Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

इराण, इटली, पाकिस्तान; परदेशातही वाजला होता Sholay चा डंका!

Jeetendra : ‘आखरी दाव’, खेळ जो रंगलाच नाही…

उपहार : Jaya Bachchan यांच्या मुग्ध अभिनयाने नटलेला अप्रतिम चित्रपट!

Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Bin Lagnachi Gosht Teaser: नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या सिनेमात पहायला मिळणार  प्रिया- उमेशची

‘Ghadhvach Lagn 2: सावळा कुंभार आणि गंगी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

Amjad Khan यांच्या मध्यवर्ती भूमिकेतील ‘हा’ सिनेमा सुपर डुपर हिट

सचिन, विजू खोटे ते एम.एस. शिंदे; Sholay चं मराठी कनेक्शन!

१५ ऑगस्ट ७५ ते सप्टेंबर ८०… तब्बल पाच वर्षे Sholay

Muramba Serial: 7 वर्षांनी पूर्णपणे बदलली रमा; दोन वेण्या कापल्या, इंग्रजीही

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘आपका अपना जाकीर’ म्हणत जाकीर खान घेऊन येतोय भन्नाट कॉमेडी शो

 ‘आपका अपना जाकीर’ म्हणत जाकीर खान घेऊन येतोय भन्नाट कॉमेडी शो
कलाकृती तडका

‘आपका अपना जाकीर’ म्हणत जाकीर खान घेऊन येतोय भन्नाट कॉमेडी शो

by Jyotsna Kulkarni 24/07/2024

सध्या टेलिव्हिजन आणि ओटीटी विश्वात अनेक लोकप्रिय कॉमेडी शो सुरु आहेत. प्रेक्षक या सर्व कार्यक्रमांवर भरभरून प्रेम करता. कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी आदी अनेक कॉमेडियन अशा शो मुळेच लोकप्रिय झाले आणि त्यांना प्रसिद्धी मिळाली. आता लवकरच यात अजून एका कॉमेडियन कलाकाराच्या शोची भर पडणार आहे. (Aapka Apna Zakir)

उत्तम कॉमेडियन आणि शायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाकीर खानचा एक नवा कोरा धमाकेदार शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारा जाकीर लवकरच एका नवीन शोमध्ये प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर जाकिरने संपूर्ण जगात नाव कमवले.

https://www.instagram.com/reel/C8ygmQyPBWq/?utm_source=ig_web_copy_link

कॉमेडीच्या दुनियेतील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा म्हणून जाकीर खानला ओळखले जाते. लवकरच तो त्याच्या करियरमधील नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो एका नवीन शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजनकरत त्यांना हसवताना दिसणार आहे. नुकताच या शोचा एक टिझर प्रदर्शित झाला असून, हा टिझर सध्या तुफान गाजत आहे. (Aapka Apna Zakir)

जाकीर खान लवकरच त्याचा स्वतःचा ‘आपका अपना जाकीर’ हा शो घेऊन लवकरच सोनी टीव्हीवर येत आहेत. या शोच्या माध्यमातून तो सर्वांना खळखळून हसवताना दिसणार आहे. या शोचा टिझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा शो कधी आणि केव्हा सुरु होणार याबाबत कोणतीही माहिती अजून मिळाली नाही.

सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून जाकीर खानच्या या कॉमेडी शोचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये जाकीरचा एक मोठा कट आऊट दिसत आहे. त्याच्या या कट आऊटला फुलांच्या माळा घातलेल्या दिसत आहे. यात दोन मुलं या शोबद्दल चर्चा करताना दिसत आहे. हा टिझर शेअर करताना सोनीने कॅप्शनमध्ये लिहिले, “तुम्ही बघाल, आम्ही बघू, सर्व बघणार. #AapkaApnaZakir, #SonyEntertainmentTelevision वर लवकरच.” (Aapka Apna Zakir)

जाकीर खान त्याच्या या शोमध्ये प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार यात शंका नाही. आपल्या कॉमेडीने, शायरीने आणि किस्स्यांनी सगळ्यांनाच भरपूर हसवणार आणि त्यांचे मनोरंजन करणार. हा शो जुलैमध्ये सुरु असणार असल्याचे सांगितले जात आहे. (Aapka Apna Zakir)

तत्पूर्वी जाकीर खानबद्दल सांगायचे झाल्यास त्याचा जन्म २० ऑगस्ट १९८७ साली मध्यप्रदेशमधील इंदोर येथे झाला. कॉमेडीच्या जगातील लखलखता तारा असलेल्या जाकिरला ‘कॉमेडी सेंट्रल’ हा पुरस्कार २०१२ साली मिळाला आणि तो प्रसिद्ध झाला. इथूनच त्याच्या आयुष्याला आणि करियरला वाट मिळाली.

https://www.instagram.com/reel/C8ygmQyPBWq/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान जाकीर खानने अनेक शो आणि वेबसिरीजमध्ये काम केले आहेत. यात ‘चाचा विधायक हैं हमारे’, ‘कॉमिक्स्तान’, ‘वन माइक स्टैंड’, ‘फर्जी मुशायरा’, ‘हक से सिंगल’, ‘कक्षा ग्यारवीं’, ‘तथास्तु’ आणि ‘मनपसंद’ आदींचा समावेश आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aapka Apna Zakir comedy show new show zakir khan comedy zakir khan show आपका अपना जाकीर जाकीर खान जाकीर खान शो
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.