नयिकेची होणार खलनायिका! अभिनेत्री Akshaya Hindalkar ची होणार अबोली मालिकेत एण्ट्री…

दिल्लीची व्हायरल वडापाव गर्ल चंद्रिका दिक्षितची Big Boss Ott 3 मध्ये होणार एन्ट्री! प्रोमो झाला व्हायरल
रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी 3′चे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत आणि यावेळी या शोचा होस्ट सलमान खान नसून अनिल कपूर असणार आहे. सुरुवातीला या शोमध्ये फक्त सेलिब्रिटीच येत होते, मात्र आता अनेक कॉमन चेहरे आणि सोशल मीडिया स्टार्सदेखील या शोचा भाग बनले आहेत आणि त्यांनी या शोमध्ये चांगला खेळ तर केला आहेच, पण जिंकून परतही आले आहेत. आता या शोमध्ये कोण सहभागी होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या यादीमध्ये सोनम खानपासून अनेक युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सची नावे पुढे येत आहेत. अशातच आता या यादीत वडापाव गर्ल चंद्रिकाचे नाव समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.(Vada Pav Girl in Big Boss Ott 3)

चंद्रिका दीक्षितला तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा पाहिलं असेल आणि लोक तिला वडापाव गर्ल म्हणून ओळखतात. ती आता बिग बॉस ओटीटी 3′ शोमध्ये दिसणार आहे, ज्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती स्वत:बद्दल बोलताना दिसत आहे. मात्र, चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. पण ती दिल्लीची वडापाव गर्ल असल्याचं या व्हीडीओतून स्पष्ट होत आहे. याशिवाय जिओ सिनेमाच्या इन्स्टाग्रामवरही काही ब्लर फोटो शेअर करण्यात आले आहेत, ज्यात वडापाव गर्ल दिसत आहे.

फूड ब्लॉगरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असत, त्यातील बहुतेक चंद्रिका गेरा दीक्षित यांच्या वडापावच्या गाडीचे असायचे, ज्यात तिच्या गाडीसमोर वडापाव खाण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत होते. लोकांना आपल्या बारीची वाट पाहावी लागली. चंद्रिका हलदीराम मध्ये काम करायची, पण मुलाची तब्येत बिघडल्याने तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.आणि वडापावची गाडी टाकण्याचा निर्णय घेतला.(Vada Pav Girl in Big Boss Ott 3)
===================================
===================================
चंद्रिका गेरा दीक्षित शिवाय सोनम खान ‘त्रिदेव’, ‘अजूबा’ आणि ‘विश्वात्मा’ या हिंदी चित्रपटांसाठी ओळखली जाते. दीर्घ विश्रांतीनंतर ती इंडस्ट्रीत परतण्याच्या तयारीत आहे. यासोबतच सना सुलतान आणि कंटेंट क्रिएटर विशाल पांडे देखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. याशिवाय ‘टेम्पेशन आयलंड’मध्ये झळकलेली अभिनेत्री चेस्ता भगत आणि निखिल मेहता देखील या सीझनमध्ये दिसणार आहेत. ‘बिग बॉस ओटीटी ३‘चा प्रीमियर जिओ सिनेमा प्रीमियमवर २१ जूनपासून होणार आहे.