“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

‘या’ दिवशी येणार बहुचर्चित ‘पंचायत’चा तिसरा सीझन
कोविड काळात प्रेक्षकांनी त्यांचा मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवला आणि मनोरंजनविश्वात एक मोठी क्रांति आली. आज डझनावारी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि त्यावर ढीगभर सिरिज आणि चित्रपट उपलब्ध आहेत. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार, सोनी लीव्ह, झी५ सारख्या बड्याबड्या ओटीटी प्लॅटफॉर्मनी संपूर्ण मार्केट काबिज केलं आहे.
पण या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या गर्दीत एका प्रोडक्शन कंपनीने आणि त्यांच्या सीरिजने त्यांची स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. ती कंपनी म्हणजे ‘TVF‘ आणि याच ‘TVF’ची निर्मिती असलेली ‘पंचायत‘ (Panchayat 3) ही वेबसीरिज.
केवळ ४ वर्षातच हिंदी कंटेंट विश्वातील कल्ट सीरिजचा दर्जा ‘पंचायत‘ला मिळाला आहे. टीव्हीएफने काढलेल्या काही उत्कृष्ट वेबसीरिजपैकी एक म्हणजे ‘पंचायत’. (Panchayat 3)
गेले कित्येक महीने या सीरिजचे चाहते याच्या पुढच्या म्हणजेच तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट बघत होते. फुलेरा या छोट्याश्या खेड्यात पंचायत सचिव म्हणून नेमण्यात आलेला एका बड्या शहरातील तरुणाभोवती ही सीरिज फिरते. (Panchayat 3)

हा तरुण जेव्हा या फुलेरा नामक खेड्यात येतो तेव्हा त्याला इथे टिकून राहण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, इथल्या छोट्या छोट्या गोष्टींवरुन भडकणारे पण तितकेच भोळे आणि प्रेमळ गावकरी आणि त्यांचं पंचायत (Panchayat 3) पातळीवरच लुटूपुटूचं राजकारण या सगळ्याचं चित्रण पहिल्या दोन सीझनमध्ये करण्यात आलं आहे.
या सिरिजमधून खऱ्या ‘Rural India‘चं चित्रण करण्यात आलं आहे. अतिशय हलकी फुलकी आणि जीवनातील बऱ्याच गोष्टींबद्दल काहीतरी शिकवणाऱ्या या सिरिजच्या दुसऱ्या सीझनचा शेवट मात्र अत्यंत गंभीर अशा वळणावर झाला होता.
दुसऱ्या सीझनचा शेवट पाहून लोक अधिकच भावुक झाले होते. याचा दूसरा सीझन मे २०२२ मध्ये आला होता. (Panchayat 3)
हेदेखील वाचा : ‘झपाटलेला ३’मध्ये पुन्हा दिसणार महेश-लक्ष्या यांची जोडी?
तेव्हापासूनच प्रेक्षक याच्या पुढील सीझनची वाट बघत होते. आता अशातच प्राइम व्हिडिओने याच्या तिसऱ्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. (Panchayat 3)
अभिषेक त्रिपाठी, सरपंच, बिनोद, प्रल्हाद, बनराकस या सिरिजमधील लोकांच्या लाडक्या पात्रांचं एक हटके पोस्टर प्राइम व्हिडिओने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केलं आहे.
भारतातील गाव, खेड्याचे एक वेगळे आणि तितकेच साधे आणि निरागस चित्रण करणाऱ्या ‘पंचायत सीझन ३‘ (Panchayat 3) येत्या २८ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या नव्या सीझनमध्ये जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, नीना गुप्ता, चंदन रॉय, फैजल मलिकसारखे नावाजलेले कलाकार प्रमुख भूमिकेत पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंज करण्यासाठी सज्ज झाले आहेत. याबरोबरच आणखीनही काही नवे चेहेरे या सीझनमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Panchayat 3)
हसवता हसवता दुसऱ्या सीझनच्या शेवटी प्रेक्षकांना एकदम रडवणारी ‘पंचायत‘ (Panchayat 3) ही सीरिज आता त्याच्या तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना नेमकं काय सरप्राइज देणार? आधीच्या सीझनप्रमाणेच या सीझनमध्येही ही सिरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करत त्यांचे कान टोचणार का? हे आता २८ मे रोजीच स्पष्ट होईल. प्रेक्षकांना या वेबसीरिजकडून खूप अपेक्षा आहेत.