Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ उलगडणार नात्यांची गोष्ट…

 नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ उलगडणार नात्यांची गोष्ट…
Thod Tuja Thod Majha New Serial
टीव्ही वाले मिक्स मसाला

नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ उलगडणार नात्यांची गोष्ट…

by Team KalakrutiMedia 14/06/2024

१७ जूनपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं. कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालत नाही. नातं परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असावं लागतं. स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेतूनही अश्याच नात्यांची गोष्ट उलगडेल. स्टार प्रवाहच्या देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि गोठ मालिकेमधून लोकप्रियता मिळालेला सुप्रसिद्ध अभिनेता समीर परांजपे यांची जोडी या मालिकेतून भेटीला येईल. अभिनेत्री मानसी कुलकर्णी देखिल या मालिकेच्या निमित्ताने तब्बल १० वर्षांनंतर मालिका विश्वात पदार्पण करणार आहे.(Thod Tuja Thod Majha New Serial)

Thod Tuja Thod Majha New Serial
Thod Tuja Thod Majha New Serial

या नव्या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘कोणतीही गोष्ट एकट्याने होत नसते. जोडीदाराची थोडी मदत ही लागतेच. थोडं तुझं आणि थोडं माझं ही अशीच गोष्ट आहे. परस्पर नाते संबंध उलगडणाऱ्या गोष्टी सांगण्याचा स्टार प्रवाहचा कायम प्रयत्न असतो. या मालिकेतूनही अशीच एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे आपल्या अवती भवती जिव्हाळ्याची काळजी करणारी माणसं आहेत. आयुष्य हे जोडून घेतल्यावरच सुंदर असतं. एक प्रेम कथा उलगडताना कौटुंबिक आव्हानं पेलत नायक आणि नायिका हे त्यांचं नातं कसं फुलवत नेतील हे पहायला रसिकांना आवडेल ही खात्री आहे.’  

Thod Tuja Thod Majha New Serial

तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे फारच उत्सुक आहे. ‘स्टार प्रवाह कुटुंबासोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांचे विषय, त्याची मांडणी मला खूपच भावते. त्यामुळेच थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेसाठी मी लगेच होकार दिला. मानसी हे पात्र मला अतिशय आवडलं. देवयानी मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. हेच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे.’ अश्या शब्दात शिवानीने आपली भावना व्यक्त केली. तेजस या व्यक्तिरेखविषयी सांगताना समीर म्हणाला, ‘तेजस ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. तो खोडकर आहे. त्याला कुणी डिवचलं तर तो आपलं म्हणणं खरं करण्यासाठी वाट्टेल ते करु शकतो. मालिकेचं नाव आणि गोष्ट खूपच भावली मला. प्रत्येक वगोगटाला आपलीशी वाटेल अशी गोष्ट आणि पात्र या मालिकेची जमेची बाजू म्हणता येईल.’(Thod Tuja Thod Majha New Serial)

Thod Tuja Thod Majha New Serial
Thod Tuja Thod Majha New Serial

अभिनेत्री मानसी कुलकर्णी, गायत्री प्रभू हे पात्र साकारणार आहे. १० वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करताना प्रचंड उत्सुकता असल्याची भावना मानसीने व्यक्त केली. ‘गायत्री हे पात्र खूपच हटके आहे. तिची महत्त्वाकांक्षा तिच्या वागण्या-बोलण्यातून जाणवते. आपल्यापेक्षा वरचढ ठरणारं कुणी असू नये यासाठी तिची सतत धडपड सुरु असते.’

==============================

हे देखील वाचा: सुंदरी आणि आदित्य मध्ये बहरतय प्रेम; ‘सुंदरी’ मालिका घेणार नवे वळण…

==============================

स्टार प्रवाह प्रस्तुत थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेची निर्मिती अतुल केतकर आणि अपर्णा केतकर यांच्या राईट क्लिक मीडिया सोल्युशन्स या निर्मिती संस्थेने केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कणसे या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. थोडं तुझं आणि थोडं माझं ही १७ जूनपासून रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहाता येईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Actor Sameer Paranjape actress Celebrity News Entertainment Marathi Serial shivani surve star pravah new serial Thod Tuja Thod Majha New Serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.