‘अमर अकबर अँथनी’ सिनेमाची ४७ वर्ष !
अमर अकबर अँथनी हा मनमोहन देसाई दिग्दर्शित १९७७ साली प्रदर्शित झालेला एक अॅक्शन कॉमेडी-ड्रामा चित्रपट. आज ही सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. २७ मे १९७७ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आणि आज या सिनेमाला तब्बल ४७ वर्ष पूर्ण झाली आहेत. मनमोहन देसाई यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती . तीन भाऊ लहानपणी रॉबर्ट नावाच्या (जीवन) एका गुन्हेगारामुळे वेगळे होतात व त्यांना तीन वेगळ्या धर्मांची कुटुंबं दत्तक घेतात. बावीस वर्षांनंतर, ते वेगळ्या नाव व धर्मांचे दाखवले जातात; पहिला भाऊ अमर खन्ना (विनोद खन्ना) नावाचा हिंदु पोलीस अधिकारी बनतो, दुसरा भाऊ अकबर इलाहाबादी (ऋषी कपूर) नावाचा मुस्लिम कव्वाली गायक असतो, आणि तिसरा भाऊ अँथनी गोंजाल्विस (अमिताभ बच्चन) नावाचा ख्रिश्चन दारू विक्रेता असतो. ह्या तीन भावांची कशीतरी पुन्हा भेट होते आणि ते रॉबर्टकडून त्यांना वेगळं केल्याचा बदला घ्यायचा ठरवतात. अशी या सिनेमाची वेगळी पण तितकीच प्रेक्षकांना आवडणारी अशी गोष्ट.( 47 Years of Amar Akbar Anthony)
या चित्रपटात विनोद खन्ना, अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर हे मुख्य भूमिकेत होते आणि त्यांच्यासोबत शबाना आझमी, परवीन बाबी आणि नीतू सिंह ही आपल्याला पहायला मिळाल्या. लहानपणी विभक्त झालेल्या आणि हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन अशा वेगवेगळ्या धर्माच्या तीन कुटुंबांनी दत्तक घेतलेल्या तीन भावांभोवती ही कथा फिरते. एक पोलिस, दुसरा गायक आणि तिसरा देशी दारूबारमालक होतो आणि कथा जस जशी पुढे सरकते तस तस प्रेक्षक त्यात गुंतत जातो.
अमर अकबर अँथनी या सिनेमासाठी अभिनेता अमिताभ बच्चन यांना त्यांच्या कारकिर्दीतील पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. यासोबतच हा सिनेमा १९७७ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला होता . सिनेमाची गाणी आणि सिनेमाच्या अनोख्या गोष्टीने भारतात चित्रपटांसाठी एक नवा ट्रेंड सेट केला.(47 Years of Amar Akbar Anthony)
=============================
हे देखील वाचा: ‘प्रेम त्रिकोणा’ची गोष्ट, माधुरी दीक्षित हुकमी प्रेयसी
==============================
या चित्रपटाची आणखी एक गंमत म्हणजे हा सिनेमा पूर्ण झाला तरीही या बद्दल दिग्दर्शकाला म्हणजेच मनमोहन देसाई यांना समजलेच नाही. त्यांच्या मुलाने जेव्हा त्यांना हे सांगितले तेव्हा त्यांना चित्रपट पूर्ण झाल्याचे समजले. असेच आणखी बरेच काही गमतीशीर किस्से या चित्रपटाच्या निर्मितीशी निगडीत घडले असल्याचे बोलले जाते.