दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अभिनेता इम्रान हाश्मीची मोस्ट अवेटेड सिरीज Show Time चा ट्रेलर प्रदर्शित
चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीच्या कथेवर आधारित ‘शो टाइम’ या वेब सीरिजच्या दुसर्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्यात इम्रान हाश्मी, मौनी रॉय, महिमा मकवाना असे अनेक स्टार्स आपल्याला दिसणार आहेत. या सीरिजच्या पहील्या भागाला चाहते आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी शो मेकर्सने घोषणा करत आता दुसर्या भागाचा ट्रेलर रिलीज केला आहे.चला तर मग जाणून घेऊया या सीरिजच्या दुसर्या भागाचा ट्रेलर कसा आहे आणि इम्रान हाश्मीने या शोबद्दल काय म्हटले आहे.(Show Time Trailer)
डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीमिंग होणाऱ्या ‘शो टाइम‘ या वेब सीरिजच्या ट्रेलरची सुरुवात रघु खन्ना म्हणजेच इम्रान हाश्मीपासून होते, ज्यात रघू आपल्या लेडी लव्हसोबत डान्स करताना दिसत आहे. दुसरीकडे पत्रकार माहिका नंदी म्हणजेच महिमा मकवाना टीव्हीवर लाईव्ह येते आणि त्यांचं वर्णन करते. ट्रेलरमध्ये महिमा म्हणते, ‘वडिलांच्या पैशावर चित्रपट बनवणाऱ्या लोकांचीही नेपोटिझमला लाज वाटायला हवी.’ त्याचबरोबर महिमाला गप्प करण्यासाठी रघू तिला चित्रपट बनवण्याचं आव्हान देतो आणि माहिका हे चॅलेंज स्वीकारते आणि बॉक्स ऑफिसवर १०० कोटी कमावण्याची स्पर्धा रंगते. शेअर केलेल्या ट्रेलरमध्ये शोशी संबंधित अनेक एपिसोडबद्दल दाखवण्यात आलेले आहे.
या नव्या सीरिजच्या दुसर्या भागांच्या एपिसोडबद्दल बोलताना इम्रान हाश्मी म्हणाला की, “इतर ठिकाणांप्रमाणेच इंडस्ट्रीतही चढ-उतार असतात, पण एकदा तुम्हाला त्यातील वास्तव समजलं की तुम्ही इथे आहात. रघु खन्ना हा करण जोहरचा एक व्हर्जन आहे आणि कोणतेही चॅलेंज पूर्ण करण्याची त्याची आवड आणि उत्साह मला नेहमीच करणची आठवण करून देतो. कधी कधी मला प्रश्न पडतो की इंडस्ट्रीत रघु खन्नासारखे निर्माते असते तर ते काय झाले असते? सध्याची निर्मात्यांची पिढी कलाकारांच्या मर्जीनुसार काम करत आहे, पण रघूची व्यक्तिरेखा अगदी उलट आहे.”(Show Time Trailer)
===============================
===============================
पुढे तो असा ही म्हणाला की, आतापर्यंतचा सर्वात मोठा स्टुडिओ ‘व्हिक्टरी स्टुडिओज‘ गमावण्यापासून ते आपल्या आयुष्यातील प्रेम, यास्मीन सोबत कठीण काळाला सामोरे जाण्यापर्यंत, पण, याचा अर्थ कथा संपली आहे का? तो आपले ध्येय साध्य करू शकेल का?’ हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या सिरीजचा दुसरा भाग बघावा लागेल.