Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

महाराष्ट्राच्या लोकगीतांनी रंगतोय ‘अंतरपाट’चा लग्नसोहळा महासप्ताह

 महाराष्ट्राच्या लोकगीतांनी रंगतोय ‘अंतरपाट’चा लग्नसोहळा महासप्ताह
Antarpat Marathi serial
टीव्ही वाले मिक्स मसाला

महाराष्ट्राच्या लोकगीतांनी रंगतोय ‘अंतरपाट’चा लग्नसोहळा महासप्ताह

by Team KalakrutiMedia 26/06/2024

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अंतरपाट‘ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेत सध्या गौतमी आणि क्षितिजचा पारंपरिक लग्नसोहळा पार पडतो आहे. या लग्नसोहळ्याचं विशेष आकर्षण ठरतंय, ते म्हणजे महाराष्ट्राचं परंपरागत लोकसंगीत. मराठी टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच ‘अंतरपाट‘ मालिकेत पारंपरिक लग्नसोहळ्यादरम्यान महाराष्ट्राच्या लोकसंगीताचं अनोखं दर्शन घडवण्यात आलं आहे. गौतमी-क्षितिजचा लग्नसोहळा हा वैविध्यपूर्ण गोष्टींनी सजला आहे. बेगडी दिखाव्याच्या काळात आपला लग्नसोहळा अत्यंत परंपरापूर्ण व्हावा ही गौतमीची इच्छा होती. आपल्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वपूर्ण दिवस अनोख्या पद्धतीने सजवण्यासाठी गौतमी आग्रही होती आणि तिच्या इच्छेनुसार अत्यंत मऱ्हाठमोळ्या पद्धतीने  गौतमी- क्षितिजचा हा विवाहसोहळा पार पडतोय. मराठी मातीतलं संगीत आणि लोकपरंपरेच्या साथीनं हा लग्नसोहळा सजला आहे. (Antarpat Marathi serial)

Antarpat Marathi serial
Antarpat Marathi serial

आजकाल लग्नसोहळ्यात चकचकीत रोषणाईने सजवलेले हॉल, ट्रेंडिंगच्या नावाखाली केले जाणारे विविध प्रकार पाहायला मिळतात. पण या सगळ्या झगमगाटात महाराष्ट्राची परंपरा आणि सांस्कृतिक वैभव बाजूलाच पडतेय. पण महाराष्ट्राच्या या गतवैभवाला ‘अंतरपाट’ मालिका या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने उजाळा देत आहे. क्षितिज आणि गौतमीच्या लग्नात कोणताही दिखावा न करता लोककलेच्या माध्यमातून आलेल्या पाहुण्याचं मनोरंजन करण्यात आलं आहे. ‘दादला नको गं बाई’ हे भारूड, ‘धरिला पंढरीचा चोर’ सारख्या गीतांचा समावेश आहे. शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. लग्नसोहळ्यात मराठमोळ्या परंपरेचा आणि लोककलेचा समन्वय दिसत असे.. पण आज मात्र हे हरवत चाललं आहे. 

Antarpat Marathi serial
Antarpat Marathi serial

लोककलेच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा हा समृद्ध वारसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कलर्स मराठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. ‘अंतरपाट‘ मालिकेतील रश्मी अनपट आणि अक्षय ढगे हे कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडत आहेत. त्यांच्या भूमिकांसह पारंपरिक वेशभूषेमुळे लग्नसोहळा अधिकच उठून दिसतो आहे.(Antarpat Marathi serial)

================================

हे देखील वाचा: सन मराठीवरच्या ‘तिकळी’ मालिकेत अभिनेता ‘पार्थ घाटगे’ दिसणार मुख्य भूमिकेत

================================

गौतमी आणि क्षितिज यांचा महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा सुगंध घेऊन आलेला हा लग्नसोहळा अनुभवण्यासाठी पहा ‘अंतरपाट’ मालिकेचा हा लग्नविशेष अद्वितीय महासप्ताह, दररोज संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर पाहाता येईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Antarpat Marathi serial Antarpat serial Colors Marathi colors marathi serial Entertainment
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.