यांचं ठरलंय! भर कार्यक्रमात Vijay Devarkonda नं दिली Rashmika Mandanna

मलायका अरोराचं अर्जुनसोबत झाले ब्रेकअप? मुलाखतीत अभिनेत्रीने व्यक्त केल्या प्रेमाबद्दलच्या भावना
बॉलिवूडमधल्या प्रेमाच्या चर्चा आणि नंतर ब्रेकअपच्या चर्चा होण ही खुप सामान्य बाब आहे.आता यामध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर चे नाव वरच्या स्थानावर आहे, जे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात अडकले आहेत आणि नेहमीच एकत्र दिसले होते. सोशल मीडियावर काही दिवसांपासून हे कपल विभक्त झाल्याच्या बातम्या येत होत्या आणि नुकतीच अभिनेत्री मलायका अरोराने तिचा प्रियकर अर्जुनच्या वाढदिवसाच्या पार्टीत ही नव्हती म्हणून ते विभक्त झाल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे आणि आता मल्लाने यावर मोकळेपणाने आपले मत ही मांडले आहे, चला तर मग जाणून घेऊया यावर मलायका नेमक काय म्हणाली.(Malaika Arora On Breakup With Arjun Kapoor)

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यात दोघांचा मार्ग बदलल्याची आणि ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. या अफवांना आणखी बळ मिळालं जेव्हा नुकतीच ती अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसली नाही. या दोघांच्या नात्याविषयी एवढी चर्चा होऊनही मलायका किंवा अर्जुन कपूर या दोघांनीही या गोष्टीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यांच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब झाल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला होता. अशातच आता मलायकाने ब्रेकअपच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आता एका मुलाखतीत मलायकाने खऱ्या प्रेमाबद्दल सांगितले आहे.

मलायकाने नुकतेच एका मॅगझिनशी बोलताना रिलेशनशिप आणि ट्रोलिंगबद्दल मोकळेपणाने सांगितले आणि ती म्हणाली की, ”मी कशी बशी माझ्याभोवती ढाल तयार केली आहे. जिथून मी आता नकारात्मकता येऊ देत नाही. त्यापासून मी स्वत:ला दूर ठेवले आहे. मग ते लोक असोत, कामाचे वातावरण असोत, सोशल मीडिया असोत किंवा ट्रोलर्स असोत. मलायका अरोरा पुढे म्हणाली की, ‘पूर्वी मला या सर्व गोष्टींमध्ये खूप फरक पडायचा आणि अशा परिस्थितीत मला झोप ही येत नव्हती. या सर्व गोष्टींचा मला काही फरक पडत नाही, असे मी म्हटले तर ते खोटे ठरेल. मीही माणूस आहे आणि म्हणून मी रडणार आहे, तुटणार आहे आणि ट्रोल होण्याशी संबंधित सर्व भावनांना सामोरे जाणार आहे, परंतु आपण हे कधीही सार्वजनिकरित्या पाहत नाही.”
=============================
=============================
”काहीही झालं तरी खऱ्या प्रेमाची कल्पना ती कधीच सोडणार नाही,” असं ही मलायका अरोरा म्हणते. ती पुढे म्हणाली की, ती मनापासून रोमँटिक आहे, जी प्रेमासाठी लढू शकते. मात्र, नातेसंबंधांच्या बाबतीत ती अतिशय वास्तववादी आहे आणि नात्यात रेषा कुठे आखायची हे तिला ठाऊक आहे, ती टिपिकल स्कॉर्पिओ गर्ल आहे, जी प्रेमासाठी शेवटपर्यंत लढणार आहे असेही तिने स्पष्ट केले. गेल्या महिन्यात अर्जुन आणि मलायकायांच्या ब्रेकअपच्या अफवा पसरल्या होत्या, जेव्हा एका सूत्राने पिंकविलाला सांगितले की, त्यांचे नाते स्वतःच्या मार्गावर गेले आहे. मात्र, नंतर अभिनेत्रीच्या मॅनेजरने ही केवळ अफवा असल्याचे सांगितले.