दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
ट्रेलर प्रदर्शित करत ‘हाफ सीए’च्या दुसऱ्या सिझनची घोषणा
आज चित्रपटांइतकेच किंबहुना त्याहून थोडे जास्त प्रेम ओटीटी माध्यमाला मिळते. या माध्यमाची लोकप्रियता आणि पोहोच पाहून अनेक मोठमोठ्या कलाकारांना देखील या प्लॅटफॉर्मवर काम करण्याचा मोह आवरता आला नाही. मुख्य म्हणजे या माध्यमातून अतिशय वेगवेगळे आणि हटकर विषय हाताळले जातात, त्यामुळे याची लोकप्रियता खूपच वाढत असते. (Half CA Season 2)
या ओटीटीवर अनेक वेबसिरीज, शो येतात आणि गाजतात. आता लवकरच अमेझॉन मिनी टीव्हीवर ‘हाफ सीए’ (Half CA) नुकत्याच साजऱ्या झालेल्या सीए दिवसाच्या निमित्ताने ‘हाफ सीए’ (Half CA) या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. या सिरीजमध्ये एहसास चन्ना आणि ज्ञानेंद्र त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Half CA Season 2)
टीव्हीएफ (TVF- The Viral Fever) हे विविध रंजक विषयावरील कंटेन बनवण्यामध्ये अतिशय अग्रेसर आहे. त्यांचे शो हे नेहमीच प्रेक्षकांसाठी एक पर्वणी म्हणून सिद्ध होताना दिसतात. त्यांची विषय निवड पाहून नेहमीच लोकं त्यांचं कौतुक करताना दिसतात. त्यांनी आतापर्यंत अतिशय उत्तम आणि सगळ्यांशी जोडले जाणारे असे शो तयार करून रसिकांचे मनोरंजन केले आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची वेबसिरीज ‘हाफ सीए’ (Half CA). या सेरिजला लोकांनी भरभरून प्रेम दिले होते.
हाफ सीए (Half CA) सेरिजला मिळालेले प्रेम आणि झालेले कौतुक पाहून आता निर्मात्यांनी याच सिरीजच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी सीए दिवसाचे औचित्य साधत सोशल मीडियावर या या आगामी सिरीजचा एक आकर्षक ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “७६ व्या सीए दिनाच्या दिवशी संपूर्ण सीए असणाऱ्या लोकांचा आदर आणि सन्मान करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आनंदायी बातमी. तुम्ही देखील कॅल्क्युलेटर घेऊन बस. कारण सीए ची तयारी सुरु झाली आहे. आता ‘हाफ CA’ सीजन 2 ची तयारी सुरु झाली आहे.” (Half CA Season 2)
================
हे देखील वाचा : सॉफ्ट पॉर्न फिल्म्स ते ‘पंचायत’; ‘बनराकस’चा थक्क करणारा प्रवास
================
TVF च्या ‘हाफ सीए (Half CA)’ सिरीजच्या पुढच्या सीजनबद्दल आलेली बातमी नक्कीच उत्साह द्विगुणित करणारी आहे. हा शो चार्टर्ड अकाऊंटंट होण्यासाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आधारित आहे. या शोमध्ये या विद्यार्थ्यांना या प्रवासात येणारी आव्हाने, अभ्यास, स्वप्न, अनुभव, भावना आदींवर भाष्य करतो. यात एहसास चन्ना, ज्ञानेंद्र त्रिपाठी, अनमोल कजानी, प्रीत कमानी आणि रोहन जोशी आदी कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Half CA Season 2)
याशिवाय TVF या वर्षी त्याचे सर्वात जास्त पाहिले जाणारे लोकप्रिय शो पंचायत S3, गुल्लक S4 आणि कोटा फॅक्टरी S3 याना मिळालेल्या कमालीच्या प्रतिसादानंतर आणि लोकप्रियेनंतर आनंदात आहे. त्यांचे सर्वच शो खूपच गाजले आणि सुपरहिट झाले.