दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
वयाच्या 50 व्या वर्षीही Malaika Arora इतकी फिट कशी आहे? जाणून घ्या तिच्या परफेक्ट फिगरचं रहस्य
बॉलिवूडमध्ये ग्लॅमरस स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली मलायका अरोरा 50 वर्षांची झाली असली तरी तिच्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. वाढत्या वयाबरोबर मलायकाचा फिटनेस अधिकच जबरदस्त होत चालला आहे. मलायकाच्या परफेक्ट फिगरचे सगळेच वेडे आहेत. ती अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते. पण तुम्हाला माहित आहे का की मलायका या परफेक्ट फिगरसाठी तिच्या डाएटची विशेष काळजी घेते. आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात मलायका अरोराच्या फिटनेसचे रहस्य.(Malaika Arora Fitness Secret)
फिट राहण्यासाठी मलायकाचे तिच्या डाएटवर विशेष नियंत्रण असते. ती दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करते . ती दररोज सुमारे एक लिटर कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून पिते . ब्रेकफास्टमध्ये ती अंड्याच्या पांढऱ्या बल्कासोबत ताजी फळे, इडली, उपमा, पोहे किंवा मल्टीग्रेन टोस्ट घेते. दुपारच्या जेवणात ती दोन चपाती, हिरव्या भाज्या, ब्राऊन राईस, स्प्राउट्स आणि चिकन घेते. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये ती शेंगदाणा बटर सँडविच, पोहे, इडली किंवा उपमा वगैरे घेते . तसेच रात्रीचे जेवण ती अतिशय हलके घेते आणि रात्रीचे जेवण ती आठ च्या आधी करते जेणेकरून अन्न पचायला पूर्ण वेळ मिळेल. रात्रीच्या जेवणात मलायकाला एक वाटी सूप आणि कोशिंबीर तसेच उकडलेल्या भाज्या घ्यायला आवडतात. मलायकाला पास्ता खाण्याची आवड आहे, पण तिला गव्हाचा पास्ता खायला आवडतो.
मलायका त्वचा चांगली ठेवण्यासाठी दररोज ओमेगा ३ युक्त पदार्थ घेते. शरीराला डिटॉक्सिफाई करण्यासाठी ती दिवसा भरपूर पाणी पिते आणि ग्रीन टी पिते. दिवसभरात अनेकवेळा ती नारळाचे पाणी पिते. तसेच मलायका मिठाई खाणे पूर्णपणे टाळते. गोड खाण्याची इच्छा झालीच तर गूळ, मध वगैरे घेते. मलायका खूप कमी वेळा मद्यपान करते आणि आणि ती धूम्रपान करणे टाळते. मलायकाचा असा विश्वास आहे की जर तुम्हाला स्वतःला खरोखरच निरोगी ठेवायचे असेल तर पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ताजेतवाने वाटावे यासाठी यासाठी ती सात ते आठ तासांची झोप घेते.(Malaika Arora Fitness Secret)
===================================
हे देखील वाचा: आदित्य रॉय कपूरने अखेर ब्रेकअपच्या अफवांवर दिल उत्तर; म्हणाला, ‘मी फालतू बोलण्यात…
===================================
वर्कआऊटबाबत मलायकाच्या फिटनेसचा अंदाज तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून येऊ शकतो. व्यायाम करतानाचे व्हिडिओ आणि फोटो ती अनेकदा इन्स्टावर शेअर करत असते. आपली फिगर कायम ठेवण्यासाठी ती दररोज २० मिनिटे कार्डिओ व्यायाम करते. याशिवाय ती योगा, बॉक्सिंग, एरोबिक्स, प्लॅंक आणि हिप हॉप इ. ही करते.