‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अमेरिकन सीरिजमध्ये झळकणार तब्बू ,Dune: Prophecy मध्ये साकारणार महत्वाची भूमिका
आपल्या कामाने प्रेक्षकांची मन जिंकलेल्या अभिनेत्रीं पैकी एक म्हणजे तब्बू . केवळ बॉलिवूडच नाही तर प्रादेशिक सिनेमा आणि जागतिक स्तरावरही तब्बूने स्वत:ला एक हुशार अभिनेत्री म्हणून प्रस्थापित केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीने माचिस, हैदर, दृश्यम, नेमसेक, विरासत, चांदनी बार, चिनी कम, लाइफ ऑफ पाई, मकबूल अशा अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने स्वत: सिद्ध केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘क्रू‘ चित्रपटाच्या यशानंतर तब्बूला आता एक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट मिळाला आहे.व्हरायटीच्या रिपोर्टनुसार, तब्बूला लोकप्रिय अमेरिकन फिक्शन सीरिज ‘ड्यून: प्रोफेसी’मध्ये मोठी भूमिका मिळाली आहे.(Tabu in American series)
नियॉन काइट आणि युनायटेड एजंट यांनी तब्बूशी करार केला आहे. या सीरिजमध्ये एमिली वॉटसन, ऑलिव्हिया विल्यम्स, ट्रॅव्हिस फिमेल, जोहडी मे, मार्क स्ट्राँग, सारा-सोफी बोस्नीना, जोश ह्युस्टन, क्लो ली, जेड अनोका, फुलीन कनिंगहॅम, एडवर्ड डेव्हिस, ऑईफ हिंड्स, ख्रिस मेसन आणि शालोम ब्रुन फ्रँकलिन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेत्री तब्बू या सीरिजमध्ये सिस्टर फ्रान्सेस्काची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिच्या व्यक्तिरेखेचे वर्णन “मजबूत, बुद्धिमान आणि मोहक सिस्टर फ्रान्सेस्का” असे केले गेले आहे जी एक महत्वाची छाप सोडते.
ब्रायन हर्बर्ट आणि केविन जे अँडरसन यांनी लिहिलेल्या ‘सिस्टरहूड ऑफ ड्युन‘ या कादंबरीवरून ‘ड्युन: प्रोफेसी’ ही प्रीक्वल सीरिज प्रेरित आहे. अॅलिसन शापकर कार्यकारी निर्माते आहेत. अॅना फोस्टर यांनी पहिल्या भागासह अनेक भागांचे दिग्दर्शन तसेच सहनिर्मिती केली आहे. जॉर्डन गोल्डबर्ग, मार्क टोब, जॉन कॅमेरून, मॅथ्यू किंग, स्कॉट झेड बर्न्स आणि जॉन स्पॅट्स हे या शोचे कार्यकारी निर्माते आहेत. अँडरसन या सीरिजचा सहनिर्माता म्हणून काम करत आहे.(Tabu in American series)
==========================
हे देखील वाचा: आमीर खानचा 25 वर्ष जुना चित्रपट ‘सरफरोश’चा सिक्वल येणार?
==========================
या सीरिज चा पहिला भाग 2019 मध्ये आला होता, ज्याचे नाव होते ‘ड्युन : द सिस्टरहूड’. आता ‘ड्युन: प्रोफेसी’ दोन हार्कोनेन बहिणींची कथा सांगते जे मानवजातीच्या भविष्याला धोका निर्माण करणार्या शक्तींविरूद्ध लढतात. त्या बेने गेसेरिट म्हणून ओळखला जाणारा एक विलक्षण गट तयार करतात.