९ सेकंद एवढे मोठे आहे. पुष्पा द राइज मधील अल्लू अर्जुनचा डान्स ज्यांना मिस केला असेल. आता त्यांच्यासाठी अल्लूला नव्या स्टाईलमध्ये पाहण्याची नवी संधी आहे. व्हिडिओमध्ये अल्लू कधी पाय आपटून नाचताना दिसत आहे, तर कधी फोन स्टेप करताना. टी स्टेप करुन धमाल उडवताना ही दिसत आहे.(Pushpa Pushpa Song)

पुष्पा : द राइज या चित्रपटाच्या संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या संगीत दिग्दर्शिका देवी श्री प्रसाद यांनी पुन्हा एकदा हृदयस्पर्शी असे दमदार गाणे तयार केले आहे. या गाण्याचा जबरदस्त सूर कानापासून थेट हृदयापर्यंत जाणार असून येत्या काही दिवसांत हे गाणं म्युझिक चार्टवरही अधिराज्य गाजवणार आहे. गाण्यांचे बोल आणि अपबिट संगीत प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप उत्सुक करेल यात अजिबात शंका नाही.

हे गाणे तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषेत रिलीज करण्यात आले आहे. देवी श्री प्रसाद यांनी नकाश अजीज, दीपक ब्लू, मिका सिंग, विजय प्रकाश, रणजित गोविंद आणि तिमीर बिस्वास यांसारख्या लोकप्रिय गायकांना गाण्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या गाण्यासाठी समाविष्ट केले आहे. ‘पुष्पा २ : द रूल‘ या चित्रपटाचे संगीत टी-सीरिजने रिलीज केले आहे.(Pushpa Pushpa Song)
==============================
==============================
‘पुष्पा 2: द रूल’ 15 ऑगस्ट 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून माश्री मूव्ही मेकर्स ने याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान, चित्रपटाचा नवा टीझर पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी लोक अधिकच उत्सुक आहेत.