Manoj Bajpayee : पहिल्यांदाच भैय्याजी दिसणार हॉरर-कॉमेडी चित्रपटात!

House Of Dragon Season 2 Trailer: बहूप्रतिक्षित ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’ सीझन २ चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित
पुन्हा एकदा होणार रक्तपात, प्रलय! कारण जिओसिनेमाने हाऊस ऑफ ड्रॅगन सीझन २ च्या अधिकृत ट्रेलरची घोषणा केली आहे. हाऊस ऑफ ड्रॅगन सीझन २ फक्त जिओसिनेमा प्रीमिअमवर पाहता येणार आहे. १७ जून पासून इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नड, बंगाली आणि मराठी या भाषांमध्ये उपलब्ध या सीरिजचा प्रत्येक भाग दर आठवड्याला सोमवारी प्रदर्शित होईल. ही सीरिज अमेरिकेतही पाहता येणार आहे.(House Of Dragon Season 2 Trailer)

जॉर्ज आर.आर. मार्टिन यांच्या ‘फायर अण्ड ब्लड’ या पुस्तकावर आधारित या सीरिजमध्ये हाऊस ऑफ तरगार्येनची कथा आहे. राजकीय कारस्थाने, कौटुंबिक हेवेदावे आणि काटेरी सिंहासनावर बसण्यासाठीच्या स्पर्धेत नागरी युद्धाची गडद छाया अशा पार्श्वभूमीवर राजघराण्यात सुरू असलेला सत्तेचा आणि ताकदीचा खेळ यात आहे. ड्रॅगन आणि राजवंशांच्या कालखंडातील या कथेत महत्त्वाकांक्षा, निष्ठा आणि विश्वासघात असे अनेक मानवी कंगोरे आणि आयाम दिसतात. सात राज्यांवर ताबा मिळवण्यासाठी याच भावनांच्या आधारे इथे प्रत्येक जण प्रयत्न करतोय.

मॅट स्मिथ, ऑलिव्हिया कुकी, एमा डीआर्क, एव्ह बेस्ट, स्टीव्ह टुसेंट, फेबियन फ्रँकेंल, इवान मिशेल, टॉम ग्लेन-कार्नी, सोनोया मिझुनो आणि रायस इफान्स यांच्या प्रमुख भूमिका यात आहे. त्याचसोबत हॅरी कोलेट, बेथनी अँटानिया, फोब कॅम्पबेल, फिया सबान, जेफरसन हॉल आणि मॅथ्यू नीधम हे कलाकार पुन्हा नव्या सीझनमध्ये दिसणार आहे. तर, अबुबकर सलिम, गेएल रन्किन, फ्रेडी फॉक्स, सिमॉन रसेल बेल, क्लिंटन लिबर्टी, जेमी केना, केरेन ब्यू, टॉम बेनेट, टॉम टायलर आणि विन्सेंट रेगन हे नवे चेहरे यावेळी दिसतील.
==============================
हे देखील वाचा: अमेरिकन सीरिजमध्ये झळकणार तब्बू ,Dune: Prophecy मध्ये साकारणार महत्वाची भूमिका
==============================
हाऊस ऑफ ड्रॅगन सीझन २ सोबतच जिओसिनेमा प्रीमिअमवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील बराच कंटेंट स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. लहान मुले आणि कुटुंबासाठी परिपूर्ण मनोरंजन देणाऱ्या या व्यासपीठावर विविध प्रकारांमधील ओरिजनल शो, ब्लॉकब्लस्टर सिनेमे आणि खास टीव्हीच्या आधी प्रीमिअर होणारे शो आणि लाइव्ह वाहिन्या आहेत.