‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
रामोजी फिल्म सिटी: २००० एकरमध्ये पसरलेला पृथ्वीवरील स्वर्ग
२००० एकर परिसरात पसरलेला या पृथ्वीतलावरील मानवनिर्मित स्वर्ग तुम्ही पाहिलाय का? त्याला ‘रामोजी फिल्म सिटी’ या नावाने ओळखलं जातं.
ईनाडू वृत्तपत्र आणि रामोजी ग्रुपचे संस्थापक आणि ‘रामोजी फिल्म सिटी’चे कर्ताधर्ता रामोजी राव (Ramoji Rao) यांचे आजच पहाटे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आणि संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली.
हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रामोजी राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली असल्याचंही सांगितलं जात आहे. (Ramoji Rao)
१६ नोव्हेंबर १९३६ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावात एका शेतकरी कुटुंबात रामोजी राव यांचा जन्म झाला. रामोजी राव (Ramoji Rao) यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली.
मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, प्रिया फूड्स, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव (Ramoji Rao) यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत ज्यांची साऱ्या जगभरात चर्चा होते.
आज रामोजी राव (Ramoji Rao) यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून लोक शोक व हळहळ व्यक्त करत आहेत.
या सर्व उद्योगांपैकी ‘रामोजी फिल्म सिटी’ हा त्यांचा सर्वात महत्त्वाकांक्षी आणि तितकाच लोकप्रिय ठरलेला प्रोजेक्ट. इथे चित्रपटाचं शूटिंग तर होतच असतं, पण ही फिल्म सिटी फिरण्यासही खुली आहे.
अमेरिकेच्या हॉलिवूडला टक्कर देणारी फिल्म सिटी रामोजी राव यांनी हैद्राबादमध्ये सुरू केली. डेक्कन हेराल्डच्या एका रिपोर्टनुसार २०२१ मध्ये रामोजी राव यांची एकूण संपत्ती ही तब्बल ३७, ५८३ कोटी इतकी होती. (Ramoji Rao)
रामोजी फिल्म सिटीची सुरुवात १९९६ मध्ये झाली. ही फिल्म सिटी तब्बल २००० एकरमध्ये पसरली आहे.
===
हेदेखील वाचा : सॉफ्ट पॉर्न फिल्म्स ते ‘पंचायत’; ‘बनराकस’चा थक्क करणारा प्रवास
===
या फिल्म सिटीमध्ये तब्बल २५०० हून अधिक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे या फिल्म सिटीमध्ये एकाच वेळी १५ ते २५ चित्रपटांचे शूटिंग एकाच वेळी होऊ शकते. (Ramoji Rao)
इथे ५० शूटिंग फ्लोअर्स आहेत. चित्रपटांबरोबरच इथे बऱ्याच मालिकांचेही शूटिंग होते. इतकंच नव्हे तर मोठमोठे कॉर्पोरेट इवेंट तसेच बड्याबड्या पार्टीजसुद्धा या फिल्म सिटीच्या आवारात होतात.
हैदराबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी तर हे एक महत्त्वाचे आकर्षण आहे. एका वर्षांत या फिल्म सिटीमध्ये १० लाख पर्यटक येतात.
साऊथचे कित्येक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे शूटिंग या फिल्म सिटीमध्ये पार पडले आहे. ‘बाहुबली’च्या दोन्ही भागांचे चित्रीकरण याच फिल्म सिटीमध्ये पार पडले आहे. तसेच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बऱ्याचशा चित्रपटांचे शूटिंगही इथेच होते.
चेन्नई एक्सप्रेस, गोलमाल, सूर्यवंशी, दृश्यम २, रा. वन, चंद्रमुखी, बादशाहसारख्या कित्येक चित्रपटांचे शूटिंगही इथेच पार पडले आहे. (Ramoji Rao)
फिल्म शूटिंगसाठी लागणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा इथे आहेत. वेगवेगळे सेट्स, रियल लोकेशन्स तर इथे आहेतच याशिवाय ऑडियो प्रोडक्शन, डिजिटल पोस्ट प्रोडक्शन आणि फिल्म प्रोसेसिंगचीदेखील या फिल्म सिटीमध्ये सोय करण्यात आली आहे.
याबरोबरच या फिल्म सिटीमध्ये एक विशिष्ट थीम ठरवून लोक आपला लग्नसामारंभदेखील पार पाडतात.
रामोजी फिल्म सिटी फिरण्यासाठी वयस्क लोकांकडून १३५० रुपये तर लहान मुलांचे ११५० रुपये आकारले जातात. तसेच इथे जेवणाचीही सोय करण्यात आली आहे.
एकूणच चित्रपटसृष्टीला चित्रीकरणासाठी एक हक्काचं ठिकाण देणाऱ्या आणि पर्यटकांसाठी एक विलक्षण असं पर्यटनस्थळ निर्माण करणाऱ्या रामोजी राव (Ramoji Rao) यांचे ऋण भारतीयांना फेडता येणं अशक्य आहे.