दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
महिलांच्या वेदना आणि संघर्ष दाखवणारा ‘हमारे बारह’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
अन्नू कपूर, मनोज जोशी आणि परितोष त्रिपाठी स्टारर ‘हम बारह’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘द केरळ स्टोरी’ नंतर असाच आणखी एक चित्रपट येत आहे, ज्याचा ट्रेलर आता समोर आला आहे. ‘हम बारह‘ या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळाले असून, तो आता थिएटरमध्ये धडकण्यास सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे शानदार पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर टीझर आणि ट्रेलरची उत्सुकता वाढली होती. प्रचंड मागणी पाहून राधिका जी फिल्म्स या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता एक दमदार ट्रेलर रिलीज केला आहे ज्यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येण्यास ही सुरूवात झाली आहे.(Hamare Baarah Movie 2024 Trailer)
‘हम बारह‘च्या निर्मात्यांनी आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर ही कथा मांडण्यात आली आहे. यासोबतच सामाजिक रूढींना आव्हान देणारी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. अश्विनी काळसेकर, अभिमन्यू सिंग, पार्थ समथान, आदिती भाटपहाडी, इश्लीन प्रसाद यांच्याही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका असणार आहेत. जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांना भेडसावणाऱ्या अडचणी ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. पण ही समस्या केवळ एका विशिष्ट धर्मामुळे आहे का? त्यात समन्वय साधण्यात निर्माते काहीसे पक्षपाती दिसतात. धर्मावर नव्हे तर वाढत्या लोकसंख्येवर लक्ष केंद्रित केले असते तर हा चित्रपट खरोखरच आश्चर्यकारक ठरला असता.असं मत ही अनेकांनी मांडले आहे.
‘हम बारह’ या धाडसी आणि धाडसी पावलावर पाऊल टाकणारा हा चित्रपट एका संवेदनशील आणि महत्वाच्या विषयावर भाष्य करतो, ज्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे. महिलांना भेडसावणारा संघर्ष आणि कठीण काळ सहन करण्याची त्यांची ताकद यावर हा चित्रपट प्रकाश टाकतो. बिरेंद्र भगत, रवी एस गुप्ता, शिव बालक सिंग आणि संजय नागपाल यांची एकत्रित निर्मिती, त्रिलोकनाथ प्रसाद सहनिर्माते आणि कमल चंद्र दिग्दर्शित ‘हम बारह’ चित्रपटाचे लेखन राजन अग्रवाल यांनी केले आहे.
‘हम बराह’च्या ट्रेलरमध्ये महिलांची स्थिती, बाळंतपण यंत्र, तिहेरी तलाक यांसारखे मुद्देही दाखवण्यात आले आहेत. ट्रेलरमध्ये एक डायलॉग आहे ज्यात अन्नू कपूरची व्यक्तिरेखा म्हणते, ”हम दो हमारे बारह’. त्याचप्रमाणे बुरखा घातलेली एक स्त्री म्हणते, ‘आखिर औरतें ही दोजख में क्यों जाएंगी?’आता या दोन डायलॉग्सवरून सिनेमाची रूपरेषा समजू शकते.(Hamare baarah Movie 2024 Trailer)
=================================
हे देखील वाचा: आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा पहिला चित्रपट ‘महाराज’चा फर्स्ट लूक रिलीज
=================================
बिरेंद्र भगत, रवी एस गुप्ता, शिव बालक सिंग आणि संजय नागपाल यांची एकत्रित निर्मिती, त्रिलोकनाथ प्रसाद सहनिर्मित आणि कमल चंद्र दिग्दर्शित ‘हमारे बारह’ हा चित्रपट सिनेमॅटिक मास्टरपीस ठरणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलायचे झाले तर ,’हम बारह’ 7 जून 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.